आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.
लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले
वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले
साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले
क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले
नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले
काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले
पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले
सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले
- गंगाधर मुटे
------------------------------------------------
वृत्त : अभयकांती....@
लगावली : गालगा गालगागा गागाल गालगा
------------------------------------------------
@ - अशा वृत्ताची नोंद आहे किंवा नाही, ते शोधावे लागेल.
पण हे वृत्त हरवून जाऊ नये म्हणून मी तात्पुरते नाव दिले आहे.
ही लय मला खूप आवडली. मस्त ठसकेबाज आणि ठेकेबाज गझलेची चाल तयार होतेय.
गेय गझलेसाठी फ़ारच मोहक आहे हे वृत्त.
------------------------------------------------
छान..
छान झालीय...!
@पूर्ण झाले उणे मी मातीत
कोण वामन आपले कृषिमंत्री का ?
,
उत्तर
.
हा संदर्भ
धन्यवाद
.
वामन म्हणजे वामनचअच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पुराणकाळातील गोष्टी करताय . आम्हाला वाटलं बळीराजाच्या आजच्या स्थितीबद्दल काही भाष्य करताय. बळीराजा आज सुखात आहे. कारण आज वामन उरला नाही.शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी
पण वामनाने बळीराजाला पाताळात
पण वामनाने बळीराजाला पाताळात गाडल्यापासून, अगदी पुरातन काळापासून शेतकरी जो दरिद्रीत गेला तो काही केल्या सुबत्तेत येतच नाहीये, हे कटू आहे.म्हणजे शिवाजी महाराज, जिजामाता यांच्या काळात सुद्धा तो दारीद्र्यात होता का ? महाराजांना आपण शेतकर्यांचा राजा म्हणतो.पहिला बळी शेतकर्यांचा
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?मुटेजी आपले शेतीविषयक लेख आम्ही वाचतो पण एक शंका म्हणून विचारतो आज वामन कोठून आणायचा ?आशु जोग.. यांच्याशी सहमत!!!..
राजकिय सोईचे तत्वज्ञान
कविता आवडली
"काल अग्नीपरीक्षा त्यांनीच
गझल छानच उतरली आहे!!! मस्तच
अरे या गझलमधे तुम्हाला दर्द
मस्तच.
.
@ आशु जोग
मला वाटते वामन आता नाही. तो
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गंगाधर मुटे
आपण बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. प्रतिसादातून त्या सर्व प्रश्नांचा उहापोह करणे शक्य होत नाही. मात्र एकएक मुद्दा घेऊन चर्चा केल्यास काहीतरी उपयोगाचे होऊ शकते.प्रश्न मी नाही उपस्थित केले, आपण जे लिहिलत ते जबाबदारीने समजावून द्या शंकांचे निरसन करावेतुमच्या लिखाणात तुम्ही
तुमच्या लिखाणात तुम्ही
.
तुम्हीच सांगा ज्याने शेतकर्याला पाताळात गाडले त्यानेच शेतकर्याच्या पुनरुत्थानाही जबाबदारी घ्यायला नको काय?वामन आणायचा असे मी कुठे म्हटले?संपादकमहोदय मुटेकाका यांची वरील दोन विधाने पहावीत. हा धागा सिरीयस असेल तर इथे असला कालापव्यय नको. जे लिहीलं त्याचा खुलासा मिळाला तर बरे होइल. मुटेकाका, तुमचेच मुद्दे तुम्ही खोडून काढताय. आणि एकूण तुम्ही काय लिहिलय हेही तुम्हाला सांगता येत नाहीये शीर्षकदेखील तुम्ही स्पष्ट करु शकत नाही.तुमच्या सामोर पेश करायचे काय?
शेतकर्यांच्या आत्महत्या वामन
मृगनयनी,
.
माझे कुठलेच विधान उलटसुलट
.
आणखी एक उलटे विधान.
संपादक पाहतील योग्य काय ते
सरकार निष्क्रिय । नेते धरणे
हे वाक्य मला उद्देशून नसेल.
निषेध
धागा थोडासा भरकटत चाललाय असे
@ इस्पीकचा एक्का
शेतकरी आत्महत्या
नाटकी बोलतात साले!
बटू वामन - शेतकर्यांना
शेतकर्यांच्या आत्महत्ये बाबत
मुद्गल पुराण बरेच अलीकडचे आहे
शेतकर्याला बळीराजामुळेच हे
आशू जोग,
@वल्लीमुद्गल पुराण बरेच