मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

एका बोकडाची टक्कर कथा

अन्वय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुण्यात चारचाकी गाडी चालविणे म्हंजे एक दिव्य गोष्ट झाली आहे. गेल्या चार महिन्यात माझ्या तीन चार मित्रांनी गाड्या घेतल्या; परंतु चार महिनेही त्या गाड्यांची लकाकी टिकली नाही. एक गाडी मागच्या बाजूने चेपलेली, दुसरीच्या दरवाजाला भला मोठा कोचा, तिसऱ्या गाडीला मागचे चाक ते पुढचे चाक असा पाच फुटांचा मोठा स्क्रॅच... तुमच्या लक्षात आलेच असेल... ही सर्व उदाहरणे पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकचे दृश्‍य परिणाम आहेत. पुण्यात चार चाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे एका गाडीला दुसऱ्या गाडीचा ठोसा, हे प्रकार घडतच राहणार.

मिपावर "ट्विटर"

मुक्तसुनीत ·
लेखनविषय:
मित्रानो , एक काळ असा होता की मिपावर पडीक असणे शक्य होते. पण आयुष्याच्या इतर पैलूंबद्दल जे झाले ते , दुर्दैवाने येथेही झाले आहे : सगळ्याचीच घाई नि कशालाही वेळ नाही. आता पूर्वीसारखे बत्तीस कोर्सेस चे इच्छाभोजन शक्य नाही. आता घुटक्याघुटक्यानेच आस्वाद शक्य आहे. (सध्यातरी). मनात विचार आला की, सद्यस्थितीला अनुरूप असे काहीतरी नेमके आणि छोटेसे काहीतरी लिहिता आले - आणि इतरांकडून ऐकता आले तर मजा येईल. आजमितीला, करोडो लोक वापरत असलेल्या "ट्विटर" नावाच्या संकेतस्थळामधे लोक नेमके हेच करतात. मग हीच संकल्पना इथे राबवून पहायला काय हरकत आहे ? म्हणून हा धागा.

जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठीत लिहिणारे जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक एका व्यासपीठावर कधी च एकत्र आले नाहीत. किंबहुना त्यांची पुस्तकेही एका शेल्फवर कधी आली नसतील. प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल निराळी ,वाचक वर्ग निराळा, विषय निराळे. सु शि वाचणारा जी ए वाचणार नाही काकोडकर वाचणाराला गुरुनाथ नाईक वाचवणार नाही. ह्या सर्व एवंविषिष्ठ गुणांमुळे त्यांची तूलना करता येणार नाही. सुशिनी फारसे शृंगारीक लिहिले नाही. थोडेसे लिहिले तेही कॉलेज च्या तरुणाई च्या माहोलात.

शंका

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो आपल्या लहानपणी अनेक शन्का असतात. सर्वच शंकांचे निरसन नीट होतेच असे नाही . बरेचदा असला प्रश्न का विचारलास म्हणून छड्या / रट्टे/ धपाटे ही खावे लागले असतील. त्या शंका नंतर सूप्त होतात. तुम्हालाही अशा काही शंका आठवत असतील तर त्या इथे लिहाव्यात. बघु एखाद्या सूप्त शंकेचे उत्तर मिळून जाईल माझ्या शंका १) मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्याची प्रथा कोणत्या समाजात आहे/ होती.

इतिहासाचे एक पान...

दशानन ·
लेखनविषय:
२० जुलै १९६९ ! आज पासून चाळीस वर्षामागे मानवाने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवली, अपोलो -११ दरमजल करुन २० जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रांग, एडविन एल्ड्रिन व मिशेल कॉलिंस ह्यांना घेऊन पोहचले तो मानवी जिवनाच्या वाटचालीतील एक उतुंग क्षण ! आपली धरती सोडून आपण आकाशाच्या पण पलिकडे चंद्रावर पोहचलो. नील आर्मस्ट्रांगने सर्व प्रथम चंद्रावर पाय ठेवले.. ह्या गोष्टिला आता ४० वर्ष झाली...