स्टेपनीची गरज
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की.
स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे. त्याकडेला जॅक लावून गाडी वर उचलावी लागते. हरभऱ्याच्या झाडावर चढवल्याइतकी! मग गाडी अंतराळात विहरत असतांनाच अलगद नटबोल्ट खोलून मूळ चाकाऐवजी स्टेपनी रस्त्याच्या व गाडीच्या खाली चतुरतेने घ्यावी लागते. एखाद्या फूल्लटाईट चाकाचे नटबोल्ट खोलतांना त्रास होतो खरा परंतु तो सहन करायचाच. कारण पुढील काम मार्गी लागणार नसते. चाक बाजूला घेतलेय हे मूळगाडीच्या या चाकाचे त्या चाकाला कळू न देण्यातच खरा मुरब्बीपणा. स्टेपनी घेतल्याची खबर कोणालाही लागू न देता हा गनिमीकावा पार पाडावा लागतो.
तसे पाहिले तर स्टेपनी नुसतीच बाळगून फायदा नाही, तर तिचा वेळोवेळी काळजीपूर्वक वापर करता यायला हवा. स्टेपनी लावून सुखाचा प्रवास सुरु झाला की गाडीला वाटते आपल्यामुळेच रस्ता जोराचा धावतोय तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा. म्हणून तीही सहसा पंक्चर होण्यापासून स्वतःला जपत येते. अर्थात स्टेपनीलाही अडगळीत राहण्यापेक्षा रोडवरची दौड केल्याचे विलक्षण समाधान लाभत असतेच म्हणा. तिलाही चालू स्थितीत फार बरे वाटत असावे.
शेवटी काय तर एकमेकांवर अवलंबून राहण्यात बरेच फायदे गवसतात. जसे की स्टेपनी!
याद्या
10257
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा ! काय अगाध लेखन प्रतिभा
मौज आहे!!
क्रिप्टीक
>>>>लेख आवडला प्रभुसरांशी
In reply to क्रिप्टीक by विनायक प्रभू
डोक्यावरुन गेलं !!
हम्म.
स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा
तुमचं आडनाव सिद्ध करायचा चंग बांधलेला आवडला बरं का डॉ.!
हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत
In reply to तुमचं आडनाव सिद्ध करायचा चंग बांधलेला आवडला बरं का डॉ.! by चतुरंग
निषेध...
In reply to हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत by llपुण्याचे पेशवेll
असो. आम्ही आपली पूजा चालू
In reply to निषेध... by राजेश घासकडवी
स्टेपनी ...
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच..
है शाब्बास्स! य्ये हुई ना
In reply to गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. by माजगावकर
ह.घ्या.
In reply to गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. by माजगावकर
च्यायला
सुरेख श्लेष. त्या वृत्तांची
ओरिजिनलला पर्याय नाही
वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण
In reply to ओरिजिनलला पर्याय नाही by शहराजाद
कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले
In reply to वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण by विश्वनाथ मेहेंदळे
शहराजाद
In reply to ओरिजिनलला पर्याय नाही by शहराजाद
काही गाड्यांची स्टेपनी मूळ
In reply to शहराजाद by Pain
अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत.
In reply to शहराजाद by Pain
थोडं कल्पनारंजन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. औष्ठ्यसेवा..
In reply to थोडं कल्पनारंजन by राजेश घासकडवी
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे
In reply to थोडं कल्पनारंजन by राजेश घासकडवी
अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.
In reply to >>ही गाडीसंस्था फार माजली आहे by गांधीवादी
OK OK असं होय,समजले. थोडा
In reply to अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. by राजेश घासकडवी
असहमत
In reply to थोडं कल्पनारंजन by राजेश घासकडवी
साबण
In reply to थोडं कल्पनारंजन by राजेश घासकडवी
त्या ष्टेप्न्या जस्ट इन टाईम
In reply to साबण by मी_ओंकार
मोटरसायकल ला स्टेफनी नसते.
रस्त्यावरच?
In reply to मोटरसायकल ला स्टेफनी नसते. by वेताळ
स्टेफनी???
In reply to मोटरसायकल ला स्टेफनी नसते. by वेताळ
अहो..
स्टे फनी लेख !!
पंकचर टायर नाय
ला हौल विलाकुवत!
हेच म्हणतो लाहोर व्हायाकुवेत.
In reply to ला हौल विलाकुवत! by धमाल मुलगा
एकहाती
एकहाती गाडी वापरल्याने
In reply to एकहाती by प्रकाश घाटपांडे
हा .... हा .... हा .... !