आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.
लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले
वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले
साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले
क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले
नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले
काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले
पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले
सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले
- गंगाधर मुटे
------------------------------------------------
वृत्त : अभयकांती....@
लगावली : गालगा गालगागा गागाल गालगा
------------------------------------------------
@ - अशा वृत्ताची नोंद आहे किंवा नाही, ते शोधावे लागेल.
पण हे वृत्त हरवून जाऊ नये म्हणून मी तात्पुरते नाव दिले आहे.
ही लय मला खूप आवडली. मस्त ठसकेबाज आणि ठेकेबाज गझलेची चाल तयार होतेय.
गेय गझलेसाठी फ़ारच मोहक आहे हे वृत्त.
------------------------------------------------
वाचने
17462
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान..
छान झालीय...!
@पूर्ण झाले उणे मी मातीत
कोण वामन आपले कृषिमंत्री का ?
,
उत्तर
In reply to , by आशु जोग
.
हा संदर्भ
In reply to . by आशु जोग
धन्यवाद
.
वामन म्हणजे वामनचअच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पुराणकाळातील गोष्टी करताय . आम्हाला वाटलं बळीराजाच्या आजच्या स्थितीबद्दल काही भाष्य करताय. बळीराजा आज सुखात आहे. कारण आज वामन उरला नाही.शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी
In reply to . by आशु जोग
पण वामनाने बळीराजाला पाताळात
पण वामनाने बळीराजाला पाताळात गाडल्यापासून, अगदी पुरातन काळापासून शेतकरी जो दरिद्रीत गेला तो काही केल्या सुबत्तेत येतच नाहीये, हे कटू आहे.म्हणजे शिवाजी महाराज, जिजामाता यांच्या काळात सुद्धा तो दारीद्र्यात होता का ? महाराजांना आपण शेतकर्यांचा राजा म्हणतो.पहिला बळी शेतकर्यांचा
In reply to पण वामनाने बळीराजाला पाताळात by आशु जोग
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?मुटेजी आपले शेतीविषयक लेख आम्ही वाचतो पण एक शंका म्हणून विचारतो आज वामन कोठून आणायचा ?आशु जोग.. यांच्याशी सहमत!!!..
In reply to तुम्हीच सांगा ज्याने शेतकर् by आशु जोग
राजकिय सोईचे तत्वज्ञान
In reply to आशु जोग.. यांच्याशी सहमत!!!.. by मृगनयनी
कविता आवडली
"काल अग्नीपरीक्षा त्यांनीच
In reply to कविता आवडली by पैसा
गझल छानच उतरली आहे!!! मस्तच
अरे या गझलमधे तुम्हाला दर्द
मस्तच.
.
In reply to मस्तच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ आशु जोग
In reply to . by आशु जोग
मला वाटते वामन आता नाही. तो
In reply to . by आशु जोग
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मस्तच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गंगाधर मुटे
आपण बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. प्रतिसादातून त्या सर्व प्रश्नांचा उहापोह करणे शक्य होत नाही. मात्र एकएक मुद्दा घेऊन चर्चा केल्यास काहीतरी उपयोगाचे होऊ शकते.प्रश्न मी नाही उपस्थित केले, आपण जे लिहिलत ते जबाबदारीने समजावून द्या शंकांचे निरसन करावेतुमच्या लिखाणात तुम्ही
तुमच्या लिखाणात तुम्ही
In reply to तुमच्या लिखाणात तुम्ही by आशु जोग
.
In reply to तुमच्या लिखाणात तुम्ही by गंगाधर मुटे
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?वामन आणायचा असे मी कुठे म्हटले?संपादकमहोदय मुटेकाका यांची वरील दोन विधाने पहावीत. हा धागा सिरीयस असेल तर इथे असला कालापव्यय नको. जे लिहीलं त्याचा खुलासा मिळाला तर बरे होइल. मुटेकाका, तुमचेच मुद्दे तुम्ही खोडून काढताय. आणि एकूण तुम्ही काय लिहिलय हेही तुम्हाला सांगता येत नाहीये शीर्षकदेखील तुम्ही स्पष्ट करु शकत नाही.तुमच्या सामोर पेश करायचे काय?
In reply to . by आशु जोग
शेतकर्यांच्या आत्महत्या वामन
In reply to तुमच्या सामोर पेश करायचे काय? by गंगाधर मुटे
मृगनयनी,
In reply to शेतकर्यांच्या आत्महत्या वामन by मृगनयनी
.
In reply to तुमच्या सामोर पेश करायचे काय? by गंगाधर मुटे
माझे कुठलेच विधान उलटसुलट
In reply to . by आशु जोग
.
In reply to माझे कुठलेच विधान उलटसुलट by गंगाधर मुटे
आणखी एक उलटे विधान.
In reply to . by आशु जोग
संपादक पाहतील योग्य काय ते
In reply to . by आशु जोग
सरकार निष्क्रिय । नेते धरणे
हे वाक्य मला उद्देशून नसेल.
In reply to सरकार निष्क्रिय । नेते धरणे by अविनाशकुलकर्णी
निषेध
In reply to हे वाक्य मला उद्देशून नसेल. by गंगाधर मुटे
धागा थोडासा भरकटत चाललाय असे
@ इस्पीकचा एक्का
In reply to धागा थोडासा भरकटत चाललाय असे by डॉ सुहास म्हात्रे
शेतकरी आत्महत्या
नाटकी बोलतात साले!
बटू वामन - शेतकर्यांना
In reply to नाटकी बोलतात साले! by गंगाधर मुटे
शेतकर्यांच्या आत्महत्ये बाबत
मुद्गल पुराण बरेच अलीकडचे आहे
In reply to शेतकर्यांच्या आत्महत्ये बाबत by मदनबाण
शेतकर्याला बळीराजामुळेच हे
In reply to मुद्गल पुराण बरेच अलीकडचे आहे by प्रचेतस
आशू जोग,
@वल्लीमुद्गल पुराण बरेच
*अन्य व्यवसाया सारखा शेति हा
.
वामनामुळे आत्महत्या होताहेत
In reply to . by आशु जोग
ह्म्म
In reply to वामनामुळे आत्महत्या होताहेत by अविनाशकुलकर्णी
च्यामारी हा धागा होता काय आणि
नाही अमोल
In reply to च्यामारी हा धागा होता काय आणि by पिंपातला उंदीर
.
In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले
त्या ज्या समाजाच्या हातात
In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले
आभार
In reply to त्या ज्या समाजाच्या हातात by गंगाधर मुटे
पाताळाचे राज्य देऊ केले?
In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले
एक खुलासा
एक खुलासा
मी वामन हा शब्द ब्राह्मण या अर्थाने वापरला नाही. शिवाय शेतीच्या र्हासाचे कारण ब्राह्मण आहेत, असा थिल्लर विचार मी आजवर केलेला नाही. ब्राह्मण नसणारे आणि शेतकर्याच्या जातीत त्याच्याच पोटी जन्म घेणारे म्हणजे शेतकर्यांचे हितचिंतक असतात, हेही खरे नाही. शेतकर्याला ब्राह्मणांपेक्षाही त्याच्या स्वजातीयांनी जास्त लुटले आहे, हा आजवरचा आणि आजचा इतिहास आहे. www.baliraja.com/wangeamarrahe या लिंकवर आपणास बरेच काही वाचायला मिळू शकेल.ह्या बद्दल विशेष आभार
In reply to एक खुलासा by गंगाधर मुटे