Skip to main content

संस्कृती

हास्यास्पद पाट्या...अमेरिकेतील...

लेखक वाटाड्या... यांनी मंगळवार, 07/02/2012 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो...मिपाकरहो... अमेरिकेत गावोगाव हिंडताना विविध प्रकारच्या पाट्या(हो इथेसुद्धा) पहायला मिळाल्या... त्यातल्याच काही पाट्या तुमच्या करता...

राजगड संवर्धन मोहीम २०१२

लेखक धमाल मुलगा यांनी सोमवार, 06/02/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, राजगड! श्री शिवछत्रपतिंची प्रथम राजधानी! नावाप्रमाणेच असलेल्या ह्या राजगडाची आज अवस्था मोठी वाईट आहे. पडझड, रानगवत, पर्यटकांनी केलेला कचरा अशा निरनिराळ्या अडचणींनी हा गड आपलं मुळचं वैभव हरवून बसला आहे. गडाची देखभाल तसेच दुरुस्ती करुन हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. काही दुर्गप्रेमी..खरेतर गड-किल्लेवेड्या मित्रांनी एकत्र येऊन अशाच निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, लेण्यांची गुहांची दुरवस्था न पहावून ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे संगोपनाचे शक्य तितके वैयक्तिक प्रयत्न सुरु केले.

"श्रद्धा"

लेखक बज्जु यांनी रविवार, 05/02/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा "श्रद्धा" या एका शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो तो म्हणजे हि एक देव, संत, महात्मे झालच तर अगदी अलीकडल्या काळातले अमुक अमुक बाबा, तमुक तमुक माता यांच्याशी जवळीक साधणारी काहीतरी भानगड असावी असा. पण मग श्रद्धा म्हणजे नेमक काय असाव ? श्रद्धा म्हणजे विश्वास का ? श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी वाटणारी प्रेम किवा आपुलकीची भावना का? का भीती? का श्रद्धा म्हणजे देव या संकल्पनेविषयी वाटणारा आदर ?

चित्रपट निर्माते गजानन जागीरदर यांच्यावर बुद्धिवाद्यांनी केलेला अन्याय - प्रकरण 9

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 01/02/2012 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या ब्लॉगमधील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा. विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. दैनिक तरुण भारत... ...विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल आंधळी श्रद्धा व विश्वास बाळगणाऱ्यां लोकांनी तर वाचलेच पाहिजे. पण विज्ञान व त्याची सामाजिक बांधिलकी या विषयाची आस्था बाळगणाऱयांनीही अवश्य वाचले पाहिजे, असे आग्रहाने सांगावेसे वाटते. - रामचंद्र रेडकर बेळगाव. दैनिक लोकमत ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे.

करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 01/02/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..?

!! श्रद्धांजली !!

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 25/01/2012 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुण्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली..... संतोष माने नावाच्या एका माथेफिरू S.T महामंडळाच्या कर्मचाऱ्याने बिचाऱ्या ९ माणसांना कारण नसताना चिरडले आणि कित्येक लोकांना जखमी केले.. याच्यावर काय लिहावे तेच कळत नाही....डोके बधीर आणि सुन्न झाले आहे. या घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना !! श्रद्धांजली !!

पहिली मिपा-ओरिगामी कार्यशाळा (२२ जानेवारी २०१२, देनावाडी, गिरगाव) - वृत्तांत

लेखक प्रास यांनी मंगळवार, 24/01/2012 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही मिपा-इव्हेन्टच्या वेळचे नारायण (किसन शिंदे) यांच्या पुढाकाराने आणि 'मु. पो. ब्राझील' फेम विलासरावांच्या सहकार्याने गेल्या रविवारी म्हणजे दिनांक २२ जानेवारी २०१२ रोजी मिपा सदस्यांची पहिली ओरिगामी कार्यशाळा देनावाडी गिरगाव इथे संपन्न झाली. कार्यशाळेमध्ये मिपावर ओरिगामीकलेचा ध्वज फडकत ठेवणार्‍या सदस्य सुधांशू नूलकर यांनी मार्गदर्शन केलं. सुधांशू नूलकरांनी आपल्या भूमिकेला साजेसा ओरिगामी मित्र असं लिहिलेला टी-शर्ट परिधान केलेला. तसले टी-शर्टस् पुढच्या वेळी कार्यशाळेमध्ये भाग घेणार्‍यांसाठी उपलब्ध करून देण्याची (तेव्हा न केलेली) विनंती आम्ही इथे करून ठेवत आहोत.