Skip to main content

वावर

पाठीला साबण चोळण्याचे सहा प्रकार

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 25/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या इसमाने "जीवनोन्नत्तीचे सहा सोपान" असे कायसेसे लिहुन ठेवले आहे. भाई काकांच्या गटण्याने ते तोंडपाठ केले होते म्हणे. काल अचानक प्रदीर्घ अभ्यासान्ती मला असेच काही सोपान गवसले. माणसे त्यांच्या स्वभावानुसार अभ्यास करत असतात. पाश्चात्य देशांत तर प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान शोधले जात. उदा : भरभर चालण्याचे वैज्ञानीक तीन प्रकार शास्त्रीय रित्या आळस कसा द्यावा. जेवताना ढेकर कसा द्यावा. घोरण्याचे शास्त्रीय फायदे ईत्यादी. आंघोळीचेही बरेच प्रकार आहेत.

एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 23/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
१ जानेवारी २००९ साली ही डायरी लिहायची म्हणजे कटकट आहे.. ही नवी भलीमोठी डायरी आणली त्यासाठी .. आता सहज म्हणून अनुदिनी लिहावी ( की दैनंदिनी.. जाउदे मरुदे ना..)म्हटलं तर इतकी मोठी डायरी केवळ नाईलाज म्हणून आणावी लागली... कारण काय तर छोटी डायरी जवळच्या स्टेशनरीवाल्याकडे नाही... लुटतात भ*वे... ... घरी आलो तर पेन मिळेना... बरं... सकाळी शर्टाच्या खिशाला लावलेलं पेन ऑफिसात विसरलो... आता ते टेबलाच्या खणात राहिलं का कोणी पळवलं आठवत नाहीये... छ्या ..

प्रतिसाद

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 11/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी आपुलाची बोलु वाचे कौतुके वात येईल इतुके प्रतिसादे चौफेर रांधे जैसे भातुके खेळे नृपकन्या बोलाची कढी बोलाचेची बोलु बोलाचेची खापरें पुसोनी तैया ताजी होई .....ये काव्यखेचर आज रोजी मिपा मुकामी मिपा संस्थळी विजुभाऊ करवी अवांतरी प्रतिसाधका प्रत मस्तकी हाणीतले
Taxonomy upgrade extras

तीच खरी श्रध्दांजली....!

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 05/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस हा साहित्यसृष्टीतीलच काही काळया दिवसांपैकी एक होता. का ते तुम्ही जाणताच! ज्येष्ठ साहित्यीक, वक्ते, राम शेवाळकर काल अनंतात विलीन झाले. माझे भाग्य की, दोन वर्षापूर्वी आणि 2-3 महिन्यापुर्वी असे दोनदा या सारस्वातातीलच हि-याचे शब्द मला कानात साठवण्याचा योग आला.

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 02/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले ( काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....". हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ?

दुनियादारी - माझ्या नजरेने !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 01/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.

मिलपिटास येथील चटपटीत कट्टा - वृत्तांत

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 01/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जाण्याचा योग आला. निघण्याआधी मी "मिसळप्रेमी तितुका मेळवावा" वचनाला अनुसरून चौकशी सुरू केली. आणि सान-होसे बे-एरिया भागातील लोकांनी त्याचवेळी कट्टा आयोजित केला. पहिला खुलासा : सनीव्हेल-सानहोसे म्हणजे अगदी नारायणपेठ-नवसह्याद्री आहे असे म्हणतात, ते खोटे आहे. खडूसपणाची खूणही खरवडून खरवडून सापडली नाही. त्यामुळे लोकहो, सदाशिव पेठेतले घर सोडून इथे येण्याचा विचार खोडा. त्रास होईल. चार पैसे जास्त लागले, तरी आपले कोथरूडच बरे. दुसरा खुलासा : पुढील चित्रांमध्ये "चित" होऊन चेष्टा करणारे सर्व प्रौढ लोक आहेत.

गौडगावचा जाग्रुत मारुती

लेखक सनविवि यांनी रविवार, 26/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल! हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला.