सोशल डिस्टन्सिंग
सोशल डिस्टंन्सिंग
एकदा टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता.
मिसळपाव