Skip to main content

समाज

निसर्ग, शेती आणि शेतकरी

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 08/01/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच मिपावर उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं हा लेख वाचला. त्यावर भरपूर प्रतिक्रीयाही आल्या. त्यानिमित्ताने मनात आलेले काही विचार... शेतकरी हा एक अत्यंत अन्यायग्रस्त घटक अाहे अशी हाकाटी नेहमी एेकू येते़़. त्यात बर्याच प्रमाणात तथ्य आहेही. पण शेतकर्‍यांकडे परिक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बर्याच गोष्टी आश्चर्यकारकरित्या आपल्या समोर येतात. शेतकरी हे पूर्वी आपले व आपल्या कुटुंबाचे पोट प्रथम भरून मगच उरलेल्या उत्पन्नाची विक्री करायचे.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन

लेखक अमित खोजे यांनी मंगळवार, 30/12/2014 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन मागील भाग १) भाग १ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट २) भाग २ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर ३) भाग ३ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी पूर्वार्ध : कार्नेगी स्टील आतून पोखरली गेली होती. आणि कार्नेगीला तिला परत पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार होते. लोकांच्या मनातील आपली प्रतिमा त्याला परत चांगली बनवायची होती.

भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक

लेखक आतिवास यांनी सोमवार, 29/12/2014 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग (नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.) मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे.

..का आज सारे गप्प

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 26/12/2014 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
..का आज सारे गप्प आपल्यांची हाक आली! कुंपणापार ती निरागस अन् आसामी का निराळी? तेव्हा पेटले गहिवर वन्हि झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली आज आपुलेच वाहता रक्त का वाटे व्यथा निराळी? तुम्हा न गोड लागे तेव्हा अन्न अन् पाणी गात्रे आज ती थिजली अन् बसली दातखीळ साली! ना शब्द करुणा ल्याले ना ओल डोळा आली आज पुन्हा का तुमची विवेकबुद्धी नग्न झाली? ना निषेध दिसला कोठे ना दिसल्या षंढ चर्चा का आज शब्द रुसले अन् मने रिकामी झाली? माणुसकीचा य
काव्यरस

अभिनंदन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 24/12/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ आज महामहीम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी ह्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला . :) अटलजींच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ... जगाचा विरोध धुडकावुन केलेली पोखरण अणु चाचणी , दिल्ली लाहोर साठी सुरु केलेली बस , पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसुन सुरु केलेले कारगिल युध्द , तिथे आपल्या सैन्याने परत एकदा त्यांना चारीमुंड्याचीत करुन मिळवलेला विजय ...

कथा bigger cypher ची

लेखक येडाफुफाटा यांनी रविवार, 21/12/2014 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचार- लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे! यावरुन a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला. म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे! bill अन् melinda gates , warren buffet , Rockfellar किंवा tata वगैरें आयुष्यभर पैसे कमावतात. व नंतर तो स्वहस्ते donate करतात. म्हणजे आयुष्यात आधी कोणत्याही भल्या/बुर्या(रॉबिनहूड,आल्फ्रेड नोबेल वगैरें) मार्गाने पैसे मिळवावे व उतारवयात स्वतःच्याच हस्ते(credit घेउन) खर्च करावे. असे धोरण समाजात मान्य दिसते.

पान,चुना..तंबाखु!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 20/12/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी:- राम राम मंडळी... मंडळी:- राम राम... काय? झाली का कामं? मी:- हो...झाली की! मंडळीतले तात्या:- या...मग बसा! .. ए गेनू.. च्या आन रे! मी:- नको राव. लै झालाय आज. चहा नको.. तात्या:- बरं..र्‍हायलं..मंग पान खा! येश्या:- का गुटखा देऊ? तात्या:- भाड्या..गुर्जिला परत गुटखा इचारला,तर तीच पुडी सारीन तुज्यात! शामू:-तात्या आज बिनपाण्यानी करणार काय येश्या'ची? .. ह्या ह्या ह्या ह्या!!! तात्या:- तसं नाय हो. पण पान कुटं..आनी गुटखा कुटं? येश्या:- बरोबर (आ)हे...आपलं त्ये पान,लोकाचा तो गुटखा! तात्या:- तुज्यायचा तोंड फुटका तुज्या...गप र्‍हा जरा.. शामू:- ख्या ख्या ख्या ख्या...

माणसे जोडणे ...

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 19/12/2014 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपण "माणसं जोडण्याच्या" मोठमोठया गोष्टी करतो आणि नेहेमी त्याची महती गात असतो. आपण मित्र जोडतो, इतर सहकारी जोडतो. पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही? बाहेरची माणसे जोडतांना आपण त्यांना गुणदोषांसकट स्वीकारतो पण नात्यातील माणसांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या अपेक्षा आणि नियमांच्या खाली दाबून टाकतो आणि आपण स्वतः मात्र आपल्यात बदल करत नसतो. म्हणून ते अवघड आहे. कुणी म्हणेल की मित्र निवडतांना चाॅ‌ईस असतो, नात्यात नसतो. पण देवाने तेच तर एक चॅलेंज दिले आहे आपल्याला.