Skip to main content

वावर

मनात(च) पूजीन रायगडा!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 10/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा गौरीशंकर उभ्या जगाचे, मनात पूजीन रायगडा वसंत बापटांची ही कविता ऐकण्याच्या आधीच रायगडाच्या प्रेमात पडलो होतो. रायगडावर पहिल्यांदा कधी गेलो, ते आठवत नाही. (वय झालं आता!) पण शाळेच्या सहलीतून गेलो नव्हतो, हे नक्की. दोनदा गेलोय, एवढं आठवतं. त्यालाही आता आठ-नऊ वर्षं झाली. लग्नाआधी तिरसटल्यासारखा एकटाच फिरायचो, तेव्हाची ही गोष्ट. "सकाळ'मध्ये रुजू होण्याआधी 30 मे 1999 साली शिवरायांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, ते मात्र स्पष्ट आठवतंय! तर सांगण्याची गोष्ट ही, की रायगडावर जायचं बरेच वर्षं मनात होतं.

आगंतुक पाहुणा

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 24/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री झोपायला म्हणुन खोलीत आलो. पलंगपोस बदलावा म्हणुन घातलेला पलंगपोस काढणार तेव्हढ्यात लक्ष बिछान्यावर विराजमान झालेल्या पाहुण्याकडे. पाहुणा घर आपलच समजुन मस्त मजेत बिछान्यावर फिरत होता. हिरवेगार तुकतुकीत अंग, पंखांना तपकिरी काठ, साधारण एक सेंटिमिटर आकार, पंख मिटुन घेतलेले असा पाहुणा सोयिस्कर जागेची पाहणी करत असावा हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला.

अपवाद

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 07/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वोक हार्ड रुग्णालयातील वैद्यकिय तपासणीचा दिवस. आमच्या आस्थापनेत सर्व कर्मचार्‍यांना वर्षातुन एकदा वैद्यकिय तपासणीचा आग्रह असतो, न गेलात तर तुमची मर्जी. साहेब म्हणाले, जा; आम्ही गेलो. एकट्याला फार वैताग येतो तेव्हा बरेचजण दोघे-तिघे ठरवुन एकत्र जातात. मीही माझ्या एका वरिष्ठ सहकार्‍यांबरोबर संधान साधले होते आणि आम्ही सकाळीच दाखल झालो.

सखाराम गटणेंचे हर्दिक अभिनंदन व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 25/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, मिपाचे एक सन्माननीय सदस्य सखाराम गटणे यांनी स्वत:चा खरडफळा सुरू केला आहे त्याबद्दल मी समस्त मिपाकरांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा देतो! हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते. आणि म्हणूनच गटण्यांचे मला व्यक्तिश: विशेष कौतुक वाटते. कारण मीही एक बंडखोरच मनुष्य आहे आणि मिपाचा जन्मदेखील बंडाळीतूनच झाला आहे! असो, नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा! :) तात्या.

मास्तरांची "एक प्रश्नपत्रिका"

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 14/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत... तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका. ( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..) संदर्भासहित स्पष्टीकरण करा. १. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन. २.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल. ३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.

माझी नवीन गुढ(भय्)कथा वाचुन अभिप्राय देणे

लेखक येडा खवीस यांनी शनिवार, 06/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मी मिसळपावचा एक नवा सदस्य आहे...व्यवसायाने ज्योतिष मार्गदर्शक आणि गुढविद्या अशा क्षेत्रातील आहे ( म्हणजे पांढर्या कपड्यातील जरा बरा मांत्रिक म्हणलात तरी हरकत नाही) त्याचप्रमाणे एक हौशी गुढकथालेखकही आहे.

खुन्नस

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 05/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ पाव अभिरुची कट्टा पेठकरकांचा कॅमेरा जर्रा अंमळ ऊशीराने क्लिकला त्यामुळे अगोदर काढलेले फोटो अपलोड करु शकलो नव्हतो.ते सगळे फोटो स्वाती राजेश ने खास ईग्लंडाहुन धुवुन पाठवले. मजा करण्यात पुणेकर काही मागे नाहीत हे या फोटो वरुन लक्षात येईलच.

गणपतीचा उत्सव - टिळकांचा अग्रलेख

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 04/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे. http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे.