मामाचे गाव - (भरत)
मागील भाग
मळ्यावर असले की ही शेतं ती शेतं अशीच भटकंती सुरु असायची, मळ्यात मोजून १५-१६ घरं. त्यात एक भरतचे घर, भरतला आई-बाबा नव्हते, तो आज्जी-आजोबा सोबत रहात असे, आम्ही त्याला भरत जरी नावाने हाक मारत असू तरी तो आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. मोठी माणसं नेहमी त्याच्याकडे बघून चूकचुकायची पण का? हे आम्हाला कळत नसे, पण भरत सोबत खेळायला आम्हां लहानांना खूप आवडायचे कारण एवढं मोठ्या वयाचे त्यावेळी कोणी आमच्या सोबत खेळतच नसायचे, पण भरत खेळायचा, अगदी लपाछपीपासून ते कवड्यांचा सारीपाट पण.
मिसळपाव