मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आय.आय.टी. एक निरीक्षण्/आत्मपरीक्षण

अन्या दातार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सध्या एकंदर आय.आय.टी. मूर्ती, भगत इ. इ. वाचून काही प्रश्न पुढे आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा एक साधासा प्रयत्न मी माझ्यापरिने करत आहे. आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय. १. आय आय टी होली काऊ आहे काय? नक्कीच नाही. पण मीडिया हाईपमुळे, तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या भरमसाठ पगारामुळे (जरी इनोवेटीव किंवा इंजिनीअरिंग्शी दुरान्वयेही संबंध नसलातरी) तशी एक धारणा निर्माण झाली, जिचा विस्तार प्रचंड वेगाने झाला. २. आय आय टीत प्रवेश मिळणे फारच अवघड आहे का? डीग्री लेवलला म्हणत असाल तर हो. जेईई (JEE) क्रॅक करणे हे गेट (GATE) क्रॅक करण्यापेक्षा कितीतरी अवघड आहे. तरीपण पूर्वीइतकी काठिण्यपातळी राहिलेली नाही (दोन्ही परीक्षांमध्ये). २.१. काठिण्यपातळी का खालावली? पूर्वी जेईई आणि गेट चे पेपर्स हे सब्जेक्टीव असत; आता ऑब्जेक्टीव असतात. आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक लोकांची संख्या वाढली. त्यामुळे पेपर चेक करणे, व एकंदरच परीक्षा लवकरात लवकर घेणे या सगळ्याचा विचार करता सब्जेक्टीव टू ऑब्जेक्टीव हा बदल होणे ही परीक्षापद्धतीची, System need होती. अर्थातच यामुळे काठिण्यपातळीत बदल होणे अपरिहार्य आहे. या बदलामुळेच गुणवत्तायुक्त विद्यार्थी न येण्याची शक्यताही वाढते. हेच एक महत्वाचे कारण आहे, ज्यामुळे एकंदर आय आय टीची गुणवत्ता घसरत असल्याचा आरोप खोडून काढणे सोपे रहात नाही. ३. आय आय टीमध्ये संशोधन होते का? हो. आय आय टीमध्ये विविध विषयांवर संशोधन होते. पण त्यातून अगदी ठोस (ग्राऊंड-ब्रेकिंग का काय ते) निर्माण होत नाही हे खेदाने नमूद करावे वाटते. इंडस्ट्रीची जी गरज आहे ती पूर्ण करणे हे आय आय टीचे उद्दिष्ट आहे की नाही माहित नाही, पण असण्यास हरकत नसावी. एम.टेक व पीएचडी साठी जो काही रिसर्च चालतो त्यातील फार थोडा भाग इंडस्ट्रीमध्ये उपयोगात आणला जाऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. ४. आय.आय.टीचा दर्जा का खालावला? प्रश्न अगदी विचारपूर्वक मांडतोय. परीक्षापद्धतीबरोबर अजुनही काही फॅक्टर्स आहेत, ज्यामुळे आय आय टीचा दर्जा खालावत आहे (कुणी विचारले नसले तरी हे माझे मत आहे) - अनेक शिक्षक आय आय टी मध्येच बीटेक, एम टेक, पीएचडी करुन तिथेच फॅकल्टी म्हणून जॉईन होतात. फार कमी शिक्षक इंडस्ट्रीत जाऊन आलेले असतात. त्यामुळे इंडस्ट्रीची गरज त्यांच्या लक्षात लवकर येत नाही. - शिक्षकांचे शिकवण्याचे विषय, पद्धत, पेपर काढण्याची- ग्रेडींग करण्याची पद्धत ३-४ वर्षांमध्येच विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. त्यामुळे एकदा प्रवेश मिळाल्यानंतर पास होणे अवघड नाही. - युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर सिक्षकावर्/पेपर तपासणार्‍यावर कुठलेही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. पण आय आय टीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला नापास केल्यास त्याचे पुराव्यासहित स्पष्टीकरण संबंधित शिक्षकाने तिथल्या सिनेट कौंसिलला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमीत कमी ग्रेड देऊन का होईना, कोणी शिक्षक विद्यार्थ्याला नापास करण्याच्या भानगडीत पडत नाही - अनेकदा आय आय टीअन अंडरग्रॅडला रिक्रुटर्स फक्त त्याचा जेईई रँक विचारुन पुढे काहीही न विचारता जॉब ऑफर करतात. त्यामुळे प्रवेश झाल्या झाल्याच विद्यार्थी फार शेफारतात. हाच अ‍ॅटीट्युड पुढे अनेक वर्षे कायम राहतो/असावा. हे सगळे असूनही आय आय टीचा दर्जा हा इतर युनिव्हर्सिटीज पेक्षा तुलनेने उच्चच आहे. पण म्हणून "आम्हीच शहाणे" असा आविर्भाव न करता आत्मपरीक्षण करणे कधीही हितावह आहे म्हणून एक आय आय टीयन या नात्याने हा लेखप्रपंच. :) टीपः सध्या व्यस्ततेमुळे या धाग्यावर प्रतिक्रिया देता येईलच याची खात्री देत नाही. पण अगदीच रहावले नाही म्हणून लेख टंकलाय. पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.

वाचन 10448 प्रतिक्रिया 0