स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा जास्त डेकोरेटेड , हवेशीर ठेवावे लागते. पण नुस्त्या स्टेपनीच्या भरोशावर प्रवास चालू ठेवला तर स्टेपनी पंक्चर झाल्यावर मात्र गाडी पूर्णच खाली बसते. आडरस्त्याला पंक्चरवाला मिळत नाही. त्यातून जॅक तुटलेला असेल तर दुसरी गाडी थांबवून उसना जॅक मागून घ्यावा लागतो ;)
हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत आहे.
स्वति घरात नसताना कंडू शमनार्थ रुण्डिरा खावी|
ती ही घरात नसताना स्वहस्तेच बुद्ली दाबावी ||
याचा अर्थ साधारण असा होतो की सुंठ घरात नसेल तर कंडू म्हणजे खोकला थांबवण्यासाठी खडीसाखर खावी. ती ही म्हणजे खडीसाखरही घरात नसेल तर आपल्याच हाताने (बुद्ली) पडजीभ दाबावी.
तस्मात डॉ साहेब ** ठेवा सांगण्यासाठी इतक्या शब्दांचा खटाटोप?
प्रतिसाद संपादीत केला आहे
श्री. पेशवे,
इथे गाड्या, प्रवास, त्यातल्या अडचणी, ड्रायव्हरांचे प्रश्न असल्या विषयांवर चर्चा चालू असताना तुम्ही जे अश्लीलतेकडे झुकणारे लिहिले आहे त्याचा तीव्र निषेध. बाई ठेवणे, ** राखणे, ** दाबणे हे अवांतर आहे. कृपया सदर विषयावर लिहिता येत नसेल तर किमान चर्चेमध्ये गोंधळ माजवू नये ही विनंती. आता काही जणांना नसतो ड्रायव्हिंगचा अनुभव, किंवा गती नसते, अॅक्सिडेंट वगैरे झालेले असतात. म्हणून आकस धरून असे वाह्यात वर्तन करू नये.
संपादक यात लक्ष घालतील काय?
धन्य हो डॉक्टरसाहेब ...
साष्टांग नमस्कार इथे कसा दर्शवायचा माहीत नाही म्हणून __/\__ एव्ह्ढ्यावरच भागवून घ्या ...
कदाचित ___^_/ असा दर्शवता येईल ...
>> तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा <<
हल्लीच्या स्टेपनीला ती स्टेपनी आहे हे कळले तर गाडी नुसतीच थंडावेल की कायमचीच बंद पडेल किंवा कसे .... स्टेपनी वापरण्याचा अनुभव नसल्याने सांगता येणार नाही ...
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. गाडीचा वापर जास्त असणार्यांसाठी..
परंतु ती लावायची वेळ न येणे बरं.. अर्थात इतर चार चाकांबरोबर तिचे हवा-पाणी देखील नियमित तपासून घेतो..
स्टोरेजच्या सोयीसाठी स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असण्याची पद्धत आहे. पण गाडी ओढून नेण्याच्या कामी ती मूळ चाकाइतकी स्थिर आणि सुरक्षित कधीच नसते, एवढे लक्षात असूद्या.
वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना साधारणता हे माहित असते. आणि म्हणूनच ते स्टेपनी ला मूळ चाक म्हणून नाही वापरत. मूळ चाक ते मूळ चाक आणि स्टेपनी ती स्टेपनी !!!
कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!!
(तलवारी उपसल्या जाण्याची वाट पाहणारा) वि. मे.
कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!!
अहो कसं आहे.. चालकानी स्टेप्नी बाळगणे आणि गाडीला स्टेप्नी आहे हे न कळणे जसे असते तसे गाडीनेच स्टेप्नी किंवा पर्यायी स्टँड ठेवणे आणि चालकाला याची खबरबात नसणे हे ही असते म्हणूनही असेल कदाचित.
मी जेव्हा पंक्चर चाक काढून स्टेपनी लावली होती तेव्हा दोन्हीवर लिहिलेला साइझ पाहिला होता. सारखाच होता.
मूळ चाकापेक्षा लहान आकार असणे अयोग्य आहे.
(कदाचित तुम्ही दुचाकीबद्दल बोलत असाल, मी चारचाकीबद्दल बोलत आहे.)
काही गाड्यांची स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असते. ठेवण्याच्या सोयीसाठी हे करतात असे कळले. माझा मुद्दा , मूळ चाकाचीच निगा राखून स्टेपनीची गरजच भासू नये अशी काळजी घेणे इष्ट. यापुढे प्रत्येकाची मर्जी.
अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत. भारतात मी छोटी स्टेपनी नाही पाहिली. असेलही, काही खास अनुभव नाही.
अमेरिकेत डिकीत (ट्रंक म्हणायचे बरे, डिकी म्हटले की काहीतरी वेगळेच समजतात) सहजपणे बसावे म्हणून स्टेपनी छोटी बनवतात. अशी स्टेपनी असेल तर ५५ मैल प्रती तास या गतीपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची नसते.
यातून नक्की काय काय अर्थ लोक काढतील ते तो एक श्रीराम जाणे (देव, धागाप्रवर्तक नाही)
बहुतेक वेळा आपली स्टेपनी आपण कायम गाडीतच बाळगावी अशी सिस्टिम असते. पण हा संसाधनांचा शुद्ध अपव्यय आहे. म्हणून मी नवीन सिस्टिमचा विचार करत होतो.
समजा असं केलं तर? स्टेपनी गाडीत बाळगायचीच नाही. गाडी पंक्चर झाली की मेकॅनिकला फोन करायचा, मग तो आपल्याला हवी तशी स्टेपनी आणून देईल. तात्पुरती वापरायची. नंतर मेकॅनिकला परत करायची. कशाला उगाच ती विकत घ्यायची? आणि कायम बाळगून पेट्रोल अधिक खर्च करायचं? मुळात गाडी विकत घेतली त्यात खर्च आहेच.
बरं, मेकॅनिकलाही भाडं मिळेल, आणि इतर कस्टमरांना वापरायला देता येईल. थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. तसं म्हटलं तर ती आधी कोणी इतर कस्टमरांनी वापरली आहे म्हणून आपल्याला तरी कुठे फरक पडतो? मग थोड्या स्टेपन्या खूप लोकांना पुरतील, व एकंदरीत समाजाचा स्टेपनी-विषयक खर्च देखील कमी होईल. दर वेळी सेफ्टी जरा चेक करून घ्यावी लागेल, पण मान्यवर गराजनी जर स्टेपन्या पुरवल्या तर तो धोकादेखील कमी होईल.
काही लोकांच्या मते सामाजिक वर्दळ सुरळीतपणे चालण्यासाठी अशी सिस्टिम उपयोगी ठरेल. नाहीतर काही लोक चाक पंक्चर झालं आणि स्टेपनी परवडली नाही की दुसऱ्याच्या गाड्यांची चाकं बळजबरीने पळवतात...
खरं तर आख्खी गाडीच भाड्याने घेता आली तर? अशीच कल्पना मी आधी देखील मांडली होती. पण अनुमोदनाच्या औष्ठ्यसेवेपलिकडे कोणी काही केलं नाही.
ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.
अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. आपण वापरतो नं तिला. मग अशी नावे का बरे ठेवायची ?
त्रास तर माझी गाडी पण देते, कदाचित तुमच्या गाडी पेक्षा जास्त, खूप खूप आवाज करते, खूप हादरे बसतात. माझा सगळा पगार तिच्यासाठीच संपतो. गाडी नसेल तर कित्ती कित्ती , कशा कशाचे, हाल होतील ते विचार करा. वर्षातून एक-दोन वेळाच स्मूथ चालते. (गाडीला इच्छित स्थळी जायचे असेल तरच )
माझी गाडी स्वस्तात घेतली होती, पण आता मेंटेनन्स खर्चच जास्त होतो. सप्लायर कडे जास्त गाड्या होत्या, आमची गाडी हि पहिलीच मोडेल. त्यामुळे स्वस्तात दिली त्याने.
गाडी जुनी देऊन नवीन मिळेल अशी काय योजना आहे काय ?(वाट्टेल तेवढा खर्च करायला तयार आहे)
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
तुमचा गैरसमज होतोय. नावं गाडीला ठेवलेलीच नाहीत. प्रवासालाही नाहीत (तो प्रवास सुंदर होता...)
गाडीच्या लायसेन्सिंगच्या नियमाला नावं ठेवली आहेत. समाजवादी अर्थकारणाच्या विचारसरणीत गाडी ही चैनीची वस्तु समजली गेली - आणि प्रत्येकाला एकच गाडी - तीही मोठ्या मिनतवारीने मिळणार...
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
हे फारच पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह झालं. स्टेपनीचं बघा जरा...
OK OK असं होय,समजले.
थोडा गोंधळ उडालेला होता.
सहमत आहे.
>>स्टेपनीचं बघा जरा...
गाडी ने कितीही त्रास दिला तरी अजून काय कुठेच पंचर नाही. एकदम शॉल्लीट MRF चे आहेत आमचे टायर्स, त्यामुळे हा सल्ला कामाचा नाहि
सोय हवी पण स्टेपनी सांभाळायला नको हा कोता-चंगळवादी विचार केल्याबद्दल घासकडवी यांचा निषेध.
गाडी आणि चाके यांचे गुणोत्तर तसे आहे म्हणून एका गाडीला चार चाके आणि एक स्टेपनी ठेवण्याची पद्धत असावी. गुणोत्तर वेगळे असते तर दोन स्टेपन्याठेवण्याची किंवा घासकडवींच्या मनोराज्याप्रमाणे स्टेपनी भाड्याने मिळण्याची पद्धत आली असती.
स्टेपनी ठेवायची नसेल तर आधी चाकांची निर्मिती कमी करावी लागेल.
त्याच्या करीता काही सुचना आहेत का?पुर्वी बजाज स्कुटरला स्टेफनी असायची .आताच्या स्कुटरला स्टेफनी नसते. त्यामुळे खुपच कुचंबणा होते.रस्त्यावर हात हालवत उभे रहावे लागते.
काही लोक गाडी 'एकहाती' वापरण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे गाडी तंदुरुस्त राहते म्हणे! आम्ही त्यांना विचारतो पंक्चर झाल्यावर कितीही तुम्ही एकहाती वापरली असली तरी स्टेपनी लागतेच.
आता मोटरसायकलसारख्या दुचाकीला स्टेपनी लावताच येत नाही. त्यांनी काय करायच?
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंतात. स्टेपनीचा शोध यातुनच लागला असावा.
एकहाती गाडी वापरल्याने गाडीचेच नव्हे तर चालकाचेही आरोग्य चांगले राहते. नाहीतर इतर कोणी गाडी नीट नाही वापरली तर गाडी खिळखिळी होऊ शकते त्यामुळे चालकाचेही जजमेंट चुकू शकते ना!
प्रतिक्रिया
वा वा ! काय अगाध लेखन प्रतिभा
मौज आहे!!
क्रिप्टीक
>>>>लेख आवडला प्रभुसरांशी
डोक्यावरुन गेलं !!
हम्म.
स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा
तुमचं आडनाव सिद्ध करायचा चंग बांधलेला आवडला बरं का डॉ.!
हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत
निषेध...
असो. आम्ही आपली पूजा चालू
स्टेपनी ...
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच..
है शाब्बास्स! य्ये हुई ना
ह.घ्या.
च्यायला
सुरेख श्लेष. त्या वृत्तांची
ओरिजिनलला पर्याय नाही
वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण
कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले
शहराजाद
काही गाड्यांची स्टेपनी मूळ
अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत.
थोडं कल्पनारंजन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. औष्ठ्यसेवा..
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे
अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.
OK OK असं होय,समजले. थोडा
असहमत
साबण
त्या ष्टेप्न्या जस्ट इन टाईम
मोटरसायकल ला स्टेफनी नसते.
रस्त्यावरच?
स्टेफनी???
अहो..
स्टे फनी लेख !!
पंकचर टायर नाय
ला हौल विलाकुवत!
हेच म्हणतो लाहोर व्हायाकुवेत.
एकहाती
एकहाती गाडी वापरल्याने
हा .... हा .... हा .... !