Skip to main content

प्रवास

' राजमाचि येथे जायचे ठरवत आहे.

लेखक मॅन्ड्रेक यांनी मंगळवार, 10/11/2009 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी ' राजमाचि येथे जायचे ठरवत आहे. सोबत १० लहान मुले आहेत ( वय ६-१०) सन्त्रो , कींवा इन्डिका जावु शकेल का? अधिक माहिति हवी आहे. धन्यवाद.

मंडळ निघालं गोव्याला

लेखक प्रभो यांनी बुधवार, 04/11/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
"हमे हर साल कम से कम एक हफ्ते के लिये यहां आना चाहिये" इती दिल चाहता है चा आमीर.... असेच काहीशे वेडे बोल एकोणीस जून दोन हजार सहा ला बोलले गेले....ते होते..."आपण सगळे वर्षातून कमीत कमी एकदा भेटायचं .....तेही मस्त आठवडाभरासाठी..आणी याची सुरुवात करायची या नाताळला.....गोव्यात"....

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/11/2009 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 27/10/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते ! आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore.

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

तहान

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन काल आम्हीही पाठवला मुद्दाम तयार केलेला एक मेघ प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता. काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर? आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच! व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ. आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल. त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे, बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे. तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा, तो तुला काय कामाचा? आम्ही तो घेऊन दुषीत करा

The Windy City...

लेखक अंतु बर्वा यांनी रविवार, 27/09/2009 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, महिन्याभरापुर्वीची गोष्ट... मित्रांबरोबर ओल्ड मंक रिचवत बसलो होतो. सहज बोलता बोलता विषय निघाला की मोठ्या विकांताला काय करायचं? वेगवेगळे ऑप्शन्स चाळून झाल्यावर या वेळी शिकागोला जाउ अस सर्वानुमते ठरलं. बोस्टनहुन विमानाची तिकीटं पाहत असताना एकजण सहज म्हणाला, "आपण ड्राईव्ह करुन जायचं का?" हा बाब्या हे वाक्य मजेत म्हणाला होता आणी त्याच्यासहीत मलाही "काहीतरीच काय?", "वेडा आहेस का?" असे डायलॉग्स ऐकायला मिळणार याची खात्री होती. कारण हजार मैल ड्राईव्ह करुन जायचं आणी तितकचं ड्राईव्ह पुन्हा येताना करायचं म्हणजे अर्धा वेळ त्यातच जाणार होता.

सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 14/09/2009 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश .

बाली

लेखक नंदू यांनी रविवार, 13/09/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सुट्ट्यांमध्ये बालीला जायचा योग आला. तसं पुलंचं पुर्वरंग वाचल्यापासून बाली कायम डोक्यात घर करुन होतंच पण शेवटी योग यावा लागतो. यावेळी मात्र महाजालावरून विमान आणि हॉटेल बुकिंग करूनच टाकलं आणि सहकुटुंब बालीला जाउन आलो. या ट्रीपचा हा सचित्र वृत्तांत. देनपसार विमानतळावर उतरण्यापुर्वी विमानातून दिसणारा हा अगुंग पर्वत. हा एक निद्रीस्त ज्वालामुखी आहे. १९६३-६४ साली याचा उद्रेक झाला होता. रामायणावरील सुप्रसिद्ध केचक नृत्यनाटिका.