सुप्रभात .. शुभ रजनी ...
कशासाठी दोस्त ?
अफजलगुरू कसाब
मजेत मस्त
आपण महागाईने
नेहमीच त्रस्त
गृहिणी टंचाईत
नित्य चिंताग्रस्त
सामान्यांची स्वप्ने
धुळीत उध्वस्त
नेतेमंडळीचे दौरे
कायम जबरदस्त
जनतेची कमाई
दलालाकडून फस्त
सभागृह नेहमी
गोंधळातच व्यस्त
गुड मॉर्निंग... गुड नाईट...
कशासाठी दोस्त ? "
काव्यरस
वाचने
1986
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितेचे शीर्षक वाचून सुसकाळ,
कवितेचे शीर्षक पाहून सुसकाळ, सुदुपार, सुसंध्याकाळ, सुरात्र असे म्हणणारे आमचे मिपाकर मित्र श्री. चचा उर्फ चतुर चाणक्य यांची आठवण झाली.
त्या निमित्ताने का होईना
In reply to कवितेचे शीर्षक वाचून सुसकाळ, by प्रचेतस
आमची आठवण आली हे महत्वाचे हो वल्लीदा सुसकाळ :)