आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
11 May 2013 - 10:35 am

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले

पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले

सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले

                                - गंगाधर मुटे
------------------------------------------------
वृत्त : अभयकांती....@
लगावली : गालगा गालगागा गागाल गालगा
------------------------------------------------

@ - अशा वृत्ताची नोंद आहे किंवा नाही, ते शोधावे लागेल.
पण हे वृत्त हरवून जाऊ नये म्हणून मी तात्पुरते नाव दिले आहे.
ही लय मला खूप आवडली. मस्त ठसकेबाज आणि ठेकेबाज गझलेची चाल तयार होतेय.
गेय गझलेसाठी फ़ारच मोहक आहे हे वृत्त.
------------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 May 2013 - 12:30 pm | मुक्त विहारि

मस्त

Bhagwanta Wayal's picture

12 May 2013 - 10:21 am | Bhagwanta Wayal

छान झालीय...!

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2013 - 4:32 pm | अत्रुप्त आत्मा

@पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले>>> व्वा...व्वा...व्वा...! मुटे सर ,सलाम हाय आपला .

कोण वामन
आपले कृषिमंत्री का ?

आशु जोग's picture

14 May 2013 - 11:19 pm | आशु जोग

काहीच उत्तर नाही
याला काय म्हनाव

गंगाधर मुटे's picture

15 May 2013 - 8:28 am | गंगाधर मुटे

वामन म्हणजे वामनच. :)

आशु जोग's picture

14 May 2013 - 11:26 pm | आशु जोग

या धाग्याच्या दुसर्‍या भागासाठी शीर्षक सुचवीत आहे

मागू नकोस द्रोणा तू अंगठा अमुच्या एकलव्याचा

गंगाधर मुटे's picture

15 May 2013 - 8:32 am | गंगाधर मुटे

मागू नकोस द्रोणा तू अंगठा अमुच्या एकलव्याचा

कधी नाही कधी तरी हा संदर्भ येईलच माझ्या काव्यात. :)

गंगाधर मुटे's picture

15 May 2013 - 8:34 am | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. :)

आशु जोग's picture

16 May 2013 - 9:15 am | आशु जोग

वामन म्हणजे वामनच
अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पुराणकाळातील गोष्टी करताय .
आम्हाला वाटलं बळीराजाच्या आजच्या स्थितीबद्दल काही भाष्य करताय.

बळीराजा आज सुखात आहे. कारण आज वामन उरला नाही.

शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या हा काही पुराणकाळातील विषय नाही.

पण वामनाने बळीराजाला पाताळात गाडल्यापासून, अगदी पुरातन काळापासून शेतकरी जो दरिद्रीत गेला तो काही केल्या सुबत्तेत येतच नाहीये, हे कटू आहे.

तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्‍याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्‍याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?

पण वामनाने बळीराजाला पाताळात गाडल्यापासून, अगदी पुरातन काळापासून शेतकरी जो दरिद्रीत गेला तो काही केल्या सुबत्तेत येतच नाहीये, हे कटू आहे.

म्हणजे शिवाजी महाराज, जिजामाता यांच्या काळात सुद्धा तो दारीद्र्यात होता का ?

महाराजांना आपण शेतकर्‍यांचा राजा म्हणतो.

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 9:37 pm | गंगाधर मुटे

इतर राज्यकारभारांशी तुलनात्मक रितीने विचार केला तर शिवाजी महाराजांचा शेतकर्‍यांप्रती चांगला दृष्टीकोण होता. शेतकर्‍यांचे थोडेफार तरी हित जोपासणारा अलिकडच्या काळात शिवबा खेरीज दुसरा राजा कूणी नाही.

पण याचा अर्थ शिवाजी महाराज, जिजामाता यांच्या काळात शेतकरी सधन होता, असे नाही.

स्वातंत्र्यापूर्वी "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ट चाकरी" अशी म्हण होती.

स्वातंत्र्यानंतर मात्र "उत्तम चाकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती" असे चित्र तयार झाले.

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि नेहरूप्रणित समाजवादाने पहिला बळी शेतकर्‍यांचा घेतला.

तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्‍याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्‍याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?

मुटेजी आपले शेतीविषयक लेख आम्ही वाचतो
पण एक शंका म्हणून विचारतो

आज वामन कोठून आणायचा ?

मृगनयनी's picture

16 May 2013 - 9:58 pm | मृगनयनी

आशु जोग.. यांच्याशी सहमत!!!.......वामना'पेक्षा शेतकर्‍यांना गाडणार्‍या "कृषिमन्त्र्या"ना मुटेंनी हा प्रश्न विचारला असता.. तर अधिक उचित ठरले असते.... :)

बाकी वामना'ची बारामतीच्या उसाच्या शेतांवर आणि शेतकर्‍यां'वर फारच कृपादृष्टी दिस्तेय!!!

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 10:09 pm | गंगाधर मुटे

वामना'पेक्षा शेतकर्‍यांना गाडणार्‍या "कृषिमन्त्र्या"ना मुटेंनी हा प्रश्न विचारला असता.. तर अधिक उचित ठरले असते.

गेली अनेक वर्षे हेच काम करत आलोय. पुढेही तेच करणार आहे.

मात्र केवळ सध्याचेच कृषिमंत्री 'वामन' आहेत असे नसून यापूर्वीचे सर्वच कृषिमंत्री, पंतप्रधान हे वामनाचेच वंशज होते, हेही लक्षात घ्यायला हवे.

राजकिय सोईचे तत्वज्ञान मांडणे अजून तरी मला शिकता आलेले नाही.

पैसा's picture

16 May 2013 - 10:06 pm | पैसा

अन्य काही संदर्भ लावून पाहिले. तेही मस्त चपखल बसताहेत! प्रत्येक कडवे (शेर?) एकेक वेगळी कहाणी सांगतो आहे!

"काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले"

अगदी अगदी!

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 1:09 am | बॅटमॅन

गझल छानच उतरली आहे!!! मस्तच :)

अरे या गझलमधे तुम्हाला दर्द नाही का दिसत बळीराजाचा.

वेदना मांडिली कवीने आपुल्या कवितेमधे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2013 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गझल आवडली. आशय तर उत्तमच.

बाकी, स्वतःच्याच नावाने वृत्त सुरु करण्याची गम्मत वाटली.
लघु गुरु आणि अक्षरं ओळ याचा व्यवस्थित हिशोब करुन तुम्ही मांड्ले असते तर हे वृत्त कोणते हे पुस्तक वाचून नक्कीच सांगितले असते.

एक निरिक्षण : शीर्षक लहान करता आलं तर बघावं. एक शब्द, दोन शब्द. ओळ देऊ नये असे वाटले.

-दिलीप बिरुटे

आशु जोग's picture

17 May 2013 - 10:08 am | आशु जोग

हो पण अर्थाचे काय !

आजच्या आत्महत्या पुराणातला काही हजार वर्षापूर्वीचा वामन कसा रोखणार.
की आजच्या समस्येचा विचार आम्ही आणखी हजार वर्षांनी करणार

मला वाटते वामन आता नाही. तो चिरंजीव नाही.
तेव्हा हा धागा तो वाचेल असे नाही

मग लिहिण्याचा उद्देश काय असावा बरे !

गंगाधर मुटे's picture

18 May 2013 - 4:49 pm | गंगाधर मुटे

@ आशु जोग

आपले आठ प्रतिसाद हे आपल्या मनात या कवितेने अस्वस्थता/हलचल निर्माण केल्याचे निदर्शक आहे. याचा अर्थ ही कविता सफल झाली आहे.

आपण बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. प्रतिसादातून त्या सर्व प्रश्नांचा उहापोह करणे शक्य होत नाही. मात्र एकएक मुद्दा घेऊन चर्चा केल्यास काहीतरी उपयोगाचे होऊ शकते.

आजच्या आत्महत्या पुराणातला काही हजार वर्षापूर्वीचा वामन कसा रोखणार?

याचे उत्तर कठीण नाही,वेगवेगळ्या तर्‍हेची उत्तरे जशी मला देता येईल, तशी बहूतेक मिपाकर सुद्दा उत्तर देऊ शकतील.

या पेक्षा

शेतकर्‍यांच्या आत्महत्या वामन नाही रोखणार तर कोण रोखणार?

हाच प्रश्न अत्यंत जटील आहे. याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या एकहाती रोखू शकेल असा मनुष्य सबंध भुतलावर तरी आज उपलब्ध नाहीये.

शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचे सामर्थ्य ना कृषिमंत्र्यात आहे ना पंतप्रधानात. शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच बदलने गरजेचे आहे.

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 9:48 pm | गंगाधर मुटे

मला वाटते वामन आता नाही. तो चिरंजीव नाही.

वामन नाही? कवितेत वामन शब्द आल्याबरोबर दोन वर्षात माझा धागा पहिल्यांदाच गाजायला आणि वाजायला निघाला आहे.

वामन अजूनही तुमच्या आणि माझ्या मनात जिवंतच आहे.

आणि वामनी वृत्ती? ती तर अजरामर आहे. खुर्चीवर बसणारा प्रत्येक सत्ताधारी शेतकर्‍याला गाडायलाच निघतो. काही सत्ताधारी वामनाचेही बाप निघतात. वामनाने बळीराजाला एकचदा गाडले. हे तर दररोज गाडतात.

गंगाधर मुटे's picture

18 May 2013 - 4:07 pm | गंगाधर मुटे

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गालगा गालगागा गागाल गालगा

- U - - U - - - - U - U -

लघुगुरूंचा क्रम वरिलप्रमाणे येतो.

अशा तर्‍हेच वृत्त जर नोंद झालेले असेल तर फारच चांगले.

धन्यवाद.

आशु जोग's picture

18 May 2013 - 11:17 pm | आशु जोग

गंगाधर मुटे

तुम्ही पुन्हा धागा गुंडाळण्याच्या का मागे लागलाय

मी अस्वस्थ झालो का ते नंतर पाहू.

आपण बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. प्रतिसादातून त्या सर्व प्रश्नांचा उहापोह करणे शक्य होत नाही. मात्र एकएक मुद्दा घेऊन चर्चा केल्यास काहीतरी उपयोगाचे होऊ शकते.

प्रश्न मी नाही उपस्थित केले, आपण जे लिहिलत ते जबाबदारीने समजावून द्या

शंकांचे निरसन करावे

आशु जोग's picture

18 May 2013 - 11:29 pm | आशु जोग

तुमच्या लिखाणात तुम्ही म्हटल्याप्रमाणे वामन कोठून आणायचा

गंगाधर मुटे's picture

19 May 2013 - 7:44 pm | गंगाधर मुटे

तुमच्या लिखाणात तुम्ही म्हटल्याप्रमाणे वामन कोठून आणायचा

वामन आणायचा असे मी कुठे म्हटले? वामन म्हणजे काय बकरीच पिल्लू आहे? की बांधला गळ्याला दोर आणि आणले ओढत!

शिवाय वामन कोठून आणायचा याचा विचारही करता येईल पण कशाला आणायचा याचे कारण तर मला तुमच्याकडून जाणून घ्यावे लागेल ना?

आशु जोग's picture

20 May 2013 - 2:47 am | आशु जोग

शीर्षक - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्‍याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्‍याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?

वामन आणायचा असे मी कुठे म्हटले?

संपादकमहोदय
मुटेकाका यांची वरील दोन विधाने पहावीत. हा धागा सिरीयस असेल तर इथे असला कालापव्यय नको.
जे लिहीलं त्याचा खुलासा मिळाला तर बरे होइल.

मुटेकाका,

तुमचेच मुद्दे तुम्ही खोडून काढताय.
आणि एकूण तुम्ही काय लिहिलय हेही तुम्हाला सांगता येत नाहीये

शीर्षकदेखील तुम्ही स्पष्ट करु शकत नाही.

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 10:10 am | गंगाधर मुटे

शेतकर्‍याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी वामनाने घ्यावी यासाठी त्याला तो कुठे आहे, याचा शोध घेऊन मी त्याला पकडून आणून तुमच्या सामोर पेश करायचे काय?

की वामनाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि मी त्याचा बॉस आहे असे समजून शो कॉज नोटीस द्यावा? :)

शेतकर्यांच्या आत्महत्या वामन नाही रोखणार तर कोण रोखणार?
हाच प्रश्न अत्यंत जटील आहे. याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. शेतकर्यांच्या आत्महत्त्या एकहाती रोखू शकेल असा मनुष्य सबंध भुतलावर तरी आज उपलब्ध नाहीये.
शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याचे सामर्थ्य ना कृषिमंत्र्यात आहे ना पंतप्रधानात. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच बदलने गरजेचे आहे.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

वामन आणायचा असे मी कुठे म्हटले? वामन म्हणजे काय बकरीच पिल्लू आहे? की बांधला गळ्याला दोर आणि आणले ओढत!

शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी वामनाने घ्यावी यासाठी त्याला तो कुठे आहे, याचा शोध घेऊन मी त्याला पकडून आणून तुमच्या सामोर पेश करायचे काय?
की वामनाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि मी त्याचा बॉस आहे असे समजून शो कॉज नोटीस द्यावा?
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

कवी- गन्गाधर मुटे...यांची ही वामना'कडे (पदर पसरुन) अभयदान मागणारी प्रार्थना किन्वा कविता वाचल्यावर ----... 'एका (विद्रोही) कवीमनाच्या मानसिक हिन्दोळ्यांचे (वाट्टेल तसे) हेलकावे'... असेच वर्णन करावेसे वाटते.... :) असो... :) :)

मुळात कवीला हे मान्य आहे.. की काही हजारो वर्षांपूर्वी ज्या वामनाने(भगवान महाविष्णु'च्या बटुअवताराने) बळी'नामक एका राजाला पाताळात गाडले होते.. तो वामन-बटु बळीला पाताळात गाडून कधीच तपश्चर्येला दक्षिणेकडे निघून गेला. आणि नन्तर आपले अवतारकार्य सम्पवून पुन्हा महाविष्णुच्या मूळरूपातही समाविष्ट झाला. पण अजून तो लाखो वर्षांपूर्वीचा तेजस्वी वामनबटु कवीच्या मनात मात्र कायमस्वरूपी घर करून आहे. त्यामुळेच कवी वामनाकडे याचना करीत आहे.
पण सध्या होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना सर्वस्वी जबाबदार असलेले आणि मुख्य म्हणजे.... सध्या जिवन्त असलेले प्रत्यक्ष कृषीमन्त्री किंवा पन्तप्रधान हे 'जबाबदार' लोक देखील आत्महत्या थाम्बवण्यासाठी काहीही करू शकत नाही / शकलेले नाही/ शकणारही नाही........ हे अन्तिम सत्यही कवी नाकारू शकत नाही. ..(केवढा मोठा दैवदुर्विलास्स्स!!!!! )

आणि कवीची खरी कुचम्बणा येथेच्च सुरु होते.... कारण कवी प्रत्यक्ष रीत्या "कृषिमन्त्र्या"ना काहीच करू शकत नाही.. कदाचित कवीला येथे "कृषिमन्त्र्या"चा चेहरा पाहिला..की बहुधा वामनबटु'कडून पाताळात गाडल्या गेलेल्या "बळीराजा"चा चेहरा आठवत असावा!!! =)) =)) फक्त फरक इतकाच्च की वामनबटुने 'त्या'बळीच्या मस्तकावर पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले...आणि या बळी-मन्त्र्या'च्या मात्र मुखकमलावर वामनाचा पाय पडलेला दिस्तोये... त्यामुळेच ते 'मुखकमल'कायमचेच वाकडे घडवून दिल्यासारखे वाट्टे!!!! असो....
सान्गण्याचा मुद्दा.. इतकाच.. की सध्या'च्या शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्यांना जबाबदार असणार्‍या सध्या'च्या कृषिमन्त्र्या'वर उर्फ बळी-मन्त्र्या'वर कवी'चा राग नाही... किन्वा जरी असला.. तरी तो इथे व्यक्त करण्याची हिम्मत कवीमध्ये नाही...( हा हा.. न जाणो... पुढच्या साहित्य सम्मेलनात कवी'वर बन्दी वगैरे घातली तर्र्र? ;) )
मग.. हा राग कवी वामना'वर व्यक्त करतो... कधी वामनाला बकरीचे पिल्लू.. तर कधी चतुर्थश्रेणी कामगार म्हणवून घेतात...आणि स्वतःची विद्रोही 'भडास' काढतात...त्यामुळे आपल्याला कळतच्च नाही.. की कवीचे दु:खाचे नक्की कारण काय आहे?--- कवीला नक्की राग कश्याचा आहे?.... गलिच्छ राजकारण्यांमुळे हतबल शेतकरी आत्महत्या करताहेत याचा.. की लाखो वर्षांपूर्वी वामनाने बळीला पाताळात गाडले.. याचा?
बरं.. वरती एका ठिकाणी आशू जोग' यांनी विचारलेला एक प्रश्न मात्र कवीने अनुत्तरीतच ठेवला.. तो म्हणजे "शिवाजींच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत होते का?.. आणि जर नसतील.. तर मग सध्याच्या आत्महत्यांना 'वामन' कसा काय जबाबदार ? आणि या प्रश्नाचे उत्तर मात्र कवीने अत्यन्त खुबीने टाळलेले आहे....असो!...... एकन्दरीत कवी'चा राग नक्की कुणावर आणि का आहे.. ह्याचे उत्तर तर सर्वांनाच माहित आहे..... असो!...

बाकी वामन म्हणा..परशुराम म्हणा... किन्वा गौतम बुद्ध म्हणा..... सगळे 'आपल्या' भगवान महाविष्णुचेच्च अवतार... नाही का?... प्रत्येक अवतारात लोकांच्या कल्याणासाठीच्च आणि उद्धारासाठीच्च कार्य केले गेले आहे.. नाही का? :) :) :)

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 11:11 pm | गंगाधर मुटे

मृगनयनी,
तुमचा प्रतिसाद कविता सोडून कवीवर अर्थात व्यक्तिगत पातळीवर उतरला आहे. मात्र माझा यावर आक्षेप नाहीये. पण भिती वाटते की, अलिया भोगासी सादर होऊन उत्तरादाखल माझ्यावरही व्यक्तिगत पातळीवर उतरायची वेळ येऊ शकते. आणि ही अत्यंत वाईट बाब आहे, असे मला वाटते. असो.

कवी- गन्गाधर मुटे...यांची ही वामना'कडे (पदर पसरुन) अभयदान मागणारी प्रार्थना किन्वा कविता वाचल्यावर ----... 'एका (विद्रोही) कवीमनाच्या मानसिक हिन्दोळ्यांचे (वाट्टेल तसे) हेलकावे'... असेच वर्णन करावेसे वाटते....

तसे करण्याचा रसिक/समिक्षक/टिकाकार या नात्याने तुम्हाला अधिकार आहे.

मुळात कवीला हे मान्य आहे.. की काही हजारो वर्षांपूर्वी ज्या वामनाने(भगवान महाविष्णु'च्या बटुअवताराने) बळी'नामक एका राजाला पाताळात गाडले होते.. तो वामन-बटु बळीला पाताळात गाडून कधीच तपश्चर्येला दक्षिणेकडे निघून गेला. आणि नन्तर आपले अवतारकार्य सम्पवून पुन्हा महाविष्णुच्या मूळरूपातही समाविष्ट झाला. पण अजून तो लाखो वर्षांपूर्वीचा तेजस्वी वामनबटु कवीच्या मनात मात्र कायमस्वरूपी घर करून आहे. त्यामुळेच कवी वामनाकडे याचना करीत आहे.

हे कविला मान्य आहे, हे तुम्हाला कोणी सांगीतले? दोन तीन प्रतिसादावरून एखाद्या कविला काय वाटते, हे ठरवणे, हा फारच उथळपणा झाला.

पण सध्या होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना सर्वस्वी जबाबदार असलेले आणि मुख्य म्हणजे.... सध्या जिवन्त असलेले प्रत्यक्ष कृषीमन्त्री किंवा पन्तप्रधान हे 'जबाबदार' लोक देखील आत्महत्या थाम्बवण्यासाठी काहीही करू शकत नाही / शकलेले नाही/ शकणारही नाही........ हे अन्तिम सत्यही कवी नाकारू शकत नाही.

यात कसला आला दैवदुर्विलास्स्स ??????

आणि कवीची खरी कुचम्बणा येथेच्च सुरु होते.... कारण कवी प्रत्यक्ष रीत्या "कृषिमन्त्र्या"ना काहीच करू शकत नाही..

अपुर्‍या माहितीच्या आधारे केलेले भाष्य. भाष्य करायची हौस भागविण्याचा प्रकार.

कदाचित कवीला येथे "कृषिमन्त्र्या"चा चेहरा पाहिला..की बहुधा वामनबटु'कडून पाताळात गाडल्या गेलेल्या "बळीराजा"चा चेहरा आठवत असावा!!! फक्त फरक इतकाच्च की वामनबटुने 'त्या'बळीच्या मस्तकावर पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले...आणि या बळी-मन्त्र्या'च्या मात्र मुखकमलावर वामनाचा पाय पडलेला दिस्तोये... त्यामुळेच ते 'मुखकमल'कायमचेच वाकडे घडवून दिल्यासारखे वाट्टे!!!!

एखाद्याच्या शारिरिक व्यंगावर केलेले हिणकस भाष्य.

सध्या'च्या शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्यांना जबाबदार असणार्‍या सध्या'च्या कृषिमन्त्र्या'वर उर्फ बळी-मन्त्र्या'वर कवी'चा राग नाही... किन्वा जरी असला.. तरी तो इथे व्यक्त करण्याची हिम्मत कवीमध्ये नाही.

अपुर्‍या माहितीच्या आधारे केलेले भाष्य.

कधी वामनाला बकरीचे पिल्लू.. तर कधी चतुर्थश्रेणी कामगार म्हणवून घेतात...आणि स्वतःची विद्रोही 'भडास' काढतात...

मला वाट्ते कदाचित हा माझ्या वरील प्रतिसादाच विपर्यास असावा. वामन कुठून आणायचा याला ते दिलेले उत्तर होते.

कवीला नक्की राग कश्याचा आहे?.... गलिच्छ राजकारण्यांमुळे हतबल शेतकरी आत्महत्या करताहेत याचा.. की लाखो वर्षांपूर्वी वामनाने बळीला पाताळात गाडले.. याचा?

दोन्हीचा. राजकारणी आणि वामन या दोघांचाही राग आहे.
दोनपैकी एकच पर्याय मी निवडला पाहिजे, यासाठी मी पाखंडी धर्मवादी किंवा बेगडा धर्मनिरपेक्षतावादी नाहीये.

एका ठिकाणी आशू जोग' यांनी विचारलेला एक प्रश्न मात्र कवीने अनुत्तरीतच ठेवला.. तो म्हणजे "शिवाजींच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत होते का?.. आणि जर नसतील.. तर मग सध्याच्या आत्महत्यांना 'वामन' कसा काय जबाबदार ? आणि या प्रश्नाचे उत्तर मात्र कवीने अत्यन्त खुबीने टाळलेले आहे

पहिला बळी शेतकर्‍यांचा
गंगाधर मुटे - Mon, 20/05/2013 - 21:37 ही पोस्ट वाचा. तुमच्या पोस्टच्या आधीची पोस्ट आहे ती.

एकन्दरीत कवी'चा राग नक्की कुणावर आणि का आहे.. ह्याचे उत्तर तर सर्वांनाच माहित आहे..

पण मला माहित नाहिये. सर्वांच्या मनात काय आहे, हे छाती ठोकून सांगायला मी काही तुमच्यासारखा अंतर्ज्ञानी किंवा अंतर्यामी नसेल बहूतेक.

बाकी वामन म्हणा..परशुराम म्हणा... किन्वा गौतम बुद्ध म्हणा..... सगळे 'आपल्या' भगवान महाविष्णुचेच्च अवतार... नाही का?... प्रत्येक अवतारात लोकांच्या कल्याणासाठीच्च आणि उद्धारासाठीच्च कार्य केले गेले आहे.

वामन-परशुराम-गौतम बुद्ध यांच्या तुलनेचं प्रयोजन कळलेल नाही.

मात्र एवढे मात्र म्हणता येईल आजचे सत्ताधारी सुद्धा जनकल्याणाचाच नारा देत असतात. देशवासियांना स्वस्तात खायला मिळाले पाहिजे याच धोरणापायी शेतकरी देशोधडीला लागत असतो. त्या अर्थाने दिल्लीचे सत्ताधारी देखील सगळे 'आपल्या' भगवान महाविष्णुचेच्च अकरावे अवतार आहेत, असे कुणी म्हणत असेल तर मी आक्शेप नोंदवणार नाही. :)

आशु जोग's picture

20 May 2013 - 11:26 pm | आशु जोग

मुटे
कविता तुम्हीच लिहिलीत ना ...
मागच्या सगळ्या प्रतिसादात उलटीसुलटी विधाने का करताय

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 11:31 pm | गंगाधर मुटे

माझे कुठलेच विधान उलटसुलट नाही. तुमचा काय प्रोब्लेम आहे, हे मला माहित नाही.

आशु जोग's picture

20 May 2013 - 11:51 pm | आशु जोग

आणखी एक उलटे विधान.

असो.

संपादक पाहतील योग्य काय ते

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 11:59 pm | गंगाधर मुटे

आणखी एक उलटे विधान.

चला.एकदाचा या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लावून टाकू.

कोणते विधान माझे उलट सुलट आहे? सांगा.

गंगाधर मुटे's picture

21 May 2013 - 12:01 am | गंगाधर मुटे

संपादक पाहतील योग्य काय ते

आणि वारंवार संपादकांना का मध्ये घातले जात आहे?

अविनाशकुलकर्णी's picture

20 May 2013 - 2:54 pm | अविनाशकुलकर्णी

सरकार निष्क्रिय । नेते धरणे होवू देत नाहीत मधेच पैसे हडपतात। … सावकार जगू देत नाहित। अधिकारी निधी लुट तात।

यांच्या बद्दल कुणाची ब्र काढायची हिम्मत नाही

अन वामनाच्या शेंडीला का हात घालता???

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 10:02 pm | गंगाधर मुटे

यांच्या बद्दल कुणाची ब्र काढायची हिम्मत नाही

आशा आहे की, हे वाक्य मला उद्देशून नसेल.

अन वामनाच्या शेंडीला का हात घालता???

वामनाने बळीराजाला पाताळात गाडले, असा परंपरागत समज आणि पौराणिक पुरावा आहे म्हणून.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2013 - 5:40 pm | प्रसाद गोडबोले

वामनाने बळीराजाला पाताळात गाडले, असा परंपरागत समज आणि पौराणिक पुरावा आहे

आमच्या पुराणांचया माहीती नुसार बळीला पाताळी धाडल्या नंतर तिथला राजा बनवण्यात आले , शिवाय वर्षातुन एकदा पृथ्वीवर यायची मुभाही देण्यात आली .(की जो दिवस ओणम म्हणुन साजरा होतो केरळात )

असो. स्वतःच्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी (आणि हिंदु लेचेपेचे अहिंसक आहात म्हणुन ) पौराणिक घटनांचे अर्धेमुर्धे संदर्भ उचलुन वाट्टेल तसा अर्थ लावण्याच्या मनोवृत्तीचा निषेध !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 May 2013 - 4:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

धागा थोडासा भरकटत चाललाय असे वाटते आणि काहिसा जातीय संदर्भ येउ पाहतोय असे वाटते, म्हणून जरासा खुलासा...

मूळ कथा अशी आहे की विष्णूने वामनावतार घेऊन इंद्राचे राज्य वाचवण्यासाठी बळीला पाताळात पाठवले.

बळी हा अत्यंत नितीवान राजा वर्णीलेला आहे. त्याच्या हातून इतर काही (रावण, कंस, इ,) राजांप्रमाणे काही अनितीकारक गोष्ट घडल्याचे कथेत नाही. फक्त तो इतका बलवान होता की त्याने इंद्राचे राज्य जिंकून घेतले / इंद्राला बळीच्या सामर्थ्याची भिती वाटू लागली. याचा अर्थ असा की, एका राज्यकर्त्याच्या फायद्यासाठी विष्णूने ब्राम्हणाचे "रूप" घेऊन, बाम्हणांच्या त्याकाळच्या समाजातील धार्मीक अधिकारांचा "कपटी" उपयोग करून, बळीचे राज्य काबीज केले.

बळी हा शेतकर्‍यांचे रुपक झाले आहे इतपर्यंत ठीक आहे. पण नीट पाहिले तर लक्षात येईल की मूळ गोष्टीतही वामन ब्राम्हणाचे रुपक नसून बाम्हणाच्या वेशातले राज्यकर्त्यांच्या लबाडीचे रुपक आहे.

थोडक्यात, त्याकाळी एका राजाने लबाडीचा अवलंब करून बळी नावाच्या राजाचे राज्य हिरावून घेतले आणि आजच्या काळातले राजे (राजकीय सत्ताघारी आणि त्यांचे सहाय्यक बाबू लोक... यात शेतकर्‍यांमधून अथवा समाजाच्या तथाकथीत दुर्लक्षित घटकांतून नेते / बाबू झालेले लोकही आले) केवळ सामान्य शेतकर्‍याचेच नव्हे तर त्यांच्याशी लागेबांधे नसलेल्या सर्वच सामान्य जनतेचे शोषण करताना दिसत आहेत.

आता सांगा:

कोण भरडला जात आहे आणि कोण लबाडीने मलाई खात आहे?

या सगळ्या गोष्टीत पुर्वी जात होती का? आजही आहे का?

आज आपण कोणाशी कशासाठी भांडतो आहोत?

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 9:51 pm | गंगाधर मुटे

@ इस्पीकचा एक्का
चांगली पोस्ट. :)

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 9:20 pm | गंगाधर मुटे

दिनांक १९/१०/२०१२

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक ऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे.
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक ऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------------------
आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो.

त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो.
---------------------------------------------------------------------

गंगाधर मुटे's picture

20 May 2013 - 9:23 pm | गंगाधर मुटे

http://www.misalpav.com/node/24614
*******
नाटकी बोलतात साले!
प्रेषक, गंगाधर मुटे, Thu, 25/04/2013 - 11:07
*******
बटू वामन - शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.
*******

मृगनयनी's picture

22 May 2013 - 9:59 pm | मृगनयनी

बटू वामन - शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.

वामनाने बळी'ला पाताळात गाडले.. ते महाविष्णु'च्या पाचव्या अवतारात!...त्यानन्तर सहाव्या अवतारात महाविष्णुने "परशुरामा"चा अवतार घेतला.. सातव्या अवतारात महाविष्णु- राम होता.. आठव्या अवतारात- कृष्ण.. होता... रामाच्या युगात.---सर्व शेतकरी, जनता.. आबादीआबाद होते. आजही आपण सुबत्तापूर्ण राज्याची तुलना "रामराज्या"बरोबर करतो. जनकराजाला -पक्षी: रामाच्या सासर्‍यांना- शेत नान्गरत असतानाच जी पेटी सापडली--तिच्यात 'देवी- सीता' होती...द्वापारयुगात.. भगवान श्रीकृष्णाचा भाऊ- 'बलराम' याला "हलधर" असेही म्हटले जाते... त्याच्या काळात / राज्यातही शेतकर्‍यांची स्थिती उत्तम होती. बलराम हा स्वतः शेतकरी होता..नान्गर हे त्याचे शस्त्र होते.. अगदी कलीयुगाच्या सुरुवातीलाही आकाश राजाच्या भाताच्या शेतीमध्ये एका शुभ्र-सहस्त्रदलकमलामध्ये लक्ष्मीस्वरूपा- देवी पद्मावती... ही सापडली गेली.. व पुढे ती तिरुपती-बालाजीची द्वीतिय पत्नी बनली....
तात्पर्यः- विष्णुच्या वामनावतारानन्तर त्याचे ४ अवतार होऊन गेले...तेव्हा शेतकर्‍यांची स्थिती ही अत्यन्त सम्पन्न होती..अर्थात तेव्हाचे राजे'देखील त्यांच्या "क्षत्रिय"धर्माला जागणारे होते. 'शेतकरी' हे आपले अन्नदाते आहेत... असेच समजून त्यांच्या गरजा पुरवण्यास आणि त्यांचे रक्षण करण्यास ते नेहमीच समर्थ असत!...अर्थात वामन-बटु-अवतारानन्तर देखील सर्व लोक 'बळी-राजा'ला महान विष्णुभक्तच्च मानत असत!.. किम्बहुना आजही मानतात. सप्तचिरंजीवींमध्ये वामनाने सुतल-पाताळात गाडलेल्या "बळी"राजाचेही नाव आजही आनन्दाने घेतले जाते.
हाहा.. अर्थात लाखो-अब्जावधी वर्षांपूर्वी "वामनाने बळीला पाताळात गाडले" ही (पुराणातली) गोष्ट अगदी सोयीस्करपणे लक्षात ठेवुन सध्याच्या मॉडर्न युगात- वामन-कुळा'चा उद्धार करणार्‍यांचा पुराणातील सर्वच गोष्टींवर अगदी प्रगाढ विश्वास असणार.. हे तर आता उघडच आहे... नाही का?... :)

त्याचबरोबर वामनानन्तरच्या सगळ्या युगांमध्ये जर शेतकरी आनन्दाने, सुबत्तेने आयुष्य जगत होता.. आणि आत्ताच्च
अगदी कलीयुगाच्या मध्यात..फालतू, स्वार्थी, अप्पलपोट्या बळी घेणार्या बळीमन्त्री उर्फ -कृषी-मन्त्री- @#$%$#@&$ यांच्या गलिच्छ कारभारामुळे आणि सिस्टीममुळे जर शेतकरी आत्महत्या करत असतील.. तर त्याला 'वामन'-बटु जबाबदार कसा काय?... असा प्रश्न आम्हाला तरी पडतो...की उगीचंच वामनाला किन्वा वामन'कुळाला शिव्या घालण्यासाठी कारणं शोधण्यासाठी "बळी-राजा"चं नाव वारंवार पुढे करत रहायचं?...
आणि ज्या वामना'ला आणि वामनकुळाला शिव्या घालण्याचा मोह अनेकांना आवरत नाही..... त्यांनी कृपया हेही लक्षात ठेवावे.. की ह्या वामनाचे मूळ रुप असलेल्या भगवान विष्णु'चा नववा अवतार म्हणजे- "गौतम बुद्ध"... त्यामुळे वामनाला घातलेल्या शिव्या या.. बाय डीफॉल्ट- बुद्धांनाही लागतात.... हे विसरू नये... आणि शेतकर्‍यांबद्दल आणि त्यांच्या आत्महत्यांबद्दल खरोखर कळवळा असेल... तर वामनाला किन्वा वामनकुळाला शिव्या घालण्यापेक्षा.. गेल्या अनेक वर्षांपासून बळीमन्त्री उर्फ कृषीमन्त्री.. जे कुणी आहेत... त्यांना आणि त्यांच्या कुळाला """उघड""पणे शिव्या घालाव्यात!!!!..परन्तु ज्या विष्णु-अवताराचा- वामनबटु'चा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांशी काडीचाही सम्बंध नाही... त्याला कृपया बोल लावू नयेत!...अन्यथा हे बोल विष्णु'च्या ९व्या अवतारासाठीदेखील आहेत.. असे आम्ही मानू........काळजी घेणे... कृपया....... :)

शेतकर्‍यांच्या आत्महत्ये बाबत माझा एक प्रतिसाद आठवला:---
http://www.misalpav.com/comment/430991#comment-430991

या प्रतिसादात दिलेल्या एका दुव्यातील काही ओळी ठळक करुन परत इथे देतो आहे.

Maharashtra since 2007, following the Prime Minister’s visit to Vidarbha. Union Minister for Agriculture Sharad Pawar has strictly avoided using NCRB farm data in Parliament since 2008 because the data are unpleasant. (The union government however quotes the NCRB for all other categories). Now, governments are deep into fiddling the data that goes from the States to the NCRB.

अवांतर :--- बळीराजाची गत त्याच्या विष्णु प्रेमामुळेच झाली.बळी स्वतः परम विष्णु भक्त होता,विष्णु व्यतिरिक्त कोणाचेही पुजन करायचे नाही असा त्याचा विचार होता. तेव्हा यज्ञाची सुरुवात गणेशाचे स्मरण / पुजन न केल्याने त्याच्या या कार्यात विघ्न उत्पन्न झाले.
संदर्भ :- मुद्गल पुराण

मुद्गल पुराण बरेच अलीकडचे आहे. साधारण १० व्या शतकानंतरचे. तोपर्यंत गणेशदेवता ही मुख्य देवतांत कधीच नव्हती. त्यामुळे मुद्गलपुराण अथवा गणेशपुराणात बळीराजासंदर्भात आलेले उल्लेख बरेच अलीकडचे आहेत.
बाकी वामनावतार फार प्राचीन साहित्यांत दिसत नाही. गुप्तकाळात हे अवतार प्रसिद्धीस आले. महाभारतात पण वामनावतार अगदी थोडक्यात आटोपता घेतला आहे. वनपर्वातील जयद्रथविमोक्षणउपपर्वात वामनावताराची अल्पशी माहिती आली आहे असे मला स्मरते. याच उपपर्वात वराह, नरसिंह हे अवतारसुद्धा आले आहेत पण हे भाग उघड उघड प्रक्षिप्त दिसतात

बाकी शेतकर्‍याला बळीराजा हे नाव पहिल्यांदा बहुधा म. फुले यांनी दिले आहे. 'शेतकर्‍याचा आसूड' या ग्रंथात. चुभूदेघे.

वैभव जाधव's picture

26 May 2013 - 6:36 pm | वैभव जाधव

शेतकर्‍याला बळीराजामुळेच हे नाव मिळाले असावे का? कॄष्ण बलरामातील बलरामाला पण बळीराम म्हणले जाते. त्याचे शस्त्र पण नांगर वा क्वचित मुसळ असे. त्याने नांगराने कालींदीचा पाट काढल्याची पण कथा आहे. मराठवाड्यात शेतकरी पांडवांबरोबर कॄष्णबलरामच (येळ्वसा) येळअमावस्येला पूजतात. मग कोणता बळी?
आणि म. फुल्यांचा मूळ शब्द असूड आहे. आसूड नाही. य. दि. फडके संपादित म.फुल्यांच्या समग्र लेखनात तशी दुरुस्ती आहे.

गंगाधर मुटे's picture

21 May 2013 - 9:01 am | गंगाधर मुटे

आशू जोग,
आपण आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न असे आहेत.
१) कोण वामन, आपले कृषिमंत्री का ?
२) शिवाजी महाराज, जिजामाता यांच्या काळात सुद्धा तो दारीद्र्यात होता का ?
३) आज वामन कोठून आणायचा ?
४) तुम्ही पुन्हा धागा गुंडाळण्याच्या का मागे लागलाय?
५) मागच्या सगळ्या प्रतिसादात उलटीसुलटी विधाने का करताय?

मूळ शेर असा आहे.

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले

आपण विचारलेला एकही प्रश्न शेरातून प्रकट होणार्‍या आशयाशी सुसंगत नाही. त्याला गंभीरतेने उत्तर काय देणार?

उलटसुलट विषयी :

- तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्‍याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्‍याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?
- वामन "आणायचा" असे मी कुठे म्हटले?

ही दोन्ही विधानं उलटसुलट नाही कारण शेतकर्‍याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी वामनाने घ्यावी म्हणून किंवा वामनाला अभयदान मागणे यादोन्ही स्थितीमध्ये वामनाला "आणावे" लागत नाही, प्रसन्न करावे लागते.

शिवाय देव कसा प्राप्त/प्रसन्न करायचा असतो, देवाकडून इच्छीत वरदान पदरात पाडून घेण्यासाठी काय, कशी आणि कुठे साधना करावी लागते, याची उत्तरे सर्वज्ञात आहेत, पौराणिक कथांमध्ये विपूल प्रमाणावर वर्णन आलेले आहे.

मदनबाण's picture

21 May 2013 - 12:29 pm | मदनबाण

@वल्ली
मुद्गल पुराण बरेच अलीकडचे आहे. साधारण १० व्या शतकानंतरचे. तोपर्यंत गणेशदेवता ही मुख्य देवतांत कधीच नव्हती. त्यामुळे मुद्गलपुराण अथवा गणेशपुराणात बळीराजासंदर्भात आलेले उल्लेख बरेच अलीकडचे आहेत.
बाकी वामनावतार फार प्राचीन साहित्यांत दिसत नाही. गुप्तकाळात हे अवतार प्रसिद्धीस आले. महाभारतात पण वामनावतार अगदी थोडक्यात आटोपता घेतला आहे. वनपर्वातील जयद्रथविमोक्षणउपपर्वात वामनावताराची अल्पशी माहिती आली आहे असे मला स्मरते. याच उपपर्वात वराह, नरसिंह हे अवतारसुद्धा आले आहेत पण हे भाग उघड उघड प्रक्षिप्त दिसतात

माझ्या वैयक्तिक मतानुसार पुराण अलिकडच्या काळात असल्यास त्याने काही फरक पडत नसावा.पुराण कर्त्यांच्या कार्या विषयी आणि त्यांच्या ज्ञाना विषयी संशय घ्यावा असे कोणतेही कारण सत्स्कॄदर्शनी सापडत नाही.
------
वेदकाळात अनेक देवांची स्तुती गायली गेली,तर पुढे उपनिषदात एका परब्रम्हाच्या ध्यानाला महत्व आले.वेदोत्तर काळातील्,पुराण ग्रंथात अनेक देवांची पुजा,स्तुति रुढ झाली.अर्थात अनेकांत एकत्वाचा धागा कायम राहिला.म्हणुन कोणत्याही पुजेच्या संकल्पात आपण म्हणतो श्रुतिस्मॄतीपुराणोक्त -फल्प्राप्त्यर्थम |
मुद्गल मुनींनी प्रथम दक्ष प्रजापतीला कथन केलेले हे पुराण आहे.या पुराणाला आन्त्य असे म्हंटले आहे कारण ते सर्वात शेवटचे पुराण.किंवा सर्व पुराणांच्या ज्ञानाची परिसीमा म्हणजे अन्त ज्यात झाला आहे असं श्रीगणेशाच्या योगरुपाचे वर्णन करणारे पुराण,म्हणुनही आन्त्य म्हणजे सर्वश्रेष्ठ पुराण असा अर्थ ध्वनित आहे.
कथं ज्ञेयो बुध्दे: परतर इयं बाह्यसरणिर्यंथा धीर्यस्य स्यात् स च तदुनुरुपो गणपति: |
अर्थात :- जशी ज्याची बुद्धि व मनामधील भावना त्यानुसार त्याला गणपति दिसतो.अन्यथा तो बुद्धीच्या झेपेच्या पलिकडे आहे.
इति:--- लेखक डॉ. सी.ग.देसाई

========
ज्या कथेचा संदर्भ मी दिला आहे ती मुद्ग्ल पुराणातील प्रथम खंडातील अध्याय ४६ आणि अध्याय ४७ मधे वाचावयास मिळेल.
खंड १ - अध्याय ४६
खंड १ - अध्याय ४७

अविनाशकुलकर्णी's picture

21 May 2013 - 12:38 pm | अविनाशकुलकर्णी

*अन्य व्यवसाया सारखा शेति हा पण एक व्यवसाय...
*शेतक~या कडे जमीन हे असेट असल्याने तो छोटासा का होईना पण भांडवल दार..
*शेत मजुर हे खरे कामगार
*९२-९८ दरम्यान लाखो कामगार बेकार झाले..व अनेक उद्योजक धुळीस मिळाले.त्यानी आत्महत्या केल्या नाहित ..
*शेतितले प्रष्ण व अडचणी हे शेतक~याचे व्यावसायिक प्रश्ण व त्याची उकल ते व सरकार च करु जाणे.
* वस्तु निर्माण करणा~या प्रत्येक व्यक्तिस आदर पुर्वक सलाम .शेतकरी त्या कामगारा पैकि एक त्या मुळे त्याला हि आमचा सलाम.
*शेतक~याचा अडच्णी बाबत संवेदन शिलता मनात नक्किच आहे..व प्रष्न सुट्लेच पाहिजेत
*पंजाब ..बंगाल..ओरिसा..बिहार..युपी ..हरयाणा..तमीळ..कोकण इथले शेतकरी का सुखि आहेत? याचा मागोवा घेणे गरजेचे.

आशु जोग's picture

21 May 2013 - 11:59 pm | आशु जोग

अहो पण

शेतकर्‍यांच्या आजच्या स्थितीचे काय ?
वामनामुळे आत्महत्या होताहेत का ...

अविनाशकुलकर्णी's picture

22 May 2013 - 11:39 am | अविनाशकुलकर्णी

वामनामुळे आत्महत्या होताहेत

मनुस्मृति मुळे स्त्रीया वर अत्याचार होतात..

असे फंडे मांडले जात आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2013 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले

काय करणार ?

तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||

पिंपातला उंदीर's picture

26 May 2013 - 9:54 pm | पिंपातला उंदीर

च्यामारी हा धागा होता काय आणि झाला काय? काही दिवसानी या संकेत स्थळाचे ब्राम्हण महा सभेत रुपांतर होईल अशाने. मुटे यांच्या अभिव्यक्तीचा हे जातीयवादी लोक प्रचंड विपरीत अर्थ काढत आहेत.

ब्राम्हण अमोल

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2013 - 10:38 pm | प्रसाद गोडबोले

नाही अमोल असं काही नाही . मुटेजींच्या कवितेविषयी कोनालाच काहीच शंका नाही , मुटेजींच्या शेतकर्‍यांविषयीच्या कार्याने त्यांच्या विषयी सर्वांनाच आदर वाटेल !!
पण
एकुणच सर्वच समाजात पोलरायझेशन होत आहे , भावना दुखावल्या की कोणी फतवा काढतो , कोणी मोर्चा काढुन अभ्यासक्रमातील पुस्तक हटवतो , तर कोणी व्यंगचित्रावर आक्षेप घेवुन राडा करतो . मग ब्राह्मणांनी भावना दुखावलेल्या का सहन करुन घ्यायचे ? मायनॉरीटी आहेत म्हणुन ?
दुसर्‍आ मुद्दा हा की वामनाचा संदर्भ ऑट ऑफ कन्टेक्स्ट वापरला आहे , मी वर प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे बळीला पाताळाचे राज्यही देवु केले वामनाने , सदर कवी तो उल्लेख नजरचुकीने विसरला असेल असे वाटत नाही .
तीसर्‍आ मुद्दा ब्राह्मणांच्या कडुन घोर अक्षम्य चुका झाल्या ह्यात काही शंका नाही ( अन सध्याच्या पिढ्या त्याचे प्रायश्चित्त भोगतही आहेत ) पण आज शेतकर्‍याची जी अवस्था आहे त्याला ब्राह्मण किती कारणीभुत आहेत ? कृषीमंत्री देशाचे राज्याचे ब्राह्मण आहेत का ? किती शेतकरी कृषीउपादन समित्यांवर ब्राह्मण आहेत ? किती साखरकारखान्यांच्या किल्ल्या ब्राह्मणांच्या हातात आहेत ? त्या ज्या समाजाच्या हातात आहेत त्यांच्या विषयी सदर कवी चकार अक्षर सुध्दा का काढत नाही ... एखादी येवुदेना मस्त फक्कड कविता त्यांच्याही विषयी . तर मग बोलुयात .
(ब्राह्मणांची न्युसन्स पावर कमी आहे म्हणुन चेपा त्यांना , हे लॉजिक कुठवर टॉलरेट करणार)

अभिव्यक्तीचा हे जातीयवादी लोक प्रचंड विपरीत अर्थ काढत आहेत.

हे मिपा आहे , इथे सगळे सुशिक्षित जबाबदार भारतीय नागरिक लोक आहेत , "जातीयता पाळने " इज अ वेरी स्ट्रॉन्ग वर्ड !
ब्राह्मण लोक फक्त "संकट समये प्राप्ते वयं पंचाधिकं शतम " ह्या वाक्याचे अनुसरण करत आहेत.

राग नसावा .

त.टी : खालील स्वाक्षरी नीट पाहणे .

आशु जोग's picture

26 May 2013 - 11:42 pm | आशु जोग

आता आपले काही खरे नाही
एवढेच म्हणेन

गंगाधर मुटे's picture

27 May 2013 - 10:50 am | गंगाधर मुटे

त्या ज्या समाजाच्या हातात आहेत त्यांच्या विषयी सदर कवी चकार अक्षर सुध्दा का काढत नाही ... एखादी येवुदेना मस्त फक्कड कविता त्यांच्याही विषयी . तर मग बोलुयात .

मी आजवर बरेच काही लिहिले आहे. तुम्ही वाचले नाही, हा माझा दोष नाही.

उदा.
http://www.baliraja.com/node/38 ही लिंक बघा.

जे जे आलेत ते शेतकर्‍याच्या नरडीला नख लावूनच गेले. तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत, दलालापासून व उद्योगपतीपर्यंत आणि गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वांनीच त्याने पिकविलेल्या मालास उत्पादनखर्चापेक्षा कमी भाव देऊन शेतमालाची लयलूट करण्यासाठी हातभार लावला. त्यांच्या चुकीच्या धोरणाच्या फटक्यानेच शेतकर्‍याचा संसार उध्वस्त झाला.

शेतीला अवकळा येण्याला केवळ आणि केवळ शासनयंत्रणाच कारणीभूत आहे. शेतीचे प्रश्न सुटत नाहीत कारण शेतकरी कधी शेतीच्या मुद्द्याच्या आधारावर मतदानच करीत नाही. जाती-पाती धर्म-पंथाच्या आधारावर मतदान करण्याचा या देशातल्या लोकशाहीला रोगच जडला आहे. निदान शेतकर्‍याने तरी यातून बाहेर यावे. जो शेतीचे प्रश्न सोडविणार नाही त्याला मतदानच करायचे नाही, मग तो उमेदवार त्याच्या जाती-धर्माचा का असेना, असा निश्चय करायलाच हवा. दिलेले आश्वासन पूर्ण न करणार्‍याला निवडणूकीच्या मैदानात लोळवायलाच हवे.

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2013 - 1:25 pm | प्रसाद गोडबोले

लिन्क पाहिली पण इतर कोणत्याही धर्माच्या ,समाजाच्या दैवतांवर , नेत्यांवर टीका करणारे असे काहीही अढळले नाही .
असो.

उद्दाम's picture

27 May 2013 - 1:40 pm | उद्दाम

पाताळाचे राज्य देऊ केले?

ते आणि का बुवा? आहे ते राज्य काढून घेतले... मग दुसरे द्यायचे नाटक कशाला?

शिवाय डोक्यावर पाउ देऊन खाली दाबल्यावर बिचारा बळी राज्य करायलाच कशाला जगायला तरी लायक राहिला असेल का?

गंगाधर मुटे's picture

27 May 2013 - 10:32 am | गंगाधर मुटे

एक खुलासा

मी वामन हा शब्द ब्राह्मण या अर्थाने वापरला नाही.

शिवाय शेतीच्या र्‍हासाचे कारण ब्राह्मण आहेत, असा थिल्लर विचार मी आजवर केलेला नाही.
ब्राह्मण नसणारे आणि शेतकर्‍याच्या जातीत त्याच्याच पोटी जन्म घेणारे म्हणजे शेतकर्‍यांचे हितचिंतक असतात, हेही खरे नाही.
शेतकर्‍याला ब्राह्मणांपेक्षाही त्याच्या स्वजातीयांनी जास्त लुटले आहे, हा आजवरचा आणि आजचा इतिहास आहे.

www.baliraja.com/wangeamarrahe

या लिंकवर आपणास बरेच काही वाचायला मिळू शकेल.

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2013 - 1:36 pm | प्रसाद गोडबोले

ह्या खुलाश्या बद्दल विशेष आभार !
आपण वामन ह्या ब्राह्मण अर्थाने वापरला नसणारच ह्याची खात्री होती ( आणि आहे. मी आधी आपणाशी फोनवर बोललोयही एकदा , आपल्याल आठवत नसेल कदाचित , पण मला तुमच्या विषयी प्रचंड आदर आहे हे ह्या निमित्ताने नम्य्द करु इच्छितो.)...
फक्त वातावरणच एकुण इतकं गढुळ झालय (विशेष्तः इथे पश्चिम महाराष्ट्रात ) की जरा कुठं दगडं लागला की मोहोळ उठतं तश्यातला प्रकार झालाय ....

"फक्त ब्राह्मणांचे" संदर्भ ऑट ऑफ कंटेक्क्ष्ट वापरले जावु नयेत इतकीच इच्छा आहे ( कारण आपले तसे मत नसले तरी इतरांकडुन त्याचा पोलरायझेशनसाठी वापर होणार आहे हे लक्षात घ्यावे ).

शेतकर्‍याला ब्राह्मणांपेक्षाही त्याच्या स्वजातीयांनी जास्त लुटले आहे, हा आजवरचा आणि आजचा इतिहास आहे.

हे क्लॅरीफिकेशन पाहुन बरे वाटले .

असो.

(कुठे काही "अन्याय्य" बोलुन गेलो असेन तर क्षमाप्रार्थी आहे . )