Skip to main content

संस्कृती

इच्छा मरण

लेखक रघु सावंत यांनी बुधवार, 11/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला मरण यावे ते समुद्रात यावे एकदा तरी मनसोक्त मला माशांनी खावे आयुष्यभर मी ज्यांचे लचके तोडले त्यांनी मला एकदा फाडले तर काय बिघडले ज्यांच्या मऊ अंगावर मसाला लिंबू चोळून तव्यावर खरपूस भाजून टाकले मी खाऊन मी मेल्यावर हे हात त्यांना दिसावेत एकदा तरी मनसोक्त मला बोंबलानी खावे. कधी सुंगटाची कढी कधी तव्यावर जवला वांग्याचं भरीत ,कधी कोलंबी मसाला बाहेर पडलेल्या जिभेवर त्यांनी हक्काने बसावे एकदा तरी मनसोक्त मला कोलंबीने खावे कोळणीकडे निपचीत पडलेली सुरमई पापलेट किंमत कमी करून मी दिली सारात सोडून त्या सुरमई पापलेटाने मला कमी भावात आणावे एकदा तरी मनसोक्त मला सुरमई पापलेटाने खावे खोबरं लाल तिखट धण

खादाड कंपू-२०१२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 10/01/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्य

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२

लेखक सुशान्त यांनी सोमवार, 09/01/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' आयोजित करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे संस्थेचे निवेदन इथे दिले आहे. -------------------------------------------------------------- संगणकावर मराठीतून माहितीचा देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे.

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/01/2012 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

बोस्की-इंटीमेट आणि सी -९०

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 06/01/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्‍याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली . दुपारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्‍या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली .

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस