जुनेरलं नातं...निरोपाची वेळं
प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात.
जुनेरलं नातं...
आभाळीची चंद्रकोर
शोभते तुझ्या भाळी
तुझ्या पैंजण नादाने
आनंदाची मांदियाळी
चंद्रकोरीचा गारवा
सुखावतो डोळा
विचार चांदण्याचा
मनी घुमतो पारवा
चंद्रकोर झाली बिंब
उजळल्या दाही दिशा
चंचल मन शिंजीर
पालवल्या नव्या आशा
जसे नभी सुर्य चंद्र
दिनरात अशी साथ
कधी तार कधी मंद्र
ताल,सुरांचे आर्त
साथ कधी सरू नये
जुनेरल्यां नात्यावर
निरोपाची वेळं
कधी येवू नये
जुनेरले नाते
नियतीचा खेळं
एक जायं दिगंताला
एक फुपाट्यातं जळं
काव्यरस
मिसळपाव
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.
पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.
प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.
पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.
राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.