लेखकगवियांनी रविवार, 22/07/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो..
वेटिंगमधे गप्पा सुरु..
तेरा जण जमा झालेत..
नीलकांत मालक,ररामदासकाका,निदे,मकी,योगी९००,प्रास्,पन्नासराव्,मोदक्,मनोज,पंकज आणि गणपा द ग्रेट.
यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल क्षमस्व. :(
शक्य तेवढे बरे फोटो देण्याचा एक प्रयत्न करतो. बाकी फोटोंची अॅडिशन अन्य उपस्थितांनी करावी अशी विनंती आहे.
दाराज ढाबाकडे जातानाचा प्रवास..
कट्टा भरता भरता बैठक मांडून मनसोक्त गप्पा हाणणारे कट्टेकर:
कट्ट्याच्या शेवटी उरलेल्या मित्रांचा ग्रूप फोटो :
उभे - डा- उ : मनोज, पंकज, माझीही शँपेन, प्रभो, गवि,प्रास,नीलकांत, गणपा,किसन शिंदे, रामदास, मस्त कलंदर, निदे
बसलेले :मोदक,विमे
योगी आणि सुझे काहीसे आधीच निघाले होते. अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे सर्वचजण अस्पष्ट आणि अफूची चोरटी आयात करणारी टोळी वाटत असल्यास दोष दाराजच्या प्रकाशयोजनाकारांचा आहे. त्यातून दर थोड्या वेळाने तडम धडम करत भांगडा रिदम वाजवत एक ढोलकीवाला फेर्या मारत होता. तो कानाशी ढोलकं बडवत उभा राहिला की एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांचं ऐकू येणं या दोन्ही गोष्टी अशक्य व्हायच्या. मग लोक त्याच्या हातात एखादी नोट सरकवून तात्पुरती सुटका करुन घ्यायचे. प्रकाशयोजनेमुळे नीट दिसत नाही आणि ढोलकीवाल्यामुळे बोलता ऐकता येत नाही अशी बहुविकलांग अवस्था काहीकाळ प्राप्त झाली होती.
गवि आणी प्रास यांच्या डोक्याभोवती काय तेजोवलय आलयं ;)
हा मालकांशेजारी उभे रहाण्याचा तर परिणाम नाही ना ? किंवा साक्षात प्रभुजी बाजुस आहेत म्हणुन.
बाकी प्रतिसादातील खालुन ६व्या ओळीशी सहमत.
अवांतरः निळ्या कुर्त्यावाल्याने आता जीमेल्/चेपु वरील आपला जुना फोटो बदलावा. आपण आता तितकेशे बारीक राहीलो नाही आहोत ;)
कालचा माझा पहिलाच कट्टा होता. संध्याकाळी ५.३० ला पोहोचलो तेंव्हा कोणीच ओळखीचे नव्हते ! आणि रात्री कट्टा संपवून बाहेर पडताना सगळ्यांशी दोस्ती झाली.
एकदम इंफोर्माल वातावरण - प्रचंड खादाडी - वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रा मधले नवे दोस्त !
एकुणात एक अविस्मरणीय अनुभव !
नेमक्या ह्याच गोष्टी व क्षण अनुभवण्यासाठी मिपा कट्यावर हजेरी लावणे मला अनिवार्य वाटते. पाहूया कधी योग येतो ते. कट्ट्यावरील समग्र व्रुतांत वाचण्यास उत्सुक
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला म्हणून त्यांचे आभार.
'बेवडा चिकन' हे पदार्थाचे नाव आहे यावर विश्वास बसत नाहिये.
माझ्या समजुतीप्रमाणे पांढर्या कपड्यात आहेत ते मोदकसाहेब असे समजते आणि तसे असेल तर मात्र मला धक्का बसला आहे. इतके महिने माझ्या खरडवहीत जो खोडकरपणा त्यांनी व त्यांच्या खरडवहीत मी केला त्यावेळी 'मोदक' हा एक कॉलेजकुमार असावा असे वाटले म्हणून ........ यापुढे बंद.
खिक्! :-D
सौरारा रेवतीचांदणीरावीणजी आजी..
तुमच्या खरडवहीत दंगा घालणे हा आमचा (मी+खरे) (काहीही लिहिले नाहीये! आले लगेच स्क्रोल करायला :-D) हक्क आहे. हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. ;-)
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला म्हणून त्यांचे आभार.
आभार मानलेत म्हणून आभार....
'बेवडा चिकन' हे पदार्थाचे नाव आहे यावर विश्वास बसत नाहिये.
आईशप्पथ हेच नाव होते. त्या नावामुळेच ऑर्डर केली. म्हटले फुल ना फुलाची पाकळी असावी . रम चा मस्त स्मोकी फ्लेवर होता त्याला.
माझ्या समजुतीप्रमाणे पांढर्या कपड्यात आहेत ते मोदकसाहेब असे समजते आणि तसे असेल तर मात्र मला धक्का बसला आहे. इतके महिने माझ्या खरडवहीत जो खोडकरपणा त्यांनी व त्यांच्या खरडवहीत मी केला त्यावेळी 'मोदक' हा एक कॉलेजकुमार असावा असे वाटले म्हणून ........ यापुढे बंद.
तुम्ही रामदास काकांना मोदक समजत नाही आहात ना ?? ते पण पांढऱ्या कपड्यात आहेत म्हणून विचारले ;-)
रेवतीआजैना पाहुन देखील असाच गैरसमज होउ शकेल, माझ्या डोळ्यासमोरतर रेवतीआजैचे चित्र एखाद्या छान म्हातारीचे आहे,
पिठुरलेले आणि वर रंगवलेले केस, कानातलं मशीन, एक एक कळ टाइपत कुणाचं तरी कुणाशी जुळवायचा विचार करणारी छानशी म्हातारी, प्रत्यक्ष भेटु तेंव्हा कळेल.
अवांतर - पिठुरलेले आणि वर रंगवलेले केस (फ्याशन आहे), कानातलं मशीन (ब्लु टुथ), एक एक कळ टाइपत कुणाचं तरी कुणाशी जुळवायचा (कॉलेजात नाहीतर हापिसात) विचार करणारी छानशी - ही सगळी लक्षणे एखाद्या नवयौवनेला सुद्धा लागु होतिल, हे वेगळं.
लिहिणारा कसा दिसतो हे बघायची नेहमीच उस्तुकता असते. काही नवीन चेहर्यांची ओळख झाली. वेळेअभावी मिपाचे सगळेच लेख वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे कधी-कधी संदर्भ लागत नाहीत. आजच कळलं की, निलाकांत मालक झाले आहेत ते. मी अजुन पर्यंत तात्याच मालक आहेत असं समजत होतो.
तात्यांच्या लेखांचा पंखा होतो म्हणून त्यांच्या मागोमाग पाच-एक पर्षापूर्वी मिपावर आलो. गेल्या ५ वर्षात झालेले काही बदल कळले नाहित. काही आयडी गायब झाले (वा कदाचित दुसर्या आडीने वावरत असतील) तर काही इकडे तिकडे गेले. असो, तात्यासाहेब झुकरबर्गकरांनी मिपाचा आय. पि. ओ येण्यापूर्वीच शेअर विकले तर! निलाकांतांना शुभेच्छा. मिपा परिवारामधला स्नेह असाच वृद्धिंगत होवो.
माझा पहिलाच कट्टा एकदम दणक्यत झाला. आजवर कुठल्या आनंदाला मुकत होतो याची प्रचिती आली. गफ्फांचा रंगलेला फड (अस्मादिकांना घरी तोंड उघडण्याची सवय नसल्याने श्रवणभक्तीच जास्त केली. मकीने तिच्या प्रतीने प्रयत्नांची शर्थ केली पण आम्ही बधलो नाही. ;) ), एक मेकांची यथेच्छ खेचा-खेची, रामदास काकांचे अनुभवाचे बोल, सर्व काही भन्नाट. दुपार पर्यंत कट्ट्याचा हाता तोंडाशी आलेला घास हुकतो की काय? अशी भिती लागुन राहीली होती. कट्ट्या पुर्वी प्रासभौंशी दुरद्वनीवरुन बोलणे झाले होतेच. त्यात त्यांनी त्यांच्या डोक्यावरील टांगत्या तलवारीची कल्पना दिली होती. ;)
भारतीय प्रमाण वेळे नुसार १५-२० मिनीटे कट्टयाला उशीरा पोहोचलो. त्यामुळे फार फार तर २-३ मंडळी आलेली असतील असा अंदाज होता. पण कट्टोत्सुक मंडळींनी माझा अंदाज सपशेल चुकवला. १०-१२ मंडळी आधीच हजर होती. जवळच रहात असुन उशिरा पोहोचल्याने थोडासा ओशाळलो. पण उत्तम नट असल्याने माझे भाव कुणाला ओळखता आले नाहीत. ;)
बाकी सर्व वर्णन वर आलेलं आहेच त्यामुळे माझी ठिगळं जोडत नाही. :)
असे कट्टे वारंवार होवोत. मिपाधर्म फुलत राहो. आणि त्यांना उपस्थित रहाण्याचं भाग्य लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना.
राम राम दोस्तहो!
देर आये दुरुस्त आये, या उक्तीला सार्थ करून अस्मादिक आपला कट्टा वृत्तांत देत आहोत. ;-)
महिन्याभरापूर्वी आमच्या लिखाणातली नेहमीची ;-) चूक दुरूस्त करण्याची विनंती मान्य करताना कार्यरत ;-) संपादक गणपाशेठांनी त्यांच्या मुंबई वारीची कल्पना दिली आणि त्यादरम्यान काही मिपाकरांना भेटण्याची इच्छा जाहिर केली. त्यांच्या मागल्या वेळच्या मुंबईभेटीच्या वेळी काही अपरिहार्य कारणामुळे ते घडू शकले नव्हते तेव्हा त्यांना भरपूर अपशब्दांचे धनी व्हावे लागल्याने यंदा लो प्रोफाईल कट्टा व्हावा अशी त्यांची इच्छा होती, म्हणजे या वेळच्या टांग देण्याचा जास्त गाजावाजा झाला नसता ;-)
या विषयी गवि नि विमेकाकांशी बोलल्यावर त्यांनी नि विशेषतः विमेकाकांनी लो प्रोफाईल प्रयोजन पार उडवून लावलं आणि कट्ट्याच्या जोशपूर्ण आयोजनाचा घाट घातला. व्यनितल्या मोठ्ठ्या काथ्याकुटानंतर दाराज् धाबा हे स्थळ निश्चित झालं आणि मी जाहीर धागा टाकला. धाग्यावर आणि व्यनिंतून अनेकांनी हजर राहण्याचं कळवलं नि त्यातले अनेक जण आलेही.
नीलकांत, मनोज, योगी, प्रभो, पंकज आणि गणपा यांना पहिल्यांदाच भेटलो. गवि, विमे, रामदासकाका, मोदक, सुझे, माशँ, ५०राव, निदे, मकी, किसन यांच्याइतकंच त्यांच्याशीही उत्तम मैत्र प्रस्थापित झालं. कट्ट्याला फोनवरून हजेरी लावलेल्या जयपाल नि विजुभाऊंचेही आभार. अर्थात तशीच हजेरी मकीच्या फोनवरून पैसाताईंनीही लावली. पैसाताईशी पहिल्यांदाच बोलत होतो तरी तसं जाणवलंच नाही. वर्षानुवर्षाची मैत्री असल्यासारखेच बोललो. अर्थात तिलाही असंच वाटलं असेल अशी आशा आहे ;-)
गणपाला किडनॅप करायचा प्लान अजूनही विचाराधीन आहे. यंदा इम्प्लिमेन्ट होईल अशी आशा आहे. ;-)
खादाडीत निरामिष टोक मी लढवत होतो नि मला निदे, मकी, ५० राव, किसन, पंकज आणि माशँ मदतीला होते. निदेच्या आदेशाने मी ऑर्डरी देत सुटलो. हरा भरा कबाब, नरम दिल कबाब, गोबी मंचुरियन, मकई कटोरी अशा स्टार्टर्स नंतर बेबीकॉर्न मसाला, पंजाबी दम आलू आणि दाल मखनी यांच्यासोबत रोटींची नि नानची चळत पुढे आली. माशँसाठी पनीर बटर मसाला मागवलेला कारण त्यांना तिखट नको होतं. यातलंच पनीर त्यांनी कुणाशीच शेअर केलं नाही :angry: बाकी सगळेच पदार्थ चविष्ट होते. मी, ५० राव नि माशँनी खाण्याचा शेवट भाताने केला. भात नसेल तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतंच नाही ना आम्हाला ;-)
सगळ्यांचं खाणं होऊनही अखेरपर्यंत खिंड मी लढवली नि सवयीप्रमाणे ताट स्वच्छ करूनच उठलो तोच विमेकाकांनी पंजाबी लस्सी शेअर करायचा आदेश दिला नि त्या तवरल्या अवस्थेतच आम्ही वदलो, "नेकी और पूछ पूछ?" आमचं पाहून अनेकांना लस्सी प्याविशी वाटली मग त्यानंतर लस्सी आस्वादनाचा जंगी कार्यक्रम झाला.
दाराज् च्या गेटवर ग्रूपफोटो काढल्यावर मिपाकर वेगवेगळ्या दिशेला पांगले. पण मी धाग्यावर लिहिलेला,
मिसळपाव धर्म वाढवावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥
हा कट्ट्याचा उद्देश निश्चितच पूर्ण झाला अशीच आमची सर्वांची धारणा होती.
परतताना, मिरारोड ते दादर मालक, मी नि विमेकाकांच्या संगती होते. प्रवासात नेहमीप्रमाणेच नक्षलवाद ते धर्म अशा हॉट टॉपिकांवर त्रिकोणी परिसंवाद घडला. तेव्हा तो ऐकायला आजुबाजूला जनसागर उसळलेला हे सर्व सदस्यांनी लक्षात घ्यावं नाही तर सम्मेलनात परिसंवाद घडलाच नाही असं वाटायचं, शक्य आहे का ते? :-p आणि अर्थात प्रत्यक्ष मिपाकरांच्या कट्ट्यावरच्या संवादांचे परिक्षण उघडपणे करणे अशक्य आहे. त्यावर व्यनित बोलू ;-)
एकूण काय तर मिसळपाव मान्सून सम्मेलन २०१२ उत्तम प्रकारे पार पडले. उपस्थित सर्वांचे आभार. पुढच्या अशा प्रसंगी उपस्थितीचे उच्चांक नव्याने प्रस्थापित व्हावे अशी श्रींचरणी प्रार्थना.
चांग भलं...............
प्रतिक्रिया
क्या बात है!
'गविस्तर'! जे.पी. खुपच छान,
In reply to क्या बात है! by जे.पी.मॉर्गन
यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल
शेवटचा फोटो म्हणजे
In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि
गवी, हे फटु चांगले आले आहेत. पण
In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि
अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे
In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि
मस्त.. मस्त.. मस्त..
झकास झालेला दिसतोय कट्टा!
पहिला सात्वीक कट्टा मी
कालचा माझा पहिलाच कट्टा होता.
मज्जाय बुवा
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. मोदकाला
In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती
खिक्! :-D
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. मोदकाला by किसन शिंदे
काय दंगा घालायचाय तो
In reply to खिक्! :-D by मोदक
स्वाक्षरी बदलून बघ बरं
In reply to काय दंगा घालायचाय तो by रेवती
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला
In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती
रेवतीआजैना पाहुन देखील असाच
In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती
१ (लघु) शंका..
मिपा कट्टा आणि कट्टेकरी जमले
*&*&(*^*@%^^*(*)_()#(*ऑ&ई&ऊर्
+१२.
In reply to *&*&(*^*@%^^*(*)_()#(*ऑ&ई&ऊर् by बिपिन कार्यकर्ते
विशु एकदम झक्कास फोटो आणि
हा विशु कोण???
In reply to विशु एकदम झक्कास फोटो आणि by जेनी...
विशु म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हा विशु कोण??? by किसन शिंदे
जोरदार
फोटो आवडले!
माझा पहिलाच कट्टा एकदम दणक्यत
जबराट
फक्त २ साठी
१००!!
आले कट्ट्याला...
आता मान्सून सम्मेलनाच्या वृत्तांतातले माझे चार आणे.....
माशँसाठी पनीर बटर मसाला
In reply to आता मान्सून सम्मेलनाच्या वृत्तांतातले माझे चार आणे..... by प्रास
वर्णन आवडल! दोघा तिघांकडुन
भन्नाट!!!!!!!!!!!!