Skip to main content

प्रवास

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

लेखक संताजी धनाजी यांनी बुधवार, 05/11/2008 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला! आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात. म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला.

सेनापती कापशी

लेखक रम्या यांनी सोमवार, 03/11/2008 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षीच्या दिवाळीत काही कामानिमित्त कोल्हापूरला जाणं झालं. कोल्हापूर स्थानकावर पुढारी वर्तमानपत्र घेतलं. पहिल्याच पानावर बातमी होती "सेनापती कापशीत अमूक अमूक घडले". बातमीत "सेनापती" या शब्दाचा काही अर्थ लागेना. थोडा विचार केला नि सोडून दिलं. सी.बी.एस. ला गारगोटी बस पकडून गावी आलो.
दिवसभराची कामं उरकून रात्री आनंदा वारके यांच्याकडे गप्पा हाणायला आलो. नात्यानुसार हे माझे मामा. पण मी त्यांना दादा म्हणतो. व्यवसायाने मराठीचे प्रोफेसर. फार गप्पिष्ट माणूस. बंगल्याच्या दारातली लाईट मुद्दाम घालावली. गावरस्त्यावरील विजेच्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात संगीत, लेझीम याच्या गप्पा रंगल्या.

कबिनीकाठचे हती

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 28/10/2008 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
कारापुर हे कर्नाटकातील एक छोटेसे खेडे. बंगलोर पासून २२० किमी तर म्हैसूर पासून ८० किमी अंतरावरचे हे छोटेसे गाव नागरहोळ्ळे अभयारण्याच्या दक्षिण पूर्वेस वसलेले आहे. इथे एका खाजगी विश्रामगृहात एक दिवस मुक्काम करून आम्ही पुढे मडिकेरीला जाणार होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर सुमारे २० किमी सामसूम भागातून प्रवास केल्यावर आम्ही मुक्कामावर पोचलो. खरेतर आमचा १० जणांचा चमू होता. आम्ही बंगलोरहून म्हैसूर व तिथुन कूर्गला जाणार होतो, पण मेव्हण्याच्या एका मित्राने आम्हाला कबिनी विषयी आग्रहाने सांगितले. वास्तविक अशा ठिकाणी जायचे म्हणजे मला पर्वणी!

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....

भाजे लेणी

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 23/10/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी भाजे येथे जाण झाल. भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत. अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत. ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे) भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे. जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत. स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत. जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो.

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.