Skip to main content

संस्कृती

चंपी

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 26/05/2009 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
चंपी आम्लफ़त्तरा निखळ वस्तरा तीव्रदुहेरी दुर्गम झेले वृष्टीत उसासे तडकून गेले स्तंभ जिव्हारी फ़डकून मेले सरणतुतारी जाताजाता काय मनाला हरखून गेले ललाटगोण्या पावनमौळी चित्र दुधाळी झाळून मेले.. स्वर्गनव्हाळ्या द्यूतसख्यांनी पलिते टाळून नक्षी पुसली. त्या दुर्धर वन बधिरलटांना तीर्थपावना साक्षी फ़सली.... निळ्याजांभळ्या ललाटभृकुटी पिऊन टाका बधीर मापटी आलो गेलो बिकट भरजरी सटल खुणांची गर्भित चंपी

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

एकम् सत्

लेखक विकास यांनी सोमवार, 18/05/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...

कारुण्याशा

लेखक शरदिनी यांनी रविवार, 17/05/2009 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
कारुण्याशा... एक कारुण्यडगरीवरचा रौद्रभीषण चिपसेट मत्तदुर्दैवाच्या औक्षणधुंद करालदाढा कर्र कर्र कर्र कर्र सत्यवानाच्या तहवैभवाने टाकलेले सुन्नगारूड अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह लब डब लब डब नयनांच्या दलदलीतला हलताडुलता वंचनदाह स्व-टाहोने लिंपून घेतलेला शारीर खुळखुळा खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका स्वप्नपिंपळपानावरून पुनश्व हरि ओम पीतवल्लरींच्या अनुमानात कडाडबूम मेघवर्षा धो धो धो... अन मग सारंच शांत.. पुढच्या पिंपळपानापर्यंत... १६ मे २००९ , पुणे
Taxonomy upgrade extras

माझी मद्रास ची सफर- भाग ३

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 15/05/2009 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
... भाग १ ... भाग २ मद्रासची सफर तिथल्या रिक्षावाल्यांबद्दल बोलल्याशिवाय पूर्ण कशी होईल?? मुंबईत जिथे किमान रिक्षाभाडे ९ रू. मध्ये जाता येते, अशा ठिकाणीही हे लोक ४०रू आकारतात.. मी ४०रू पेक्षा खाली येणारा रिक्षावाला एकदाही नाही पाहिला.. आय आय टीच्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी स्थानक १० मिनिटांच्या अंतरावर आहे.. पण त्यासाठीही ५०रू. मोजलेयत.. आमचे सहाध्यायी एक तमिळ हिंदी वाद सोडला तर खूपच चांगले होते..

माझी मद्रास ची सफर- भाग २

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 15/05/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, पहिल्या भागाच्या भरभरून प्रतिसादाबद्द्ल शतशः धन्यवाद... लिहिंण्यापूर्वी साशंक होते पण आता मात्र हुरूप आलाय... मला दोन-तीन वर्षांपूर्वीचे ऑर्कुट्वरच्या नव्या नवलाईचे दिवस आठवले.. तेव्हा नवीन खरड आलीय का जितक्या उत्सुक्तेने दर तासाला तपासायचे..तसंच आता ईथे नवा प्रतिसादाच्या बाबतीत होतेय.. :D असो.. एक-दोन दिवसांत आमची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली... नि आधी सांगितल्याप्रमाणे, मी आणि एक गुज्जुभाई सोडला तर सारेच दक्षिणी होते. आता आधी या प्रशिक्षणाबद्दल थोडंसं... ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ते आयोजित केले जाते, त्यांनी जर एक वर्षभर आधी त्यबद्दलचा अर्ज केला..

माझी मद्रास ची सफर

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 13/05/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... मी मिपा ची एक शांत वाचक.. ईथे बरीच मंडळी धो-धो लिहीताना पाहून वाटे.. की आपणही लिहावं.. पण का कोण जाणे.. पट्कन गूगल क्रोम उघडले जाते... नी त्यात.. एक अक्षर खोडले , की पुढची अक्षरं बोंबलतात.. पण आताशा ही उर्मी जरा जास्तच उचल लागलीय... कारणे दोनः एक, पेशावर मधल्या एका गायिकेची भावांकडून हत्या.. कारण काय.. तर ती टी. व्ही. वर गाते... आणि दुसरे.. देवांनी चालु केलेली.. मद्रास ची लेखमालीका... चला... काही कारणाने सुरुवात तर होतेय... मी हे माझ्या तिथल्या वास्तव्यातले अनुभव मांडतेय... काही नव्याने माहीत झालेल्या गोष्टी... काही विचित्र वाटलेल्या.. त्यातल्या काही तर खुपच खटकलेल्या...