मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो..
वेटिंगमधे गप्पा सुरु..
तेरा जण जमा झालेत..
नीलकांत मालक,ररामदासकाका,निदे,मकी,योगी९००,प्रास्,पन्नासराव्,मोदक्,मनोज,पंकज आणि गणपा द ग्रेट.
सर्व फोटो आणि कमेंट्स पाहून खुदूखुदू हसण्यात आले आहे..
योगी महाराजांचे ऑस्ट्रेलियातून भारतात आगमन झाल्याची नोंद घेणेत आली आहे.
प्रतिकट्ट्याप्रमाणे याही कट्ट्याच्या नेहेमीच्या यशस्वी कट्टेकर्यांच्या घुमंतू तस्मात् कट्टा उपस्थितीसुलभ भाग्याचा हेवा वाटून घेण्यात आला आहे..
मासे खाणे शिकून घेण्याचा आणखी एक चानस गमावला असलेला तरी कायमचा शाकाहारी झाल्याने गविंचा संभाव्य णिषेध टळलेला आहे..
इंदूरला नै तर नै आता श्रावणात आमच्या औरंगाबादला कट्टेच्छूंनी लवकरात लवकर येणेचे करावे ही अगत्याची विनंती.
धन्यवाद...
सदर दिनी क्षेत्रलोणावळा येथे बहुल गर्दीचा संशय मनी धरोन पुण्यनगरीतुन तिस-या प्रहरीच कुच करणे झाले, प्रंतु लोणावळक्षेत्री बहुल गर्दी भेटली नाही आणि जे भेटली ती देखील समयभान हरपवण्यास युक्त नसल्याने (सदर टिका मा.श्री. मोदक या सदगृहस्थे करविली), लोणावळा क्षेत्रे पार केल्यावर एका कालाप्यवय कारणे एका स्थळी थांबण्यात आले व आसपास असणा-या निसर्गास स्मृतिबद्ध करते जाहलो.
मग तिथुन पुढे येउन श्रीक्षेत्र महड येथे श्रीदर्शनार्थ जाणे केले प्रंतु येथे मात्र बहुल गर्दी अनुभवास आलेने किंचीत पोटपुजा करुन पुढील मार्गक्रमण योजिले. त्यानंतर मा.श्री.गुगलकीजे यांचे मार्गदर्शनानुसार तसेच सहसदस्या मा. किसनजी शिंदे, मा. प्रभो यांचे मदतीने, क्षेत्र कोपरखैरणे येथुन श्री. प्रभो यांना सहित घेउन पुढे मार्गक्रमण केले. पुन्हा कालाप्यवय करणे हेतु किंचित पोटपुजा केल्या गेली.पुढे श्री. निलकांत जे कारणे मिपासंस्थानचे धनी कीजे यांचेबरोबर प्रवास करण्याचे भाग्य लाभले ते क्षेत्र कळवा ते अंतिम स्थानापर्यंत.
अंतिम स्थानी पोहोचुन सवयींनुसार आपली माणसे कोणत्या स्थानी असावीत हा अंदाज चुकणेचा शेकडो वेळचा अनुभव पुन्हा घेणे ह्या क्रिडाप्रकारात भाग घेणेत आला. प्रंतु काही आधुनिक तंत्रज्ञानाचे साहाय्याने सर्वे लोक भेटवले. पुढे सदर संमेलनाचे दरम्यान्चे काळातील काही क्षण स्मृतिबद्ध केले, कारणे कौतुक सादर केले.
लेखनास शेवटाप्रति नेणेआधी आभार मानणे अतिशय गरज्रेचे, यात प्रमुख नावे श्री. पंकज्म जेणेकरुन सुवर्णरंगी रथातुन संमेलनस्थळी नेणे झाले, श्री. प्रास जेणेकरुन संमेलन आयोजन अतिशय उत्तम पद्धतीने संपन्न केले गेले,आणि सर्वच उपस्थितांचे आभार, जेणेकारणे आमचे मर्यादित आयुष्याकाळातील एक दिन अतिशय सुंदर पद्धतीने जगण्याचे भाग्य लाभले.
फटू क्रं - १ - हिरव्यागार लँडस्केपवर, ढगांमध्ये डोके खुपसून बसलेला ड्युक्स नोज.
फटू क्रं - २ - उंचावरून दिसणारा, अजगरासारखा सुस्तावलेला रस्ता.. पावसाची चाहूल आणि वाहनांचा रो S S.. रो S S आवाज ऐकायला भारी वाटत होते
फटू क्रं - ३, ४ आणि ५ - हिरवाई..
फटू क्रं - ६ - निदे, मकी, गणपा आणि किस्ना या थोरामोठ्यांसमवेत.. ;-)
शेवटून दुसरा फटू... नो कॉमेंट्स. :-D
कालचा माझा पहिलाच कट्टा होता. संध्याकाळी ५.३० ला पोहोचलो तेंव्हा कोणीच ओळखीचे नव्हते ! आणि रात्री कट्टा संपवून बाहेर पडताना सगळ्यांशी दोस्ती झाली.
एकदम इंफोर्माल वातावरण - प्रचंड खादाडी - वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रा मधले नवे दोस्त !
एकुणात एक अविस्मरणीय अनुभव !
ज्या कॅमेर्याने फोटो काढले आहेत तो ५ मेगापिक्सेल फोटो आणि हाय डेफिनिशन व्हिडिओ कॅमेरा आहे.
अंधारच इतका होता की कोणत्याही उपायाने (मला विशेष माहिती नसल्याने) फोटो मधे स्पष्टता आणणं शक्य होत नव्हतं. फोटोत जे दिसतंय त्याहून जास्त अंधारलेला माहोल होता. त्यात आणि मधेमधे पिवळे बल्ब कंदिलात लावलेले. म्हणजे कुठल्याही दिशेने फोटो घेऊ गेलं तर एक ना एक प्रकाशाचा गोळा बॅकग्राउंडला आहेच.
शिवाय अजून एक गोष्ट मला समजलेली नाही ती म्हणजे मोबाईलफोनमधे आलेले मोठ्या आकाराचे स्पष्ट फोटोही थेट पिकासावर शेअर केले की छोट्या स्वरुपात अन रिझोल्युशनमधे अपलोड होताहेत. त्यामुळे फुल क्वालिटीचा फोटो अपलोडवणं यासाठी लॅपटॉप / काँप्युटर हा एकच मार्ग आहे की काय असं वाटतंय..
असे पण मिपावर फटुग्रा-फरांचा सुकाळ आहे.
त्यातल्या कोणा एकाला गटवले म्हणजे झाले. ;)
(शक्य असल्यास पुढच्या वेळेस निकॉन पी-९० घेवुन (झैरात नाय काय) यायला तयार असलेला.)
बाकी खाण्या-पिण्याची जाम म्हणजे जामच चंगळ केलेली दिसत आहेच.
उदा. याच क्यामेर्याने काढलेले हे फोटो पहा. यातला एक कट्ट्याच्या वाटेवरच काढलेला आहे. हे बरे दिसताहेत, पण कट्ट्याचे फोटो मात्र थेट अपलोडवले होते त्यामधे काय गडबड झाली कळत नाही.
गवि,
असे फोटो येण्यामागचं कारण मोबाईल कॅमेर्याची व्यवस्थित सेटिंग केली नसावी. काल तुमच्याकडून फोटो घेतल्यानंतर फोटोची साईज मी पाहिली, ती KB मध्ये होती. ५ मेगापिक्सेलच्या कॅमेर्यातले फोटो १ ते २ MB मध्ये येतात. तुम्ही कॅमेर्याच्या सेटिंगमध्ये जाऊन Image Quality 'HIGH' वर ठेवा आणि Resolution सर्वात मोठ्या साईजवर सेट करा.
यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल क्षमस्व. :(
शक्य तेवढे बरे फोटो देण्याचा एक प्रयत्न करतो. बाकी फोटोंची अॅडिशन अन्य उपस्थितांनी करावी अशी विनंती आहे.
दाराज ढाबाकडे जातानाचा प्रवास..
कट्टा भरता भरता बैठक मांडून मनसोक्त गप्पा हाणणारे कट्टेकर:
कट्ट्याच्या शेवटी उरलेल्या मित्रांचा ग्रूप फोटो :
उभे - डा- उ : मनोज, पंकज, माझीही शँपेन, प्रभो, गवि,प्रास,नीलकांत, गणपा,किसन शिंदे, रामदास, मस्त कलंदर, निदे
बसलेले :मोदक,विमे
योगी आणि सुझे काहीसे आधीच निघाले होते. अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे सर्वचजण अस्पष्ट आणि अफूची चोरटी आयात करणारी टोळी वाटत असल्यास दोष दाराजच्या प्रकाशयोजनाकारांचा आहे. त्यातून दर थोड्या वेळाने तडम धडम करत भांगडा रिदम वाजवत एक ढोलकीवाला फेर्या मारत होता. तो कानाशी ढोलकं बडवत उभा राहिला की एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांचं ऐकू येणं या दोन्ही गोष्टी अशक्य व्हायच्या. मग लोक त्याच्या हातात एखादी नोट सरकवून तात्पुरती सुटका करुन घ्यायचे. प्रकाशयोजनेमुळे नीट दिसत नाही आणि ढोलकीवाल्यामुळे बोलता ऐकता येत नाही अशी बहुविकलांग अवस्था काहीकाळ प्राप्त झाली होती.
गवि आणी प्रास यांच्या डोक्याभोवती काय तेजोवलय आलयं ;)
हा मालकांशेजारी उभे रहाण्याचा तर परिणाम नाही ना ? किंवा साक्षात प्रभुजी बाजुस आहेत म्हणुन.
बाकी प्रतिसादातील खालुन ६व्या ओळीशी सहमत.
अवांतरः निळ्या कुर्त्यावाल्याने आता जीमेल्/चेपु वरील आपला जुना फोटो बदलावा. आपण आता तितकेशे बारीक राहीलो नाही आहोत ;)
कालचा माझा पहिलाच कट्टा होता. संध्याकाळी ५.३० ला पोहोचलो तेंव्हा कोणीच ओळखीचे नव्हते ! आणि रात्री कट्टा संपवून बाहेर पडताना सगळ्यांशी दोस्ती झाली.
एकदम इंफोर्माल वातावरण - प्रचंड खादाडी - वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रा मधले नवे दोस्त !
एकुणात एक अविस्मरणीय अनुभव !
नेमक्या ह्याच गोष्टी व क्षण अनुभवण्यासाठी मिपा कट्यावर हजेरी लावणे मला अनिवार्य वाटते. पाहूया कधी योग येतो ते. कट्ट्यावरील समग्र व्रुतांत वाचण्यास उत्सुक
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला म्हणून त्यांचे आभार.
'बेवडा चिकन' हे पदार्थाचे नाव आहे यावर विश्वास बसत नाहिये.
माझ्या समजुतीप्रमाणे पांढर्या कपड्यात आहेत ते मोदकसाहेब असे समजते आणि तसे असेल तर मात्र मला धक्का बसला आहे. इतके महिने माझ्या खरडवहीत जो खोडकरपणा त्यांनी व त्यांच्या खरडवहीत मी केला त्यावेळी 'मोदक' हा एक कॉलेजकुमार असावा असे वाटले म्हणून ........ यापुढे बंद.
खिक्! :-D
सौरारा रेवतीचांदणीरावीणजी आजी..
तुमच्या खरडवहीत दंगा घालणे हा आमचा (मी+खरे) (काहीही लिहिले नाहीये! आले लगेच स्क्रोल करायला :-D) हक्क आहे. हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. ;-)
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला म्हणून त्यांचे आभार.
आभार मानलेत म्हणून आभार....
'बेवडा चिकन' हे पदार्थाचे नाव आहे यावर विश्वास बसत नाहिये.
आईशप्पथ हेच नाव होते. त्या नावामुळेच ऑर्डर केली. म्हटले फुल ना फुलाची पाकळी असावी . रम चा मस्त स्मोकी फ्लेवर होता त्याला.
माझ्या समजुतीप्रमाणे पांढर्या कपड्यात आहेत ते मोदकसाहेब असे समजते आणि तसे असेल तर मात्र मला धक्का बसला आहे. इतके महिने माझ्या खरडवहीत जो खोडकरपणा त्यांनी व त्यांच्या खरडवहीत मी केला त्यावेळी 'मोदक' हा एक कॉलेजकुमार असावा असे वाटले म्हणून ........ यापुढे बंद.
तुम्ही रामदास काकांना मोदक समजत नाही आहात ना ?? ते पण पांढऱ्या कपड्यात आहेत म्हणून विचारले ;-)
रेवतीआजैना पाहुन देखील असाच गैरसमज होउ शकेल, माझ्या डोळ्यासमोरतर रेवतीआजैचे चित्र एखाद्या छान म्हातारीचे आहे,
पिठुरलेले आणि वर रंगवलेले केस, कानातलं मशीन, एक एक कळ टाइपत कुणाचं तरी कुणाशी जुळवायचा विचार करणारी छानशी म्हातारी, प्रत्यक्ष भेटु तेंव्हा कळेल.
अवांतर - पिठुरलेले आणि वर रंगवलेले केस (फ्याशन आहे), कानातलं मशीन (ब्लु टुथ), एक एक कळ टाइपत कुणाचं तरी कुणाशी जुळवायचा (कॉलेजात नाहीतर हापिसात) विचार करणारी छानशी - ही सगळी लक्षणे एखाद्या नवयौवनेला सुद्धा लागु होतिल, हे वेगळं.
लिहिणारा कसा दिसतो हे बघायची नेहमीच उस्तुकता असते. काही नवीन चेहर्यांची ओळख झाली. वेळेअभावी मिपाचे सगळेच लेख वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे कधी-कधी संदर्भ लागत नाहीत. आजच कळलं की, निलाकांत मालक झाले आहेत ते. मी अजुन पर्यंत तात्याच मालक आहेत असं समजत होतो.
तात्यांच्या लेखांचा पंखा होतो म्हणून त्यांच्या मागोमाग पाच-एक पर्षापूर्वी मिपावर आलो. गेल्या ५ वर्षात झालेले काही बदल कळले नाहित. काही आयडी गायब झाले (वा कदाचित दुसर्या आडीने वावरत असतील) तर काही इकडे तिकडे गेले. असो, तात्यासाहेब झुकरबर्गकरांनी मिपाचा आय. पि. ओ येण्यापूर्वीच शेअर विकले तर! निलाकांतांना शुभेच्छा. मिपा परिवारामधला स्नेह असाच वृद्धिंगत होवो.
माझा पहिलाच कट्टा एकदम दणक्यत झाला. आजवर कुठल्या आनंदाला मुकत होतो याची प्रचिती आली. गफ्फांचा रंगलेला फड (अस्मादिकांना घरी तोंड उघडण्याची सवय नसल्याने श्रवणभक्तीच जास्त केली. मकीने तिच्या प्रतीने प्रयत्नांची शर्थ केली पण आम्ही बधलो नाही. ;) ), एक मेकांची यथेच्छ खेचा-खेची, रामदास काकांचे अनुभवाचे बोल, सर्व काही भन्नाट. दुपार पर्यंत कट्ट्याचा हाता तोंडाशी आलेला घास हुकतो की काय? अशी भिती लागुन राहीली होती. कट्ट्या पुर्वी प्रासभौंशी दुरद्वनीवरुन बोलणे झाले होतेच. त्यात त्यांनी त्यांच्या डोक्यावरील टांगत्या तलवारीची कल्पना दिली होती. ;)
भारतीय प्रमाण वेळे नुसार १५-२० मिनीटे कट्टयाला उशीरा पोहोचलो. त्यामुळे फार फार तर २-३ मंडळी आलेली असतील असा अंदाज होता. पण कट्टोत्सुक मंडळींनी माझा अंदाज सपशेल चुकवला. १०-१२ मंडळी आधीच हजर होती. जवळच रहात असुन उशिरा पोहोचल्याने थोडासा ओशाळलो. पण उत्तम नट असल्याने माझे भाव कुणाला ओळखता आले नाहीत. ;)
बाकी सर्व वर्णन वर आलेलं आहेच त्यामुळे माझी ठिगळं जोडत नाही. :)
असे कट्टे वारंवार होवोत. मिपाधर्म फुलत राहो. आणि त्यांना उपस्थित रहाण्याचं भाग्य लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना.
प्रतिक्रिया
संपला का कट्टा?
प्रत्तेक फोटोखाली नावे व
सर्व फोटो आणि कमेंट्स पाहून
वेगवेगळ्या खादाडीची बरीच
उर्वरित मेंबर्स..
सदर दिनी क्षेत्रलोणावळा येथे
:-)
झकास!
+१
मिपा रॉक्स !!
उद्या वृत्तांत वाचीन म्हणते.
सोमवारी सकाळीच इनो...
पहिला कट्टा : एक धमाल अनुभव !
आयला
ज्या कॅमेर्याने फोटो काढले
धन्यवाद गवि
उदा.
हो हो
गवि, असे फोटो येण्यामागचं
लई दिवसांनी कांतांच दर्शन
क्या बात है!
'गविस्तर'! जे.पी. खुपच छान,
यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल
शेवटचा फोटो म्हणजे
गवी, हे फटु चांगले आले आहेत. पण
अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे
मस्त.. मस्त.. मस्त..
झकास झालेला दिसतोय कट्टा!
पहिला सात्वीक कट्टा मी
कालचा माझा पहिलाच कट्टा होता.
मज्जाय बुवा
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. मोदकाला
खिक्! :-D
काय दंगा घालायचाय तो
स्वाक्षरी बदलून बघ बरं
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला
रेवतीआजैना पाहुन देखील असाच
१ (लघु) शंका..
मिपा कट्टा आणि कट्टेकरी जमले
*&*&(*^*@%^^*(*)_()#(*ऑ&ई&ऊर्
+१२.
विशु एकदम झक्कास फोटो आणि
हा विशु कोण???
विशु म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे
जोरदार
फोटो आवडले!
माझा पहिलाच कट्टा एकदम दणक्यत
जबराट
फक्त २ साठी