Skip to main content

प्रवास

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/04/2009 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले. हे गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे.

अविस्मरणीय वासोटा!!!

लेखक सुवर्णा यांनी शुक्रवार, 27/03/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी २ वर्षांपूर्वी वासोट्याचा trek केला होता, त्याचं वर्णन लिहिलं होतं. तेच मिपावर परत टाकतेय. आवडेल अशी आशा.. :) आम्ही officeमधल्या लोकांनी सातार्‍यापासून अवघ्या 35Km वर असणार्‍या वासोटा डोंगराचा trek केला. वासोट्याचा trek म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यांत जास्त आनंददायी event.. जसा एखाद्या टुकार cricket match मध्ये टुकुटुकु खेळणार्‍या batsmanचा चुकून six बसावा अगदी तसा.. तो एक क्षण, तो आनंद.. तो जल्लोष.. त्याच्यापुढे मग सगळं काही फिकं पडतं.. सगळं जग अचानक सुंदर वाटू लागतं.. सगळ्या काळज्या, चिंता अचानक गळून पडतात आणि मस्त नवीन पालवी फुटते.. उमेदीची.. उत्साहाची.. मस्त!!

दोन संघटना

लेखक अजय भागवत यांनी गुरुवार, 19/03/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१३ जानेवारी१८८८ रोजी ३३ संशोधक आणि शोधक (एक्सप्लोरर) कॉसमॉस क्लब, वॉशिंग्टन येथे जमले व त्यांनी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना केली. ह्या मंडळींना कळून चुकले होते की, जगात अजुन खूप काही शोधून काढायचे बाकी आहे व मानवाला पृथ्वीबद्दलची एकंदरीतच माहिती खूपच त्रोटक आहे. केवळ स्थानिकांकडे असलेली माहिती व आत्तापर्यंत जेथे मानव जाउच शकला नाही तेथे जाउन नवी माहिती जगासमोर आणणे अशा दोन्ही बाबी महत्वाच्या मानुन ह्या सोसायटीची गुढी उभारली गेली. ह्या सोसायटीचे उद्दीष्ट्य "भौगोलिय माहितीचा विस्तार व प्रसारण" असे ठरले. सोसायटीची घटना तयार करुन गार्डीनर हबर्ड हे पहिले अध्यक्ष झाले.