Skip to main content

प्रवास

तर्पणाची छाया

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 28/05/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
तर्पणाची छाया
दि. ४ मार्च २०१० "प्रथम पत्नीला स्मरून रामेश्वरच्याकिनाऱ्यावर तर्पण कर" अशी आज्ञा नाडी महर्षींनी केली त्याप्रमाणे मी ३४ वर्षानंतर सौ.छायाला तर्पण करायला मी रामेश्वरमच्या तटावरील समुद्रात सुर्याकडे हात जोडून उभा होतो. तेंव्हा एक वाक्य. क्षणात तरळून गेले. "छाया मी तुझ्या मृत्यूला नकळत का होईना जबाबदार आहे. त्यासाठी तू मला माफ कर. मला माझ्या जबाबदारीच्या त्या बोचणीतून सोडव." डोळ्यातून अश्रु टपकले.

कोकणा मधिल नविन रस्ते

लेखक केदार बर्वे यांनी गुरुवार, 27/05/2010 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो/मैत्रीणीनो, नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्ना मुळे रत्नागिरी येथे जाण्याचा योग आला, त्या निमित्ताने गणपतिपुळे येथे जाण्याचा योग आला, नुकत्याच झालेल्या सागरी रस्त्याने गणपतिपुळे हे ठिकाण आरे वारे मार्गे फक्त १५ कि.मी वर आहे. अनेक ठिकाणी असे खाडी वर पुल झाल्या मुळे कोकणातील अनेक ठीकाणे जवळ आली आहेत, आपल्याला सुधा असे काही माहित असल्यास लिहा.

इंद्रायणीकाठी

लेखक फटू यांनी रविवार, 23/05/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडव्याचा दिवस होता. गुरुवार. नेमका आठवडयाच्या मध्ये आलेला. एक दिवसाच्या सुटटीचं काय करावं हा प्रश्नच होता. आता तुम्ही म्हणाल पुण्यातले थियेटर काय ओस पडलेत? घ्यायचं कुठल्या तरी पोरीला घ्यायचं आणि मस्त ई स्क्वेअरला जायचं. निदान सिटीप्राईडला तरी जायला काहीच हरकत नाही. हाय काय ना नाय काय. पण प्रॉब्लेम असा हाये की ना आपण पोरीबाळींच्या वाटेला जातो ना आपल्याला पिच्चर बगन्यात यिंटरेष्ट हाये. असो. गावी घरी जावं तर जायचे दिडशे आणि यायचे दिडशे असा तीनशे किलोमीटरचा प्रवास एका दिवसात करायला जीवावर येतं. दुसर्‍या दिवशी यायचं ठरवावं तर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो.

सिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 14/05/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
"अबे पश्या! साल्या, १ तास झाला बसची वाट बघतोय" स्वानंद "येईल रे... मी नेहमी इथूनच (राजाराम पुल) सिंहगडला जाणारी बस पकडतो" "सकाळच्या ६ पासून उभे आहोत इथे... आता ७.१५ झाले... ७ च्या आत सिंहगड चढायला सुरुवात करायचा बेत होता आपला... आत कसले आपण तोरण्यावर पोचतोय एका दिवसात... शक्यच नाही..." "पोचणार रे... समजा ८ ला सिंहगड चढायला सुरुवात केली, तर ९ ला वरती... मग साधारण संध्याकाळी ५ ला राजगडावर आणि मग रात्री १० पर्यंत तोरण्यावर... काळोख पडला तरी चालत राहायचं... ही बघ! बस पण आली..." सिंहगड चढायचा, मग डोंगर रांगेवरुन विंजरहून राजगड आणि मग डोंगर रांगेवरुन तोरणा... हे सगळं एका दिवसात करायचं...

अप्रतीम गांधारपाले लेणी

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 12/05/2010 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात " alt="" /> कोकणामध्ये अनेक लेणी आपणास पहायला मिळतात.मुंबई -गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतीम लेणी पहावी अशीच आहेत.इ.स.पूर

प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 10/05/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">
महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला.

गणपतीपूळे

लेखक वैदेहीजी यांनी शुक्रवार, 07/05/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीपूळे मंदीर
प्रदक्षिणा मार्ग

पुणे ते नासिकः गडकोटांच्या साक्षीने, रेल्वेच्या मार्गाने

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 07/05/2010 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते नासिक व्हाया पनवेल हा रेल्वे मार्गाचा प्रवास इतरांसाठी सर्वसाधारणपणे लांबचा (बसमार्गापेक्षा १ तास जास्त) व कंटाळवाणा असला तरी आम्हा सह्याद्रीप्रेमींसाठी खूपच आनंददायक कारण ह्या सबंध प्रवासात सह्यधारेवरील २ घाट व अनेक किल्ले व सुळके यांचे उत्कट व उत्कृष्ट दर्शन होते. रेल्वेने पुणे सोडताच दापोडी नंतर डावीकडे सिंहगडाचे त्याच्या चिरपरीचित मनोर्‍यासह दर्शन होते ते थेट देहूरोड पर्यंत. आता उजवीकडे तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर दिसू लागतो व लगेचच डावीकडे घोराडेश्वराची लेणी लक्ष्य वेधून घेतात.

नैनिताल : एक काकडलेला अनुभव

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 29/04/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
नैनिताल म्हटले की डोळ्यांसमोर येते विशाल पर्वतराजी, नेत्रसुखद निसर्ग, मनाला आल्हाद देणारे नैनी सरोवर..... बर्‍याच वर्षांपूर्वी केलेला माझा नैनितालचा प्रवास म्हणजे या सर्व सुंदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाह्यतः केलेली मौजमजा व अंतर्यामी विचारमंथन असा दुहेरी अनुभव होता. परवाच एका वर्गमित्राने ओर्कुटवर त्या प्रवासाचे व सहलीचे काही फोटोज अपलोड केले आणि ते पाहिल्यावर मनात त्या सहलीच्या स्मृती रुंजी घालू लागल्या. महाविद्यालयाच्या अखेरच्या पर्वातील अभ्यास-सहल म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींच्या सोबत धमाल करण्याचा अधिकृत परवानाच जणू! मी व आमच्या वर्गातील सहाध्यायी मित्र-मैत्रिणीही याला अपवाद नव्हतो.