Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गंगाधर मुटे on Sat, 05/11/2013 - 10:35

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले

पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले

सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले

                                - गंगाधर मुटे
------------------------------------------------
वृत्त : अभयकांती....@
लगावली : गालगा गालगागा गागाल गालगा
------------------------------------------------

@ - अशा वृत्ताची नोंद आहे किंवा नाही, ते शोधावे लागेल.
पण हे वृत्त हरवून जाऊ नये म्हणून मी तात्पुरते नाव दिले आहे.
ही लय मला खूप आवडली. मस्त ठसकेबाज आणि ठेकेबाज गझलेची चाल तयार होतेय.
गेय गझलेसाठी फ़ारच मोहक आहे हे वृत्त.
------------------------------------------------

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 05/21/2013 - 12:38

Permalink

*अन्य व्यवसाया सारखा शेति हा

*अन्य व्यवसाया सारखा शेति हा पण एक व्यवसाय... *शेतक~या कडे जमीन हे असेट असल्याने तो छोटासा का होईना पण भांडवल दार.. *शेत मजुर हे खरे कामगार *९२-९८ दरम्यान लाखो कामगार बेकार झाले..व अनेक उद्योजक धुळीस मिळाले.त्यानी आत्महत्या केल्या नाहित .. *शेतितले प्रष्ण व अडचणी हे शेतक~याचे व्यावसायिक प्रश्ण व त्याची उकल ते व सरकार च करु जाणे. * वस्तु निर्माण करणा~या प्रत्येक व्यक्तिस आदर पुर्वक सलाम .शेतकरी त्या कामगारा पैकि एक त्या मुळे त्याला हि आमचा सलाम. *शेतक~याचा अडच्णी बाबत संवेदन शिलता मनात नक्किच आहे..व प्रष्न सुट्लेच पाहिजेत *पंजाब ..बंगाल..ओरिसा..बिहार..युपी ..हरयाणा..तमीळ..कोकण इथले शेतकरी का सुखि आहेत? याचा मागोवा घेणे गरजेचे.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 05/21/2013 - 23:59

Permalink

.

अहो पण शेतकर्‍यांच्या आजच्या स्थितीचे काय ? वामनामुळे आत्महत्या होताहेत का ...
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 05/22/2013 - 11:39

In reply to . by आशु जोग

Permalink

वामनामुळे आत्महत्या होताहेत

वामनामुळे आत्महत्या होताहेत मनुस्मृति मुळे स्त्रीया वर अत्याचार होतात.. असे फंडे मांडले जात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 05/26/2013 - 17:41

In reply to वामनामुळे आत्महत्या होताहेत by अविनाशकुलकर्णी

Permalink

ह्म्म

काय करणार ? तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sun, 05/26/2013 - 21:54

Permalink

च्यामारी हा धागा होता काय आणि

च्यामारी हा धागा होता काय आणि झाला काय? काही दिवसानी या संकेत स्थळाचे ब्राम्हण महा सभेत रुपांतर होईल अशाने. मुटे यांच्या अभिव्यक्तीचा हे जातीयवादी लोक प्रचंड विपरीत अर्थ काढत आहेत. ब्राम्हण अमोल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 05/26/2013 - 22:38

In reply to च्यामारी हा धागा होता काय आणि by पिंपातला उंदीर

Permalink

नाही अमोल

नाही अमोल असं काही नाही . मुटेजींच्या कवितेविषयी कोनालाच काहीच शंका नाही , मुटेजींच्या शेतकर्‍यांविषयीच्या कार्याने त्यांच्या विषयी सर्वांनाच आदर वाटेल !! पण एकुणच सर्वच समाजात पोलरायझेशन होत आहे , भावना दुखावल्या की कोणी फतवा काढतो , कोणी मोर्चा काढुन अभ्यासक्रमातील पुस्तक हटवतो , तर कोणी व्यंगचित्रावर आक्षेप घेवुन राडा करतो . मग ब्राह्मणांनी भावना दुखावलेल्या का सहन करुन घ्यायचे ? मायनॉरीटी आहेत म्हणुन ? दुसर्‍आ मुद्दा हा की वामनाचा संदर्भ ऑट ऑफ कन्टेक्स्ट वापरला आहे , मी वर प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे बळीला पाताळाचे राज्यही देवु केले वामनाने , सदर कवी तो उल्लेख नजरचुकीने विसरला असेल असे वाटत नाही . तीसर्‍आ मुद्दा ब्राह्मणांच्या कडुन घोर अक्षम्य चुका झाल्या ह्यात काही शंका नाही ( अन सध्याच्या पिढ्या त्याचे प्रायश्चित्त भोगतही आहेत ) पण आज शेतकर्‍याची जी अवस्था आहे त्याला ब्राह्मण किती कारणीभुत आहेत ? कृषीमंत्री देशाचे राज्याचे ब्राह्मण आहेत का ? किती शेतकरी कृषीउपादन समित्यांवर ब्राह्मण आहेत ? किती साखरकारखान्यांच्या किल्ल्या ब्राह्मणांच्या हातात आहेत ? त्या ज्या समाजाच्या हातात आहेत त्यांच्या विषयी सदर कवी चकार अक्षर सुध्दा का काढत नाही ... एखादी येवुदेना मस्त फक्कड कविता त्यांच्याही विषयी . तर मग बोलुयात . (ब्राह्मणांची न्युसन्स पावर कमी आहे म्हणुन चेपा त्यांना , हे लॉजिक कुठवर टॉलरेट करणार)
अभिव्यक्तीचा हे जातीयवादी लोक प्रचंड विपरीत अर्थ काढत आहेत.
हे मिपा आहे , इथे सगळे सुशिक्षित जबाबदार भारतीय नागरिक लोक आहेत , "जातीयता पाळने " इज अ वेरी स्ट्रॉन्ग वर्ड ! ब्राह्मण लोक फक्त "संकट समये प्राप्ते वयं पंचाधिकं शतम " ह्या वाक्याचे अनुसरण करत आहेत. राग नसावा . त.टी : खालील स्वाक्षरी नीट पाहणे .
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 05/26/2013 - 23:42

In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले

Permalink

.

आता आपले काही खरे नाही एवढेच म्हणेन
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Mon, 05/27/2013 - 10:50

In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले

Permalink

त्या ज्या समाजाच्या हातात

त्या ज्या समाजाच्या हातात आहेत त्यांच्या विषयी सदर कवी चकार अक्षर सुध्दा का काढत नाही ... एखादी येवुदेना मस्त फक्कड कविता त्यांच्याही विषयी . तर मग बोलुयात .
मी आजवर बरेच काही लिहिले आहे. तुम्ही वाचले नाही, हा माझा दोष नाही. उदा. http://www.baliraja.com/node/38 ही लिंक बघा. जे जे आलेत ते शेतकर्‍याच्या नरडीला नख लावूनच गेले. तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत, दलालापासून व उद्योगपतीपर्यंत आणि गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वांनीच त्याने पिकविलेल्या मालास उत्पादनखर्चापेक्षा कमी भाव देऊन शेतमालाची लयलूट करण्यासाठी हातभार लावला. त्यांच्या चुकीच्या धोरणाच्या फटक्यानेच शेतकर्‍याचा संसार उध्वस्त झाला. शेतीला अवकळा येण्याला केवळ आणि केवळ शासनयंत्रणाच कारणीभूत आहे. शेतीचे प्रश्न सुटत नाहीत कारण शेतकरी कधी शेतीच्या मुद्द्याच्या आधारावर मतदानच करीत नाही. जाती-पाती धर्म-पंथाच्या आधारावर मतदान करण्याचा या देशातल्या लोकशाहीला रोगच जडला आहे. निदान शेतकर्‍याने तरी यातून बाहेर यावे. जो शेतीचे प्रश्न सोडविणार नाही त्याला मतदानच करायचे नाही, मग तो उमेदवार त्याच्या जाती-धर्माचा का असेना, असा निश्चय करायलाच हवा. दिलेले आश्वासन पूर्ण न करणार्‍याला निवडणूकीच्या मैदानात लोळवायलाच हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 05/27/2013 - 13:25

In reply to त्या ज्या समाजाच्या हातात by गंगाधर मुटे

Permalink

आभार

लिन्क पाहिली पण इतर कोणत्याही धर्माच्या ,समाजाच्या दैवतांवर , नेत्यांवर टीका करणारे असे काहीही अढळले नाही . असो.
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Mon, 05/27/2013 - 13:40

In reply to नाही अमोल by प्रसाद गोडबोले

Permalink

पाताळाचे राज्य देऊ केले?

पाताळाचे राज्य देऊ केले? ते आणि का बुवा? आहे ते राज्य काढून घेतले... मग दुसरे द्यायचे नाटक कशाला? शिवाय डोक्यावर पाउ देऊन खाली दाबल्यावर बिचारा बळी राज्य करायलाच कशाला जगायला तरी लायक राहिला असेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Mon, 05/27/2013 - 10:32

Permalink

एक खुलासा

एक खुलासा

मी वामन हा शब्द ब्राह्मण या अर्थाने वापरला नाही. शिवाय शेतीच्या र्‍हासाचे कारण ब्राह्मण आहेत, असा थिल्लर विचार मी आजवर केलेला नाही. ब्राह्मण नसणारे आणि शेतकर्‍याच्या जातीत त्याच्याच पोटी जन्म घेणारे म्हणजे शेतकर्‍यांचे हितचिंतक असतात, हेही खरे नाही. शेतकर्‍याला ब्राह्मणांपेक्षाही त्याच्या स्वजातीयांनी जास्त लुटले आहे, हा आजवरचा आणि आजचा इतिहास आहे. www.baliraja.com/wangeamarrahe या लिंकवर आपणास बरेच काही वाचायला मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 05/27/2013 - 13:36

In reply to एक खुलासा by गंगाधर मुटे

Permalink

ह्या बद्दल विशेष आभार

ह्या खुलाश्या बद्दल विशेष आभार ! आपण वामन ह्या ब्राह्मण अर्थाने वापरला नसणारच ह्याची खात्री होती ( आणि आहे. मी आधी आपणाशी फोनवर बोललोयही एकदा , आपल्याल आठवत नसेल कदाचित , पण मला तुमच्या विषयी प्रचंड आदर आहे हे ह्या निमित्ताने नम्य्द करु इच्छितो.)... फक्त वातावरणच एकुण इतकं गढुळ झालय (विशेष्तः इथे पश्चिम महाराष्ट्रात ) की जरा कुठं दगडं लागला की मोहोळ उठतं तश्यातला प्रकार झालाय .... "फक्त ब्राह्मणांचे" संदर्भ ऑट ऑफ कंटेक्क्ष्ट वापरले जावु नयेत इतकीच इच्छा आहे ( कारण आपले तसे मत नसले तरी इतरांकडुन त्याचा पोलरायझेशनसाठी वापर होणार आहे हे लक्षात घ्यावे ).
शेतकर्‍याला ब्राह्मणांपेक्षाही त्याच्या स्वजातीयांनी जास्त लुटले आहे, हा आजवरचा आणि आजचा इतिहास आहे.
हे क्लॅरीफिकेशन पाहुन बरे वाटले . असो. (कुठे काही "अन्याय्य" बोलुन गेलो असेन तर क्षमाप्रार्थी आहे . )
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 17283 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com