गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ४ अलवार
प्रियांसी
गोंधळलीस ना?
मी तुला हे विशेष नाव दिलंय. शुअर तुला आवडेल.
मॉडर्न वाटतं ना? आणि तितकंच प्रेमळ. प्रियांसी असं नाव नसतंच मुळी म्हणूनच ठेवलं तुझं नाव. कारण तुझ्यासारखी आणखी कोणी नको. म्हणजे तुलना करून मला जी आवडते तिच्याबद्दलच्या आदर मला कमी नाही करायचाय. म्हणून आजपासून तू प्रियांसी.
तू मला म्हंटलेलं idiot पण कित्ती गोड वाटतं.
आय डोन्ट माईंड तू मला इडियट म्हणत जा. आवडेल!!
इडियट ची प्रियांसी :)
अगं मी त्या SAP coding च्या टूर वर होतो. अमित सरांनी अचानक सांगितलं. म्हणून तुला उत्तर द्यायला वेळ लागला.
मिसळपाव