Skip to main content

प्रवास

मी भटकंती का करतो?

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 13/01/2010 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-) ] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून.

एस्.टी आरक्षण साईट

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 11/01/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय रेल्वेच्या आरक्षण साईट प्रमाणेच आपल्या एस्.टी ने ही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा चालू केली आहे. त्याची लिंक या साईटवर प्रथम आपले अकांट काढावे लागते. व त्यानंतर टिकिट बूक करता येते. ठाणे-पुणे मार्गासह, दादर, बोरीवली, नाशिक, औरंगाबाद या मार्गावरील बसेसचे आरक्षणही ऑनलाइन उपलब्ध असेल. इतर मार्गा बद्दल माहिती नाही. अमोल ------------------------------------------------------------------------------------------- मला इथे भेटा

डेटोना बीच, फ्लोरिडा.

लेखक मीनल यांनी रविवार, 10/01/2010 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
टेबल वरच घड्याळ कानात कर्कश्य गजरलं. सकाळच्या सात वाजता माझी भली पहाट झाली होती. जड पापण्या अतिकष्टाने उचलून डोळे किलकिले केले. हॉटेल रूमच्या बाल्कनीला लावलेल्या पडद्यांच्या फटीतून थोडासा प्रकाश आत डोकावत होता. खरतर उजाडताना बाहेर पाहायच होत. म्हणून तर सूर्योदयाच्या वेळी मला उठवून जागं करायची तंबी घड्याळाला देऊन ठेवली होती. आळसाला बिछान्यात गुंडाळून ठेवलं. त्यातून माझ्या शरीराला अलगद सोडवून घेऊन बाल्कनीत लोटलं. झुंजुमुंजू सकाळ रवीला साद घालत होती. तोही जरासा चुळबूळ करू लागला होता. त्या रवीशी मनातल्या मनात शर्यत लावली. "बीच वर कोण आधी पोचतय, तू की मी?

दुर्ग आणि ढाकोबा... सह्यकड्याचे पहारेकरी

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 09/01/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं... २-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...

भटकंती स्पेशल २०१० कॅलेंडर

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 06/01/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा'कर बंधू आणि भगिनी. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. नववर्षासाठी आम्ही काही तरी भेट म्हणून एक उपक्रम राबवला आहे. एक भटकंती स्पेशल कॅलेंडर. पूर्ण कॅलेंडर इथे देण्याऐवजी पहिल्या वर्षाचे पान इथे दाखवत आहे. बाकी कॅलेंडर माझ्या ब्लॉगवरुन डाऊनलोड साठी उपलब्ध आहे.

धाकोबा आणि दुर्ग

लेखक जीएस यांनी बुधवार, 30/12/2009 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्‍या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे. उजवीकडे सिद्धगड, त्याच्या मागे भीमाशंकर, समोरचा दमदम्या, बाजुला आहुपे गावाकडे वर जाणारी घाटवाट, त्याही बाजुला दुर्ग, अजून पलिकडे, जीवधन, नानाचा अंगठा अशी सगळी ओळखपरेड सुरू असतांनाच, या सर्व उत्तुंग भिंतींवरूनही डोके वर काढून आकाशात घुसलेले एक रूंद शिखर दिसते.

राजापुर गुंफा (पाचगणी)

लेखक दशानन यांनी सोमवार, 28/12/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाचगणी च्या टेबल लॅंड वर मनसोक्त फिरून झाले होते, बाइक चालू करून परत खाली उतरू लागलो. पाचगणी बस स्टॅंड च्या बरोबर मागील बाजूस एक चौक आहे एक रस्ता टेबल लॅंड कडे जातो व एक राजापुराकडे व बाकीचे दोन्ही रस्ते मुख्य महाबळेश्वर रोडला मिळतात निमुळता गल्लीवजा तो रोड तेथेच चौकामध्ये एक हिरवट रंगाचा अक्षरे उडालेला सरकारी बोर्ड उभा आहे राजापुराच्या गुंफा. सकाळचे १०. ३० / ११ वाजले होते व अजून खूप वेळ आहे आपल्या जवळ असा मनात हिशोब चालू होता व तो बोर्ड मला सारखा सारखा खुणावतं होता. एकाला विचारले बाबा रे किती लांब आहे व पाहण्यासारखे आहे का काही तेथे?

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

लेखक दशानन यांनी सोमवार, 21/12/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो. पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. पुणे ते घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते. फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला. एक कॉल केला व त्यांना येथे आसपास पाहण्यासारखं काही आहे का ते विचारलं. तर त्यांनी मला म्हसवे गावाचं नाव सांगितले पाचवडहून उजव्या हाताला वळलो. चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. शेवटी एकाला थांबवला आणि त्याविषयी विचारले. तर तो म्हणाला उलट आला आहात. सरळ परत पाचवडला जा, तेथून डाव्या बाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट मारा.