संस्कृती
महाराष्ट्र गर्व माझा
१ मे २००९ महाराष्ट्र राज्य स्थापना सुवर्ण महोत्सवी
माझी ही कविता माझ्या महाराष्ट्रासाठी !
संतांची पुण्यभूमी
वीरांची रणभूमी
जगात वेगळा
महाराष्ट्र माझा
शिवबा माझे दैवत
भवानीची मला सोबत
जोशात लढेन
दर्याला हरवेन
पंचगंगेचे पाणी
कोल्हापूरी वाणी
शत्रुंनो तलवार म्यान करा
वाहतील रक्तांच्या धारा
महाराष्ट्र गर्व माझा
कवितेमधील व्याकरण व लय चुका सुधारण्यासाठी प्राजु ह्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आरती पालीच्या बल्लाळेश्वराची
आरती बल्लाळाची
(चालीसहीत)
जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा
आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा
जयदेव जयदेव || ध्रु ||
देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी
आत असे मुर्ती शेंदरी उघडी
समोर मोठी घंटा अन खांब लाकडी
वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
देवा तुझा वास असे पाली गावी
तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी
मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी
भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे
मंदिर स
Taxonomy upgrade extras
'कबीर बानी'
पंडित कुमार गंधर्व यांच्या विलक्षण प्रतिभेतून साकारलेल्या निर्गुणी भजनांचा एक नवा अल्बम घेऊन नव्या दमाचे गायक राहूल देशपांडे रसिकांच्या भेटीला येत आहेत. सानिया मिडिया या संस्थेचा हा संगीताच्या विश्वातील पहिला प्रकल्प आहे. 'कबीर बानी - म्युझिक फॉर सोल' असे या अल्बमचे नाव असून अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले असून, मे महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे प्रकाशन पुण्यात केले जाणार आहे.
या अल्बमविषयी राहूल देशपांडे यांनी सांगितले की, निर्गुणी भजने ही खास भारतीय परंपरा. कबीर आणि त्यांच्या समकालीन संतांनी केलेल्या रचना त्यात मोडतात.
सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण !!!
सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण
सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण
दोन - चार दिवसांपुर्वीच 'सनई-चौघडे' हा चित्रपट पाहिला. खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले. 'कांदेपोहे' या नावाने मी हा चित्रपट पाहण्या अगोदर एक लेख येथे लिहिला होता. या चित्रपटाला इतके महत्व देणे अवास्तव नव्हते हे या चित्रपटाने सप्रमाण सिध्द केले. उत्कृष्ट संवाद, उत्तम अभिनय या सर्वांनी हा चित्रपट उत्तम झाला आहे. मराठी चित्रपटातील संवाद प्रभाव पाडत नाही हा समज ''सगळे पुरूष सारखे असतात, पण एकसारखे नसतात'' अशा संवादानीं खोटा ठरवलेला आहे.रशियातली शिवजयंती
गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
यावर्षीही तिथीप्रमाणे शिवजयंती सारातोव्ह्,रशियातील आमच्या होस्टेलमधे करण्याची ५ वर्षांची प्रथा आम्ही चालु ठेवली.१३मार्च२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात शिवरायांची आरती,त्यांचा संक्षिप्त जीवनक्रम,काही कविता,फत्तेखानाची पुरंदरवरची फजिती आणि शाहिस्तेखानावर हल्ला ही कथाकथने,एक भाषण्,'राजा शिवछत्रपती'चे 'इंद्रजीमी जंबपर' व 'हिंदवी राज्य हे आले' ही गाणी झाली.
अचानक पुणे-३० कट्टा
मागच्या काही दिवसांपासून पुण्यनगरीत मुक्काम आहे. पुण्यात आलो तसे मिपाकर मित्रांचे फोन यायला सुरूवात झाली.
"काय मग? कधी भेटताय?"
"पुण्यात आलास, कळवत पण नाही. बघून घेऊ आम्ही पण."
"या वेळी भेटायचंच बरं का, मागच्या वेळी टांग दिलीस."
एक ना दोन. मलापण भेटायचंच होतं मिपावरच्या काही महान, थोर इ.इ. व्यक्तिमत्वांना. काल थोडा वेळ मिळाला म्हणून जरा फोनाफोनी केली दुपारी. परा, दाढे डॉक्टर आणि श्रावण मोडक एवढे मासे गळाला लागले. म्हणलं, आधी पराला भेटू. तिथून डॉक्टरकडे जाऊ आणि मग मिष्टर मोडकांना भेटू. थोडका आणि आटोपशीर कार्यक्रम ठरवून निघालो.
पुण्याच्या जगप्रसिद्ध 'पुणे-३०' परिसरात पोचलो.
जय हो "आंतरराष्ट्रीय" अभिव्यक्ती-स्वातंत्र्य!
'स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट भारतीयांनी बघितला. त्याला ऑस्कर मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून. तसेच 'जय हो' या गाण्याला ही पुरस्कार मिळालेत.
या चित्रपटाकडे एका दृष्टीकोनातून बघितल्यास असे वाटते की, यात भारतातील सत्य पण वाईट गोष्टी म्हणजे झोपडपट्टी, गरिबी, दंगे, बाल गुन्हेगारी असे प्रकार दाखवलेत. या पूर्वी लगान ऑस्कर मध्ये जावूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही कारण त्यात इंग्रज लोकांविरुद्ध आपण जिंकतो असे दाखवले आहे. लगान हा सगळ्याच बाबतीत 'स्लमडॉग मिलेनियर' पेक्षा सरस होता.
मनातला चैत्रं...!!!
उन्हाळा सुरु झाला...कडक उन्हं पडायला लागली..मोगर्याचे गजरे...कैरीची डाळं-पन्हं या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली की माझं मन १०-१२ वर्ष मागं धावतं...दरवर्षी एप्रिल मे च्या सुमारास मला माझी उन्हाळ्याची सुट्टी आठवते..माझं कर्हाड आठवतं..कृष्णाबाईचं देउळ आठवतं...आमचा लाडका घाट आठवतो..आणि सगळ्यात तीव्रतेने आठवतो,तो म्हणजे चैत्रातला कृष्णाबाईचा उत्सव...!!!
आमचं कर्हाड हे तसं छोटंसच गाव....(म्हणजे आता पुण्यात रहायला लागल्यापासुन मला कर्हाड छोटं वाटतं...:-) ) दोनचं मुख्य बाजारपेठा....आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेली वसाहत
मिसळपाव