मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

मनाच्या कुपीतले -आयुष्यावर बोलु काही

विनायक पाचलग ·
मनाच्या कुपितले या सदरातला हा आठवा लेख
आयुष्यावर बोलु काही
लेख वाचण्यापुर्वी - हा लेख स्कॅन स्वरुपात आहे खरेतर हा लेख मी पुर्वीच लिहिलेला आहे तेव्हा तो परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून स्कॅन कॉपी देत आहे.

तालिबानीस्तान !

भोचक ·
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.

संकल्प मत्स्यपुराणाचा

सुनील ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या काही दिवसांपासून मिपावर बर्‍याच मत्स्याहारी पाकृ येत आहेत. मासे आवडणार्‍या परंतु माशांबद्दल फारशी माहिती नसलेल्या काही मिपाकरांनी विविध प्रकारच्या "खाणेबल" माशांबद्दल एखादा लेख लिहिण्याची सुचना केली होती.

साताजन्माचा वनवास..!

पारोळेकर ·
लेखनविषय:
आपल्या आयुष्यात मुंबईच्या उपनगरात भरधाव वेगाने धावणार्‍या लोकल गाड्याप्रमाणे एकामागून एक असे अनेक अविस्मरणीय क्षण येत असतात... परंतु, असे क्षण हाताच्या ओंजळीत थांबले तर मोहरा...अन् निसटले तर माती...! तिच्यासोबत घालवलेले काही क्षण त्याने मनाच्या पानावर टिपून ठेवले आहेत. 'तिच्या' अशा काही आठवणी त्याने बकुळाच्या फुलाप्रमाणे हृदयाच्या कोपर्‍यात लपवून ठेवल्या आहेत...'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं 'त्याची' व 'तिची' प्रेमाची गोष्ट.... 'तो' एका जाहिरात कंपनीत नोकरीला...

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

ॐकार ·
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

च्याव ज्झ

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
चीनला जायचे तर सिंगापुरला लेकराला भेटुनच जावे असा विचार करुन आस्थापनेच्या पर्यटन संस्थेला सिंगापुर मार्गे प्रवासाची व्यवस्था करायला सांगितली तर त्यांनी नकारघंटा वाजवली. म्हणे सिंगापुर एअरलाईन्सने पर्यटन संस्थांना अडत देणे बंद केल्याने सर्व पर्यटन व्यावसायिक संस्थांचा सिंगापुर एअरलाईन्सवर सध्या बहिष्कार आहे. त्यांनी शिताफीने हॉंग कॉंग, कुआला लुंपुर, बॅंकॉक अशा तीन रुपरेषा आखुन दिल्या. पण जाणार तर पोराला भेटुनच जाऊ यावर मी ठाम होतो. मग मी सिंगापुर एअरलाईन्सच्या संस्थळावर गेलो आणि चार दोन वेळा मागे पुढे होता करता अखेर हव्या त्या तारखांची तिकिटे जमवली.

ठकीचा संसार

प्राची ·
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.

कार्तिकी जिंकली!

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
झी मराठी च्या सारेगमप स्पर्धेत कार्तिकी गायकवाड अंतिम विजेती ठरली. कार्तिकीला मन:पूर्वक शुभेच्छा!! :)

तुझे सब है पता... चा भावानुवाद

आचरट कार्टा ·
Taxonomy upgrade extras
मागे ऑर्कूट वरच्या "मराठी कविता" या समुहात माझ्यासकट अनेकांचे भावानुवादाचे प्रयत्न चालू होते. त्यात हे लिहिलं होतं. आज मिपा च्या मुखपृष्ठावर या गाण्याबद्दल वाचलं, आणि म्हटलं तुम्हालाही दाखवावं...

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत. तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे. स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला admin@mimarathi.net पाठवू शकता. आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत. ५ फेब्रुवारी २००९ पासून हे स्थळ कार्यरत होईल, सर्व मराठी मित्रांचे येथे