Skip to main content

विनोद

नवा चित्रपट "दस कहानियाँ :- सिनेमा जगताची पण २०-२० !!!

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 20/12/2007 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
या चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर चित्रपटस्रुष्टी सुध्धा नव्या साचात बदलत आहे याची जाणीव होते. याच्या आधी "डरना मना है, सलामे इश्क" यासारख्या चित्रपटातून हे प्रयत्न झाले पण प्रत्येक कधेचा कही ना काही धागा शेवटी एकत्र आला. पण "दस कहानियाँ " हा एकदम वेगळा अनूभव आहे. दहा वेगवेगळ्या कथा, एकाचा दुसरीशी काहीही संमंध नाही हे वेगळेपण. माझा नजरेने घेतलेला आस्वाद ....... *** मॅट्रोमोनी **** एका कंपनीच्या अति कार्यमग्न असणार्‍या "वाईस प्रेसिडेंटच्या" पत्नीची ही कथा. एकटेपणाला कंटाळलेली ही पत्नी मग स्वताच वेगळा मार्ग शोधते. अर्थातच पतीला अंधारात ठेवून.

विनोद

लेखक मनोज यांनी शनिवार, 15/12/2007 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
(मैल वरुन साभार) गुरूजी: अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? चिंटु: माहित नाही गुरूजी. गुरूजी: अरे असे काय करतोस पुस्तकात लिहिले आहे की....१५४२-१६०५ चिंटु: मला वाटले तो अकबराचा मोबाईल नंबर आहे.

पुराणातली वांगी

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/12/2007 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो !! काही माणसं आयुष्यात अशी भेटतात की ज्यांना पाहिल्यावर वाटतं ते किती भाविक ? पण दिसतं तस नसतं. काही वेळा लोक अपरिहार्यतेमुळे भक्ती करीत असतात. पण त्यांच्या माथी उगाच शेंदूर लावला जातो. ते बिचारे त्यांचं आयुष्य जगत असतात. या विषयावरील एक किस्सा. एका खेड्यात नामसप्ताह आयोजित केला होता. एका विद्वान बुवांना त्यात कीर्तनासाठी बोलावले होते. गावातल्या विठ्ठलमंदिरात दिवसभर भजन, नामस्मरण, पूजाअर्चा आणि रात्री या बुवांचे कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम. बुवांना विचित्र अनुभव आला. बुवांचं कीर्तन सुरू होतांना, गावातले सगळे लोक उपस्थित असायचे पण हळूहळू एकएक जण कटायला लागायचा.

'टप्प्याचे' महत्त्व - (पी.जे.-कम -कोडं)

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 07/12/2007 04:08 या दिवशी प्रकाशित केले.
नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही त्याची निवड होऊ शकली नाही. खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले.

बम भोले बम

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 06/12/2007 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी. दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो. गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 03/12/2007 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार............... आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ...... एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ? जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या ....... पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी..... एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ? जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही......... पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत.....

लोकशाही : एक व्याख्या

लेखक हरिप्रसाद यांनी सोमवार, 19/11/2007 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
आलेल्या मेल मधुन साभार .......... थोडी अश्लिलता आहे असे वाटल्यास पटकथेची गरज म्हणुन चु. भु. द्या. घ्या. दररोज शिस्तीचा भाग म्हणुन पेपर वाचणार्‍या बंड्याने त्याच्या बाबांना विचारले " बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो ? " " त्याचे असं आहे - " बाबा विचार करत म्हणाले, " हे बघ , मी घरात पैसे कमवुन आणतो , म्हणजे मी भांडवलदार ; तुझी आई हा पैसा कसा आणि कुठे खर्च करयचा ते ठरवते म्हणजे ती सरकार ; आपल्या घरात मोलकरीण काम करते ती झाली कामगार ; तु सामान्य नागरिक व तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं " बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली.

एक पी. जे.

लेखक प्रशांतकवळे यांनी गुरुवार, 15/11/2007 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक माणुस एका सान्तासिन्गच्या कानात काहीतरी बोलतो, सान्तासिन्ग लगेच मरतो, आता सान्गा की तो माणुस सान्तासिन्गच्या कानात काय बोलतो? . . . . . . . . . . . . . . . . ढिश्क्यऊ