लेखकस्पंदनायांनी मंगळवार, 05/10/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिष्ठा
निष्ठेला लावून तिष्ठा, बघ राज्य करी प्रतिष्ठा |
ही वसते सर्व जनात
करी जागृत 'अहं' क्षणात
राखाया मर्जी हिची
ना स्वकीयांची ही क्षिति ||१||
हे मित्र होते हो कधी
पण आली प्रतिष्ठा मधी
आज नजरेत यांच्या गरळ
एक शब्द ही न ये सरळ ||२||
उन्मत्त गर्व अन माज
हे स्तवन शब्द ही धरी
वाढवी वर्चस्व भू-वरी
तडतडा तांडव करी ||३||
चालता तुम्ही आदर्शे
ही हळूच तुम्हा चिकटते
आल्हादे मोह पाडुनी
ती अधिकृत ठाण मांडते ||४||
मग आदर्श हो दुय्यम
अन करिती जन तडजोड
कसे चिकटता तिज तुम्ही
हे सुटत नसे हो कोड ||५||
साऱ्या आयुष्याचा खेळ
मोडते एका घडी
लेखकअभिशेक गानुयांनी शनिवार, 02/10/2010 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार
माझा एक मित्र हैदराबाद ला शिफ्ट होतो आहे कामा निमित्त, जर कोणाच्या ओळखीत खालील परिसराच्या आसपास काही राहण्याची सोय असल्यास जरूर कळवावे
अमीर्पेत येल्लारेद्दीगुडा
धन्यवाद
अभिषेक