Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Sun, 07/22/2012 - 18:25
लेखनविषय (Tags)
वावर
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो.. वेटिंगमधे गप्पा सुरु.. तेरा जण जमा झालेत.. नीलकांत मालक,ररामदासकाका,निदे,मकी,योगी९००,प्रास्,पन्नासराव्,मोदक्,मनोज,पंकज आणि गणपा द ग्रेट.
  • Log in or register to post comments
  • 24482 views

प्रतिक्रिया

Submitted by स्मिता. on Sun, 07/22/2012 - 23:00

Permalink

संपला का कट्टा?

मी हा धागा जरा उशीरानेच पाहिला. कट्टा संपला वाटतं, उद्या वृत्तांत वाचायला उत्सुक!
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Sun, 07/22/2012 - 23:03

Permalink

प्रत्तेक फोटोखाली नावे व

प्रत्तेक फोटोखाली नावे व माहिती डकवल्याशिवाय प्रतिक्रीया देणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Sun, 07/22/2012 - 23:17

Permalink

सर्व फोटो आणि कमेंट्स पाहून

सर्व फोटो आणि कमेंट्स पाहून खुदूखुदू हसण्यात आले आहे.. योगी महाराजांचे ऑस्ट्रेलियातून भारतात आगमन झाल्याची नोंद घेणेत आली आहे. प्रतिकट्ट्याप्रमाणे याही कट्ट्याच्या नेहेमीच्या यशस्वी कट्टेकर्‍यांच्या घुमंतू तस्मात् कट्टा उपस्थितीसुलभ भाग्याचा हेवा वाटून घेण्यात आला आहे.. मासे खाणे शिकून घेण्याचा आणखी एक चानस गमावला असलेला तरी कायमचा शाकाहारी झाल्याने गविंचा संभाव्य णिषेध टळलेला आहे.. इंदूरला नै तर नै आता श्रावणात आमच्या औरंगाबादला कट्टेच्छूंनी लवकरात लवकर येणेचे करावे ही अगत्याची विनंती. धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 07/22/2012 - 23:39

Permalink

वेगवेगळ्या खादाडीची बरीच

वेगवेगळ्या खादाडीची बरीच रेलचेल झाली,असं दिसतय एकुण! :-) माताय,,,,मिसलो आंम्ही यावेळी! :-(
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sun, 07/22/2012 - 23:53

Permalink

उर्वरित मेंबर्स..

Image removed. उर्वरित मेंबर्स..
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 07/24/2012 - 07:46

In reply to उर्वरित मेंबर्स.. by गवि

Permalink

सदर दिनी क्षेत्रलोणावळा येथे

सदर दिनी क्षेत्रलोणावळा येथे बहुल गर्दीचा संशय मनी धरोन पुण्यनगरीतुन तिस-या प्रहरीच कुच करणे झाले, प्रंतु लोणावळक्षेत्री बहुल गर्दी भेटली नाही आणि जे भेटली ती देखील समयभान हरपवण्यास युक्त नसल्याने (सदर टिका मा.श्री. मोदक या सदगृहस्थे करविली), लोणावळा क्षेत्रे पार केल्यावर एका कालाप्यवय कारणे एका स्थळी थांबण्यात आले व आसपास असणा-या निसर्गास स्मृतिबद्ध करते जाहलो. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. मग तिथुन पुढे येउन श्रीक्षेत्र महड येथे श्रीदर्शनार्थ जाणे केले प्रंतु येथे मात्र बहुल गर्दी अनुभवास आलेने किंचीत पोटपुजा करुन पुढील मार्गक्रमण योजिले. त्यानंतर मा.श्री.गुगलकीजे यांचे मार्गदर्शनानुसार तसेच सहसदस्या मा. किसनजी शिंदे, मा. प्रभो यांचे मदतीने, क्षेत्र कोपरखैरणे येथुन श्री. प्रभो यांना सहित घेउन पुढे मार्गक्रमण केले. पुन्हा कालाप्यवय करणे हेतु किंचित पोटपुजा केल्या गेली.पुढे श्री. निलकांत जे कारणे मिपासंस्थानचे धनी कीजे यांचेबरोबर प्रवास करण्याचे भाग्य लाभले ते क्षेत्र कळवा ते अंतिम स्थानापर्यंत. अंतिम स्थानी पोहोचुन सवयींनुसार आपली माणसे कोणत्या स्थानी असावीत हा अंदाज चुकणेचा शेकडो वेळचा अनुभव पुन्हा घेणे ह्या क्रिडाप्रकारात भाग घेणेत आला. प्रंतु काही आधुनिक तंत्रज्ञानाचे साहाय्याने सर्वे लोक भेटवले. पुढे सदर संमेलनाचे दरम्यान्चे काळातील काही क्षण स्मृतिबद्ध केले, कारणे कौतुक सादर केले. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. लेखनास शेवटाप्रति नेणेआधी आभार मानणे अतिशय गरज्रेचे, यात प्रमुख नावे श्री. पंकज्म जेणेकरुन सुवर्णरंगी रथातुन संमेलनस्थळी नेणे झाले, श्री. प्रास जेणेकरुन संमेलन आयोजन अतिशय उत्तम पद्धतीने संपन्न केले गेले,आणि सर्वच उपस्थितांचे आभार, जेणेकारणे आमचे मर्यादित आयुष्याकाळातील एक दिन अतिशय सुंदर पद्धतीने जगण्याचे भाग्य लाभले.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 07/25/2012 - 00:25

In reply to सदर दिनी क्षेत्रलोणावळा येथे by ५० फक्त

Permalink

:-)

फटू क्रं - १ - हिरव्यागार लँडस्केपवर, ढगांमध्ये डोके खुपसून बसलेला ड्युक्स नोज. फटू क्रं - २ - उंचावरून दिसणारा, अजगरासारखा सुस्तावलेला रस्ता.. पावसाची चाहूल आणि वाहनांचा रो S S.. रो S S आवाज ऐकायला भारी वाटत होते फटू क्रं - ३, ४ आणि ५ - हिरवाई.. फटू क्रं - ६ - निदे, मकी, गणपा आणि किस्ना या थोरामोठ्यांसमवेत.. ;-) शेवटून दुसरा फटू... नो कॉमेंट्स. :-D
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 07/23/2012 - 00:14

Permalink

झकास!

कट्टा जोरदार झालेला दिसतोय. दहिसरच्या इतक्या जवळ असूनही चुकल्याने अधिक हळहळ वाटली :(
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 07/24/2012 - 10:56

In reply to झकास! by नंदन

Permalink

+१

+१ :(
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 07/23/2012 - 00:42

Permalink

मिपा रॉक्स !!

शाब्बास रे गड्यांनो. खा, प्या, हसा-खिदळा, एकमेकांची खेचा, आम्हाला १० किलो इनो घ्यायला भाग पाडा... इसी का नाम जींदगी. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 07/23/2012 - 03:29

Permalink

उद्या वृत्तांत वाचीन म्हणते.

उद्या वृत्तांत वाचीन म्हणते.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on Mon, 07/23/2012 - 09:48

Permalink

सोमवारी सकाळीच इनो...

कट्टा मस्त झालेला दिसतोय एकंदरीत...सोमवारी सकाळीच इनोची आठवण यायची बहुतेक पहिलीच वेळ!
  • Log in or register to post comments

Submitted by मनोज श्रीनिवास जोशी on Mon, 07/23/2012 - 09:54

Permalink

पहिला कट्टा : एक धमाल अनुभव !

कालचा माझा पहिलाच कट्टा होता. संध्याकाळी ५.३० ला पोहोचलो तेंव्हा कोणीच ओळखीचे नव्हते ! आणि रात्री कट्टा संपवून बाहेर पडताना सगळ्यांशी दोस्ती झाली. एकदम इंफोर्माल वातावरण - प्रचंड खादाडी - वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रा मधले नवे दोस्त ! एकुणात एक अविस्मरणीय अनुभव !
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 07/23/2012 - 10:35

Permalink

आयला

कट्ट्याला नसल्याने आमचे भरपुर नुकसान झाले आहे. भरपाइ कोण करणार ? पुढच्या वेळेस कॅमेरा जरा ठिकठाक घेवुन जाणे ही आग्रहाची नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/23/2012 - 10:51

In reply to आयला by इरसाल

Permalink

ज्या कॅमेर्‍याने फोटो काढले

ज्या कॅमेर्‍याने फोटो काढले आहेत तो ५ मेगापिक्सेल फोटो आणि हाय डेफिनिशन व्हिडिओ कॅमेरा आहे. अंधारच इतका होता की कोणत्याही उपायाने (मला विशेष माहिती नसल्याने) फोटो मधे स्पष्टता आणणं शक्य होत नव्हतं. फोटोत जे दिसतंय त्याहून जास्त अंधारलेला माहोल होता. त्यात आणि मधेमधे पिवळे बल्ब कंदिलात लावलेले. म्हणजे कुठल्याही दिशेने फोटो घेऊ गेलं तर एक ना एक प्रकाशाचा गोळा बॅकग्राउंडला आहेच. शिवाय अजून एक गोष्ट मला समजलेली नाही ती म्हणजे मोबाईलफोनमधे आलेले मोठ्या आकाराचे स्पष्ट फोटोही थेट पिकासावर शेअर केले की छोट्या स्वरुपात अन रिझोल्युशनमधे अपलोड होताहेत. त्यामुळे फुल क्वालिटीचा फोटो अपलोडवणं यासाठी लॅपटॉप / काँप्युटर हा एकच मार्ग आहे की काय असं वाटतंय..
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 07/23/2012 - 11:56

In reply to ज्या कॅमेर्‍याने फोटो काढले by गवि

Permalink

धन्यवाद गवि

असे पण मिपावर फटुग्रा-फरांचा सुकाळ आहे. त्यातल्या कोणा एकाला गटवले म्हणजे झाले. ;) (शक्य असल्यास पुढच्या वेळेस निकॉन पी-९० घेवुन (झैरात नाय काय) यायला तयार असलेला.) बाकी खाण्या-पिण्याची जाम म्हणजे जामच चंगळ केलेली दिसत आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/23/2012 - 12:36

In reply to धन्यवाद गवि by इरसाल

Permalink

उदा.

उदा. याच क्यामेर्‍याने काढलेले हे फोटो पहा. यातला एक कट्ट्याच्या वाटेवरच काढलेला आहे. हे बरे दिसताहेत, पण कट्ट्याचे फोटो मात्र थेट अपलोडवले होते त्यामधे काय गडबड झाली कळत नाही. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 07/23/2012 - 13:09

In reply to उदा. by गवि

Permalink

हो हो

अर्थातच हा सगळा उजेडाचा परिणाम दिसत आहे. नाहीतरी आजकाल कुठल्याही व्यवस्थित हॉटेलात प्रकाश मंद करुन वातावरण गडद करायची लाट आलेली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 07/23/2012 - 19:55

In reply to ज्या कॅमेर्‍याने फोटो काढले by गवि

Permalink

गवि, असे फोटो येण्यामागचं

गवि, असे फोटो येण्यामागचं कारण मोबाईल कॅमेर्याची व्यवस्थित सेटिंग केली नसावी. काल तुमच्याकडून फोटो घेतल्यानंतर फोटोची साईज मी पाहिली, ती KB मध्ये होती. ५ मेगापिक्सेलच्या कॅमेर्यातले फोटो १ ते २ MB मध्ये येतात. तुम्ही कॅमेर्याच्या सेटिंगमध्ये जाऊन Image Quality 'HIGH' वर ठेवा आणि Resolution सर्वात मोठ्या साईजवर सेट करा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 07/23/2012 - 11:07

Permalink

लई दिवसांनी कांतांच दर्शन

लई दिवसांनी कांतांच दर्शन दिसल. ( अंमळ जरा वाढल्यासारखा दिसतो आहे ;) , स्टे फिट चा मंत्र चालु आहे ना ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Mon, 07/23/2012 - 11:10

Permalink

क्या बात है!

आयला एकंदर जोरदार झालेला दिसतोय कट्टा ! जियो ! अजून चांगले फटू पघायला आणि "गविस्तर" वृत्तांत वाचायला उत्सुक. जे पी.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 07/23/2012 - 12:04

In reply to क्या बात है! by जे.पी.मॉर्गन

Permalink

'गविस्तर'! जे.पी. खुपच छान,

'गविस्तर'! जे.पी. खुपच छान, मस्त शब्द :-) -(गविस्तर शब्द आवडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/23/2012 - 14:14

Permalink

यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल

यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल क्षमस्व. :( शक्य तेवढे बरे फोटो देण्याचा एक प्रयत्न करतो. बाकी फोटोंची अ‍ॅडिशन अन्य उपस्थितांनी करावी अशी विनंती आहे. दाराज ढाबाकडे जातानाचा प्रवास.. Image removed. कट्टा भरता भरता बैठक मांडून मनसोक्त गप्पा हाणणारे कट्टेकर: Image removed. Image removed. कट्ट्याच्या शेवटी उरलेल्या मित्रांचा ग्रूप फोटो : Image removed. उभे - डा- उ : मनोज, पंकज, माझीही शँपेन, प्रभो, गवि,प्रास,नीलकांत, गणपा,किसन शिंदे, रामदास, मस्त कलंदर, निदे बसलेले :मोदक,विमे योगी आणि सुझे काहीसे आधीच निघाले होते. अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे सर्वचजण अस्पष्ट आणि अफूची चोरटी आयात करणारी टोळी वाटत असल्यास दोष दाराजच्या प्रकाशयोजनाकारांचा आहे. त्यातून दर थोड्या वेळाने तडम धडम करत भांगडा रिदम वाजवत एक ढोलकीवाला फेर्‍या मारत होता. तो कानाशी ढोलकं बडवत उभा राहिला की एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांचं ऐकू येणं या दोन्ही गोष्टी अशक्य व्हायच्या. मग लोक त्याच्या हातात एखादी नोट सरकवून तात्पुरती सुटका करुन घ्यायचे. प्रकाशयोजनेमुळे नीट दिसत नाही आणि ढोलकीवाल्यामुळे बोलता ऐकता येत नाही अशी बहुविकलांग अवस्था काहीकाळ प्राप्त झाली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 07/23/2012 - 15:03

In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि

Permalink

शेवटचा फोटो म्हणजे

गवि आणी प्रास यांच्या डोक्याभोवती काय तेजोवलय आलयं ;) हा मालकांशेजारी उभे रहाण्याचा तर परिणाम नाही ना ? किंवा साक्षात प्रभुजी बाजुस आहेत म्हणुन. बाकी प्रतिसादातील खालुन ६व्या ओळीशी सहमत. अवांतरः निळ्या कुर्त्यावाल्याने आता जीमेल्/चेपु वरील आपला जुना फोटो बदलावा. आपण आता तितकेशे बारीक राहीलो नाही आहोत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Tue, 07/24/2012 - 14:44

In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि

Permalink

गवी, हे फटु चांगले आले आहेत. पण

कट्टा भरता भरता बैठक मांडून मनसोक्त गप्पा हाणणारे कट्टेकर: या स्पेलींग मिश्टेकची नोंद घेण्यात आली आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 08/01/2012 - 22:07

In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि

Permalink

अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे

अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे सर्वचजण अस्पष्ट आणि अफूची चोरटी आयात करणारी टोळी वाटत असल्यास दोष दाराजच्या प्रकाशयोजनाकारांचा आहे. हे एकदमच लय भारी
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Mon, 07/23/2012 - 14:16

Permalink

मस्त.. मस्त.. मस्त..

मस्त.. मस्त.. मस्त..
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Mon, 07/23/2012 - 14:24

Permalink

झकास झालेला दिसतोय कट्टा!

झकास झालेला दिसतोय कट्टा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 07/23/2012 - 15:18

Permalink

पहिला सात्वीक कट्टा मी

पहिला सात्वीक कट्टा मी अ‍ॅटेंड केलेला ;) मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Mon, 07/23/2012 - 15:25

Permalink

कालचा माझा पहिलाच कट्टा होता.

कालचा माझा पहिलाच कट्टा होता. संध्याकाळी ५.३० ला पोहोचलो तेंव्हा कोणीच ओळखीचे नव्हते ! आणि रात्री कट्टा संपवून बाहेर पडताना सगळ्यांशी दोस्ती झाली. एकदम इंफोर्माल वातावरण - प्रचंड खादाडी - वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रा मधले नवे दोस्त ! एकुणात एक अविस्मरणीय अनुभव ! नेमक्या ह्याच गोष्टी व क्षण अनुभवण्यासाठी मिपा कट्यावर हजेरी लावणे मला अनिवार्य वाटते. पाहूया कधी योग येतो ते. कट्ट्यावरील समग्र व्रुतांत वाचण्यास उत्सुक
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 07/23/2012 - 20:10

Permalink

मज्जाय बुवा

मज्जाय बुवा
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 07/23/2012 - 21:39

Permalink

विमेंनी खरा वृत्तांत सांगितला

विमेंनी खरा वृत्तांत सांगितला म्हणून त्यांचे आभार. 'बेवडा चिकन' हे पदार्थाचे नाव आहे यावर विश्वास बसत नाहिये. माझ्या समजुतीप्रमाणे पांढर्‍या कपड्यात आहेत ते मोदकसाहेब असे समजते आणि तसे असेल तर मात्र मला धक्का बसला आहे. इतके महिने माझ्या खरडवहीत जो खोडकरपणा त्यांनी व त्यांच्या खरडवहीत मी केला त्यावेळी 'मोदक' हा एक कॉलेजकुमार असावा असे वाटले म्हणून ........ यापुढे बंद.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 07/23/2012 - 21:56

In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती

Permalink

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. मोदकाला

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. :D मोदकाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याच्या वयाबाबत अंदाज बांधण्यात मी सुध्दा असाच फसलो होतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 07/24/2012 - 00:13

In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. मोदकाला by किसन शिंदे

Permalink

खिक्! :-D

खिक्! :-D सौरारा रेवतीचांदणीरावीणजी आजी.. तुमच्या खरडवहीत दंगा घालणे हा आमचा (मी+खरे) (काहीही लिहिले नाहीये! आले लगेच स्क्रोल करायला :-D) हक्क आहे. हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 07/24/2012 - 07:26

In reply to खिक्! :-D by मोदक

Permalink

काय दंगा घालायचाय तो

काय दंगा घालायचाय तो घाला. माझं काऽऽऽही म्हणणं नाही. आणि असलं तरी कोण ऐकतय?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 07/24/2012 - 08:14

In reply to काय दंगा घालायचाय तो by रेवती

Permalink

स्वाक्षरी बदलून बघ बरं

स्वाक्षरी बदलून बघ बरं आज्जे!! काही फरक पडला तर पडला.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 07/24/2012 - 00:33

In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती

Permalink

विमेंनी खरा वृत्तांत सांगितला

विमेंनी खरा वृत्तांत सांगितला म्हणून त्यांचे आभार.
आभार मानलेत म्हणून आभार....
'बेवडा चिकन' हे पदार्थाचे नाव आहे यावर विश्वास बसत नाहिये.
आईशप्पथ हेच नाव होते. त्या नावामुळेच ऑर्डर केली. म्हटले फुल ना फुलाची पाकळी असावी . रम चा मस्त स्मोकी फ्लेवर होता त्याला.
माझ्या समजुतीप्रमाणे पांढर्‍या कपड्यात आहेत ते मोदकसाहेब असे समजते आणि तसे असेल तर मात्र मला धक्का बसला आहे. इतके महिने माझ्या खरडवहीत जो खोडकरपणा त्यांनी व त्यांच्या खरडवहीत मी केला त्यावेळी 'मोदक' हा एक कॉलेजकुमार असावा असे वाटले म्हणून ........ यापुढे बंद.
तुम्ही रामदास काकांना मोदक समजत नाही आहात ना ?? ते पण पांढऱ्या कपड्यात आहेत म्हणून विचारले ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 07/24/2012 - 09:48

In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती

Permalink

रेवतीआजैना पाहुन देखील असाच

रेवतीआजैना पाहुन देखील असाच गैरसमज होउ शकेल, माझ्या डोळ्यासमोरतर रेवतीआजैचे चित्र एखाद्या छान म्हातारीचे आहे, पिठुरलेले आणि वर रंगवलेले केस, कानातलं मशीन, एक एक कळ टाइपत कुणाचं तरी कुणाशी जुळवायचा विचार करणारी छानशी म्हातारी, प्रत्यक्ष भेटु तेंव्हा कळेल. अवांतर - पिठुरलेले आणि वर रंगवलेले केस (फ्याशन आहे), कानातलं मशीन (ब्लु टुथ), एक एक कळ टाइपत कुणाचं तरी कुणाशी जुळवायचा (कॉलेजात नाहीतर हापिसात) विचार करणारी छानशी - ही सगळी लक्षणे एखाद्या नवयौवनेला सुद्धा लागु होतिल, हे वेगळं.
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन कुलकर्णी on Mon, 07/23/2012 - 21:58

Permalink

१ (लघु) शंका..

'बेवडा चिकन' बनविताना खरोखर थोडाफार बेवडा टाकला होता का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Mon, 07/23/2012 - 22:13

Permalink

मिपा कट्टा आणि कट्टेकरी जमले

मिपा कट्टा आणि कट्टेकरी जमले की, बस्स धम्माल ही तर येणारच. पुढल्यावेळी निवांत वेळ काढून येईन. घाईघाईत आल्याने क्षमस्व. :) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 07/23/2012 - 22:20

Permalink

*&*&(*^*@%^^*(*)_()#(*ऑ&ई&ऊर्

*&*&(*^*@%^^*(*)_()#(*ऑ&ई&ऊर्‍ञ्ट्ञ्ञीऑवूईऑअ‍ॅपीव्पॅईऑईञी^&^&*^*(&@)(&#@&(*^(*
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 07/24/2012 - 09:59

In reply to *&*&(*^*@%^^*(*)_()#(*ऑ&ई&ऊर् by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१२.

*&*&(*^*@%^^*(*) *&*&(*^*@%^^*(*) *&*&(*^*@%^^*(*) *&*&(*^*@%^^*(*) ओळीत शिव्या दिल्यात. पुणेकर झाल्याचा फील! दुसरं काय?
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 07/23/2012 - 22:27

Permalink

विशु एकदम झक्कास फोटो आणि

विशु एकदम झक्कास फोटो :) आणि दुसरा तो छोटु एकदम क्युट :)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 07/23/2012 - 22:29

In reply to विशु एकदम झक्कास फोटो आणि by जेनी...

Permalink

हा विशु कोण???

हा विशु कोण???
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 07/24/2012 - 09:46

In reply to हा विशु कोण??? by किसन शिंदे

Permalink

विशु म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे

विशु म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 07/23/2012 - 22:38

Permalink

जोरदार

वर्णन आणि फोटाँवरून कट्टा एकंदरीत जोरदार झाला हे दिसतेच आहे! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Mon, 07/23/2012 - 22:41

Permalink

फोटो आवडले!

लिहिणारा कसा दिसतो हे बघायची नेहमीच उस्तुकता असते. काही नवीन चेहर्‍यांची ओळख झाली. वेळेअभावी मिपाचे सगळेच लेख वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे कधी-कधी संदर्भ लागत नाहीत. आजच कळलं की, निलाकांत मालक झाले आहेत ते. मी अजुन पर्यंत तात्याच मालक आहेत असं समजत होतो. तात्यांच्या लेखांचा पंखा होतो म्हणून त्यांच्या मागोमाग पाच-एक पर्षापूर्वी मिपावर आलो. गेल्या ५ वर्षात झालेले काही बदल कळले नाहित. काही आयडी गायब झाले (वा कदाचित दुसर्‍या आडीने वावरत असतील) तर काही इकडे तिकडे गेले. असो, तात्यासाहेब झुकरबर्गकरांनी मिपाचा आय. पि. ओ येण्यापूर्वीच शेअर विकले तर! निलाकांतांना शुभेच्छा. मिपा परिवारामधला स्नेह असाच वृद्धिंगत होवो.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 07/24/2012 - 08:25

Permalink

माझा पहिलाच कट्टा एकदम दणक्यत

माझा पहिलाच कट्टा एकदम दणक्यत झाला. आजवर कुठल्या आनंदाला मुकत होतो याची प्रचिती आली. गफ्फांचा रंगलेला फड (अस्मादिकांना घरी तोंड उघडण्याची सवय नसल्याने श्रवणभक्तीच जास्त केली. मकीने तिच्या प्रतीने प्रयत्नांची शर्थ केली पण आम्ही बधलो नाही. ;) ), एक मेकांची यथेच्छ खेचा-खेची, रामदास काकांचे अनुभवाचे बोल, सर्व काही भन्नाट. दुपार पर्यंत कट्ट्याचा हाता तोंडाशी आलेला घास हुकतो की काय? अशी भिती लागुन राहीली होती. कट्ट्या पुर्वी प्रासभौंशी दुरद्वनीवरुन बोलणे झाले होतेच. त्यात त्यांनी त्यांच्या डोक्यावरील टांगत्या तलवारीची कल्पना दिली होती. ;) भारतीय प्रमाण वेळे नुसार १५-२० मिनीटे कट्टयाला उशीरा पोहोचलो. त्यामुळे फार फार तर २-३ मंडळी आलेली असतील असा अंदाज होता. पण कट्टोत्सुक मंडळींनी माझा अंदाज सपशेल चुकवला. १०-१२ मंडळी आधीच हजर होती. जवळच रहात असुन उशिरा पोहोचल्याने थोडासा ओशाळलो. पण उत्तम नट असल्याने माझे भाव कुणाला ओळखता आले नाहीत. ;) बाकी सर्व वर्णन वर आलेलं आहेच त्यामुळे माझी ठिगळं जोडत नाही. :) असे कट्टे वारंवार होवोत. मिपाधर्म फुलत राहो. आणि त्यांना उपस्थित रहाण्याचं भाग्य लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 07/24/2012 - 09:47

Permalink

जबराट

तेजायला कट्टा वाईट जबराट झालेला दिसतोय . विमे, गवि.. भारी वृतांत :)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Wed, 07/25/2012 - 09:17

Permalink

फक्त २ साठी

कदाचित अजुन काही कट्टेकरी ओव्हर हँगमधुन बाहेर आलेले दिसत नाहीत म्हणुन २ प्रतिसाद कमी पडत आहेत.हा ९९ वा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com