✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुक्तविहारींची भाषणभरारी

प
पैसा यांनी
Tue, 03/04/2014 - 15:58  ·  लेख
लेख
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते. डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यांच्याकडे एक मोठे ग्रंथसंग्रहालय आहे असे ऐकले आहे. त्यामुळे वाचनाची आवड असलेल्या सदस्यांसाठी त्यांनी अशी स्पर्धा ठेवली यात नवल ते काय! पण विशेष म्हणजे सुमारे १२५ श्रोत्यांच्या समोर आयत्या वेळी तयारी करूनही छाप पाडणारे भाषण करून मुविंनी दुसरे बक्षीस पटकावले. या भाषणाचा विषय होता, "माझा आवडता दिवाळी अंक - मिपा दिवाळी अंक २०१३." एकूण १२ स्पर्धक होते.त्यातील १० स्त्रिया तर २ पुरुष होते. पैकी १ पुरुष आलाच नाही. मग मुविंनी आयोजकांना विनंती करून त्यांचा नंबर सगळ्यात शेवटी ठेवला होता. शनिवारी १ तारखेला संध्याकाळी ५ वा. स्पर्धा सुरु झाली आणि पहिल्या घारापुरी कट्ट्यात बिज्जी राहिल्यामुळे मुवि स्पर्धेला संध्याकाळी साडे सहाला पोहोचले. २ स्पर्धकांनंतर त्यांचा नंबर लागला. ११ स्पर्धकांमधे मुवि हे एकटेच पुरुष स्पर्धक होते. यावरून सामाजिक कामात महिला आघाडीवर असतात इ. निष्कर्ष सहज काढता येतील. पण तो अजून एका धाग्याचा विषय ठरेल. त्यामुळे सध्या या स्पर्धेची आणि भाषणाची माहिती घेऊया. १. प्रभा साळवेकर - साधना २. जयंत फाटक - मिसळपाव (इ-दिवाळी अंक) ३. सुनिता सामंत - कालनिर्णय उत्तेजनार्थ ४. अनुराधा आपटे - चार चौघी अशी बक्षीसे मिळाली. कार्यक्रमाचे फटु मुविंकडून मिळवण्यात आले आहेत. १) मुवि भाषण करताना. pic1 २) मुवि सौ. बिवलकर यांच्याकडून बक्षीस घेताना pic2 ३) मुवि आभाराचे भाषण करताना (या फोटोत डाव्या बाजूला आहेत त्या मुविंच्या वाचनप्रिय उत्साही आई) pic3 आता पाहूया, मुविंनी केलेले बक्षीसाचे भाषण. ----------------------------------- माननीय अध्यक्ष महोदया , परीक्षक मंडळ आणि उपस्थित रसिक जनहो, कुणीतरी म्हटलेच आहे की.... अक्षरांना नसते दु:ख आणि अक्षरांना नसते सुखही....ते वाहतात जी ओझी ते तुमचे आमचे अनुभव असतात. इथे हजर असलेल्या प्रत्येकालाच बरे-वाईट अनुभव आलेले आहेत. आपल्या प्रत्येकालाच वाटते. की आपले हे अनुभव, कुणाला तरी सांगावेत किंवा कुठल्या तरी मासिकात ते छापून यावेत आणि आपला लेख दिवाळी अंकात लेख छापून आला, तर त्या लेखकाला आनंद होतोच होतो.समजा आपल्याला एखादा चांगला लेख आपल्याला आवडला, तर त्या लेखकाला पत्र पण लिहावेसे वाटते. तसेच लेखकाला पण आपला लेख किती जणांनी वाचला आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. चांगल्या लेखावर झालेली खेळी-मेळीची चर्चा, लेखकाच्या लिखाणातील त्रुटी दूर करायला मदत करते. ज्याचा फायदा वाचकांनाच होतो. त्यांना अधिक सकस वाचायला मिळते. आणि ही अशीच खुले आम चर्चा होते ती एका इ-दिवाळी अंकावर, ज्याचे नांव आहे. "मिसळपाव.कॉम चा दिवाळी अंक" साधारण १९९६ मध्ये मायबोली.कॉमच्या माध्यमातून मराठी माणसे एकत्र यायला लागली आणि मराठी माणसांच्या प्रथेप्रमाणे, ई-दिवाळी अंक पण निघू लागले. मायबोलीचाच आदर्श घेवून इतर पण काही मराठी वेबसाईट्स तयार झाल्या जसे उपक्रम्, मी-मराठी, ऐसी अक्षरे, मनोगत आणि एक तेज तर्रार लोकप्रिय साईट "मिसळ-पाव.कॉम". ह्या वर्षीचा "मिसळपाव.कॉमचा" दिवाळी अंक फारच बहारदार होता. आपण प्रत्येकजण दिवाळी साजरी करतोच आणि सुट्ट्या मिळाल्या तर भटकंतीला पण जातो. ह्या वर्षी पण काही मिपाकर भटकंतीला गेले होते. पण कुठे तर "मंगळावर". त्याचे एक विनोदी प्रवासवर्णन "मुवि" ह्यांनी लिहीले आहे. अरे हो, ह्या साईटवर बरेच जण टोपण नावाने लिहीतात. तुम्हाला-आम्हाला जसा प्रवास करतांना काही अडचणी येतात. तशाच अडचणी ह्या मिपाकरांना पण आल्या. पण त्यांनी डगमगून न जाता,त्या अडचणी पार केल्या. थोडक्यात काय तर अडचणी आल्या तरी न घाबरता, प्रवास करा. असा मोलाचा संदेश विनोदी ढंगाने लेखक सांगून जातो. दिवाळीत गोड नसेल तर दिवाळीची मज्जा काय्? आणि इथे अशाच अनेक सुंदर पाककृती वाचायला, पहायला मिळतात. असे गोडाचे पदार्थ खाल्यावर दांत किडण्याचा संभव असतो. पण "अजया" ताईंनी लिहीलेल्या "दातांची काळजी कशी घ्यावी?" ह्या लेखाने आपण योग्य ती काळजी घेवू शकतो. दिवाळी म्हटली की, थोडा फार खर्च हा होणारच. नेहेमीच्या तेल आणि साबणाच्या जागी उंची तेल-साबण हे येणारच. थोडा फार खर्च कपडे किंवा फराळ ह्यावर तर होतोच पण त्यातून फटाके पण सुटत नाहीत. कधी कधी वाटते, कशाला करायचा इतका खर्च? पण गवि नावाचे कवि हा खर्च करा असे सांगून, एक दिवस तरी स्वतःसाठी जगा, अशी त्याची कारणमीमांसा करतात. प्रभाकर पेठकर नावाचे एक लेखक, बालपणीतल्या दिवाळीचे वर्णन करतात. किल्ले आणि आकाशकंदिला बरोबरच, न वाजलेले फाटके शोधण्याचे प्रसंग वर्णन करतात. आज काल फटाके उरतात, ही चैन नसून, तो पैशांचा माज आहे, असे परखड मत ते व्यक्त करतात. मज्जा करा पण अनावश्यक खर्च टाळा, हे त्यांनी योग्य शब्दांत सांगीतले आहे. आणखीही कित्येक सुंदर लेख, कथा, पाककृती यांनी हा अंक सजलेला आहे. आणि ह्या दिवाळी अंकातील, माझा सर्वात आवडता लेख म्हणजे, संपादकीय. ह्यात संपादकांनी इ-दिवाळी अंकाची खास वैशिष्टे सांगीतली आहेत. १. तो हवा तेंव्हा वाचता येतो. वाचनालयात गेल्यावर "आवाज","जत्रा"."किस्त्रीम." नाही मिळाले तर आपला हिरमोड होतो. ह्या इ अंकांमुळे तो होत नाही. २. कागद,शाई ह्या गोष्टींची गरज नसल्याने, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि साहजिकच प्रदूषण कमी होते. ३. जसा वेळ मिळेल तसा आणि कितीही वेळा, हे अंक वाचता येतात. तुम्हाला पण कधी हा अंक वाचावासा वाटला तर आमच्या "मिसळपाव.कॉम" ह्या साइटला भेट द्या. हे अंक वाचण्यासाठी तुम्हाला सभासद व्हायची पण गरज नाही. अहो, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते. ---------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
शुभेच्छा
अभिनंदन
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
27611 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

विकास
Tue, 03/04/2014 - 19:49 नवीन
मुविंचे अभिनंदन! भाषणपण मस्तच आहे! ११ स्पर्धकांमधे मुवि हे एकटेच पुरुष स्पर्धक होते. अहो पैसाताई स्पर्धा बोलण्याची होती! त्यामुळे निष्कर्ष वास्तवीक वेगळा निघतो असे वाटते! ;)
  • Log in or register to post comments

बोललातच ना!

पैसा
Tue, 03/04/2014 - 20:32 नवीन
कोणीतरी आणखी फाटे फोडणार हे माहित होतं, त्यामुळे वेगळ्या धाग्याचा विषय आहे म्हटलेलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ!

स्पंदना
Wed, 03/05/2014 - 02:59 नवीन
ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

....अभिनंदन !!!!

विनोद१८
Tue, 03/04/2014 - 20:01 नवीन
.....अभिनंदन !!!....मुवि.
विनोद१८
  • Log in or register to post comments

अभिनंदन मु वि काका ....+)

आरोही
Tue, 03/04/2014 - 20:03 नवीन
अभिनंदन मु वि काका ....+)
  • Log in or register to post comments

अभिनंदन मुवि!एइस बात पे एक

यशोधरा
Tue, 03/04/2014 - 20:04 नवीन
अभिनंदन मुवि!एइस बात पे एक कट्टा हो जाये और उस कट्टेमें येच भाषण म्हणके दिखाना. :)
  • Log in or register to post comments

कट्टा नियोजन अधिकारी

भाते
Tue, 03/04/2014 - 20:15 नवीन
आतातरी मुक्त विहारि यांना मिपाचे अधिकृत कट्टा नियोजन अधिकारी म्हणुन घोषित करा ही मागणी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सचिन कुलकर्णी
Tue, 03/04/2014 - 20:23 नवीन
मन:पूर्वक अभिनंदन मुवि आणि वृतांत दिल्याबद्दल पैसातैंचे आभार
  • Log in or register to post comments

पै माहितीबद्दल अन वृत्तांताबद्दल आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/04/2014 - 20:40 नवीन
मुवि अभिनंदन.....! आनंद वाटला. अरे येऊन येणार कोण मुविशिवाय दुसरं कोण. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मुविंचे हार्दिक हबिणंदण!!!!

बॅटमॅन
Tue, 03/04/2014 - 21:17 नवीन
मुविंचे हार्दिक हबिणंदण!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

टिवटिव
Tue, 03/04/2014 - 22:24 नवीन
अभिनंदन मुवि !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

पाषाणभेद
Tue, 03/04/2014 - 22:31 नवीन
अभिनंदन. लेखाचे शिर्षक वाचून भा. रा. भागवतांची कथा आहे की काय असे वाटले.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

सर्वसाक्षी
Tue, 03/04/2014 - 22:43 नवीन
मुवि, आपले हार्दिक अभिनंदन आणि अपार कौतुक! आता एकदा भेटले पाहिजे:) साक्षी
  • Log in or register to post comments

मुक्त विहारी - नावाची सार्थकता!

शशिकांत ओक
Tue, 03/04/2014 - 22:54 नवीन
ज्यांच्या नावात विहार त्यांच्या वागण्यात ही संचार.. म्हणून ते घारापुरच्या लेण्यापहायला हजर होते व दुसऱ्या दिवशी मुक्तपणे डोंबिवलीच्या सभेत मिपाकरांच्या वतीने बक्षिसाचा सन्मान स्वीकार करायला तत्परतेने हजर होते! मिपाकरांच्या तर्फे अभिनंदन...
  • Log in or register to post comments

अहो...

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 23:53 नवीन
त्याच तारखेला, संध्याकाळी स्पर्धा होती.त्यासाठीच तर घारापुरी हून लवकर निघालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

सॉरी काका

पैसा
Wed, 03/05/2014 - 00:35 नवीन
मी लिहिताना तारीख आणि वाराचा घोळ केला होता. आता दुरुस्त केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Tue, 03/04/2014 - 22:55 नवीन
जबरदस्त... मुविकाका तुमचे खूप खूप अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

सर्व प्रथम मूवी ह्यांचे एक

निनाद मुक्काम …
Tue, 03/04/2014 - 23:40 नवीन
सर्व प्रथम मूवी ह्यांचे एक मिपाकर , डोंबिवलीकर ह्या नात्याने अभिनंदन करतो. ब्राह्मण सभेच्या बाजूच्या वाड्यात आईचे बालपण गेले, लग्न तेथेच झाले , माझी मुंज तेथेच लागली. त्याच दिवशी माझ्या आईच्या आईने मला ब्राह्मण सभेच्या वाचनालायचे सभासदस्यत्व घेऊन दिले. त्यांच्या अनेक उपक्रमात नेहमीच सक्रिय सहभाग माझ्या शालेय जीवनात असायचा, मूवी त्याच परंपरेचे पाईक आहेत हे पाहून त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध अजूनच दृढ झाले आहेत,
  • Log in or register to post comments

मुवि हे खऱ्या अर्थाने मिपाचे

खटपट्या
Tue, 03/04/2014 - 23:54 नवीन
मुवि हे खऱ्या अर्थाने मिपाचे Brand Ambassador आहेत. मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आयुर्हित
Wed, 03/05/2014 - 00:15 नवीन
सर्व प्रथम अभिनंदन मुविंचे, मुविंना चांगल्या सवयी लावणाऱ्या त्यांच्या माऊलीचे, डोम्बीवलीच्या ब्राह्मण सभेचे. लेख लिहिण्याबद्दल पैसाताईंचे व मिपाचेही चांगला इ दिवाळीअंक काढल्याबद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments

मी विचार करत होते, हे मुवि

स्पंदना
Wed, 03/05/2014 - 03:01 नवीन
मी विचार करत होते, हे मुवि "आईच्या मागे भुण भुण" कसे करत असतील? म्हणजे आई साधारण वयस्कर वगैरे असतील. तर काय? अगदी जास्त भुण भुण केली तर "रपाटे" सुद्धा घालु शकतील अश्या मुविंच्या आई पाहुन अतिशय आनंद झाला. मुवि अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नंदन
Wed, 03/05/2014 - 04:40 नवीन
हार्दिक अभिनंदन, 'मूविं'ग स्पीच! :)
  • Log in or register to post comments

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ।

कंजूस
Wed, 03/05/2014 - 05:41 नवीन
पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा तिन्ही लोकी झेंडा ।। लावा झेंडा देशात परदेशात मंगळावर । त्यादिवशी सहापर्यँत दिपक आणि मी मुविंबरोबर होतो पण ताकास तूर लागू दिली नाही !
  • Log in or register to post comments

पण ताकास तूर लागू दिली नाही !.........मान्य.....

मुक्त विहारि
Wed, 03/05/2014 - 08:07 नवीन
पण त्याचे काय झाले.... १. स्पर्धा ५ वा. सुरु होणार होती.ब्राह्मणसभेत बर्‍याच वेळा वेळेवर कार्यक्रम होतात.जास्तीत जास्त १० ते १५ मिनीटे उशीर होतो. २. तसे १५ स्पर्धक होते, पण ऐनवेळी २/३ जण गळतात्,त्यामुळे ६ वाजे पर्यंत मला सभेच्या ठिकाणी पोहोचणे भाग होते.माझा नं> जरी शेवटचा होता तरी ६:१० पर्यंत तरी तिथे पोहोचणे भाग होते.आपण डोंबिवली स्टेशन वर पोहोचलोच मुळी त्या सुमारास.त्यामुळे मला बोलता येईल की नाही/ ह्याची खात्री न्हवती. ३. एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल, तर जास्त बोभाटा न करता, ती गोष्ट साध्य करून, मग सांगीतलेले उत्तम. ४. ह्या अशा त्रिशंकू अवस्थेमुळे , मी त्या दिवशी, कुठल्याच मिपाकराला बोललो नाही. तुम्हाला राग आला असेल, तर क्षमस्व.तुमचा किंचीत गैरसमज उद्याच दूर करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हार्दिक

इरसाल
Wed, 03/05/2014 - 09:41 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनन्दन

पद्मश्री चित्रे
Wed, 03/05/2014 - 10:03 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments

वाह मुविकाका

स्पा
Wed, 03/05/2014 - 10:07 नवीन
वाह मुविकाका मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments

टाईम मैनेजमेंट का काय ते

कंजूस
Wed, 03/05/2014 - 10:54 नवीन
टाईम मैनेजमेंट का काय ते यांच्याकडे शिका .
  • Log in or register to post comments

खुप खुप अभिनन्दन मुविजी ..

नित्य नुतन
Wed, 03/05/2014 - 11:31 नवीन
खुप खुप अभिनन्दन मुविजी .. आणि ... मिपाकर असल्याचा अभिमान द्विगुणित झाला...
  • Log in or register to post comments

वाह. अभिनंदन. मुवि म्हणजे

मृत्युन्जय
Wed, 03/05/2014 - 11:48 नवीन
वाह. अभिनंदन. मुवि म्हणजे जयंत फाटक हे आजच कळाले :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

चिगो
Wed, 03/05/2014 - 13:35 नवीन
मुवि दणक्यात.. अभिनंदन..
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

चित्रगुप्त
Wed, 03/05/2014 - 16:19 नवीन
एका वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून मिपाचे कौतुक आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयोग उत्तमच.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

विटेकर
Wed, 03/05/2014 - 16:53 नवीन
मिपाचे पाऊल पडते पुढे !!
  • Log in or register to post comments

अभिन्ंदन! त्रिवार अभिनंदन!

अनन्न्या
Wed, 03/05/2014 - 17:18 नवीन
*secret* तिसय्रा कट्ट्याचे रहस्य उलगडले! *clapping* *BRAVO*
  • Log in or register to post comments

मुवि काका अभिनंद्न.

त्रिवेणी
Wed, 03/05/2014 - 21:51 नवीन
मुवि काका अभिनंद्न.
  • Log in or register to post comments

प्रत्येक सुंदर गोष्ट

अमित खोजे
गुरुवार, 03/06/2014 - 00:27 नवीन
अहो, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते.
आवडले! छानच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा