श्रद्धा आणि सबुरी!
विधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते. "कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती.
मिसळपाव