एका बोकडाची टक्कर कथा
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about एका बोकडाची टक्कर कथा
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
पुण्यात चारचाकी गाडी चालविणे म्हंजे एक दिव्य गोष्ट झाली आहे. गेल्या चार महिन्यात माझ्या तीन चार मित्रांनी गाड्या घेतल्या; परंतु चार महिनेही त्या गाड्यांची लकाकी टिकली नाही. एक गाडी मागच्या बाजूने चेपलेली, दुसरीच्या दरवाजाला भला मोठा कोचा, तिसऱ्या गाडीला मागचे चाक ते पुढचे चाक असा पाच फुटांचा मोठा स्क्रॅच...
तुमच्या लक्षात आलेच असेल... ही सर्व उदाहरणे पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकचे दृश्य परिणाम आहेत. पुण्यात चार चाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे एका गाडीला दुसऱ्या गाडीचा ठोसा, हे प्रकार घडतच राहणार.
