Skip to main content

मौजमजा

आता वाजणार की हो बारा बारा बारा ............

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 10/12/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
वीसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणार्‍या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल.

समसचा २० वा वाढदिवस

लेखक विकास यांनी सोमवार, 03/12/2012 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
३ डिसेंबर १९९२ ला नील पॅपवर्थ नामक ब्रिटन मधील एका टेलीकम्युनिकेशन मधे काम करत असलेल्या इंजिनियरने मोठ्या संगणकावर Merry Christmas असे टंकले आणि "एंटर" चे बटन दाबताक्षणी ते युकेस्थित व्होडाफोनच्या एका डायरेक्टरच्या हाताच्या पंजापेक्षा मोठ्या असलेल्या मोबाईल फोनवर चमत्कार झाल्याप्रमाणे ते अवतिर्ण झाले आणि जगातला पहीला एस एम एस तयार झाला. अर्थात एका हाडाच्या इंजिनियरच्या दृष्टीने त्याने एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. यापुढे काही नव्हते. पण कंपनीच्या उद्योजक मनास त्यातूनच एक मोठी धंद्याची संधी दिसली. पुढे बघता बघता एस एम एस चे प्रस्थ वाढत गेले.

रोजचाच प्रवास

लेखक शरद यांनी शुक्रवार, 23/11/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचाच प्रवास (आज मात्र विचार करत करत ) डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईकडे जात आहे. रोजचाच प्रवास. आता असे सांगा डेक्कन क्वीनचा कोणचा भाग, रुळांच्या हिशेबाने, (relative to railroad track) पुण्याकडे जात आहे ? शरद

माझी चार अंग वस्रे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 21/11/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

आता काळ, काम, वेग

लेखक शरद यांनी बुधवार, 21/11/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
हे कोडे घालण्याचा उद्देश आपण शाळेमध्ये शिकलेले सर्वच बरोबरच असते असे नाही एव्हड्यापुरताच मर्यादित होता. सर्वश्री अरुण मनोहर,राजेश व आनंद घारे यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी बाहेर पडण्याचा वेग दाबाच्या ( म्हणजेच पाण्याच्या उंचीच्या) प्रमाणात बदलतो. व सर्व पाणी बाहेर पडावयास फार म्हणजे फारच वेळ लागेल. साध्या गणीताने ह्याचे उत्तर काढता येत नाही व इंट्रिगल कल्क्युलसचा वापर आपण रोज करत नाही. द्या सोडून. व्यवहारतः साधारणपणे २० मिनिटे हे उत्तर. याचाच पुढचा भाग म्हणजे शाळेतील काळ, काम,वेग यांची उदाहरणे. टाकीत एका नळाने पाणी भरा व दुसर्‍या नळाने बाहेर सोडा अशी गणीते आपण सोडवत होतोच.

बघा उत्तर देता येते कां ?

लेखक शरद यांनी सोमवार, 19/11/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेदार कोडी आमचे मित्र प्रा. यनावाला यांच्या तर्कक्रीडा या कोड्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण माझ्यासारख्या तर्कशास्त्रात "ढ" असणार्‍या लोकांना त्यातले ओ की ठो काही कळत नसे. उदा. बारा नाण्यात एक नाणे निराळे आहे. कमी की जास्त वजन हेही ठाऊक नाही. फक्त तिनदा काट्याचा उपयोग करून निराळे नाणे ओळखा. आमची मजल ते हलके (किंवा जड) आहे हे माहीत असेल तर उत्तर काढण्यापर्यंतचीच. आणि नंतर त्यांनी उत्तर सांगितले तेही आमच्या डोक्यावरून गेले. ते जाऊ द्या. माझी कोडी सोपी आहेत. अगदी शाळकरी म्हणालात तरी चालेल. पण नम्र विनंती की तुमचे उत्तर द्याच. वर कोणाशी सहमत असाल तर +१ म्हणा, पण प्रतिसाद द्याच. कां ?

दारू फुकट झालीच पाहिजे...

लेखक अस्वस्थामा यांनी शनिवार, 10/11/2012 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
दारूच्या या गुत्त्यावरचा, गुंता काही सुटत नाही.. किती उधारी दिली तरी ही, हिशेब काही मिटत नाही.. चकन्यामधले शेंगदाणे, मी बारीक्क नजरेनं मोजतो आहे, रोज एक्केक दाणा कसा, कमी कमी भरतो आहे.. एक दिवस एकच शेंग, पाहून आमचा सरकला.. 'म्हागाई माजली न् भौ', संप्या वेटर चिरकला .. आधीच साला बायको आमची, पगार आमचा करीत नाई.. शेट्टी उधारी ठेवीत नाई, अन् आता संप्या चकनापण देत नाई.. डोक्याला हात लावून, बाटलीकडं बघत बघत.. टेबलावर उभा राहून बोलला बाब्या मोडक.. 'सरकारनं आता तरी, गरिबांकडं पाह्यल पायजे.. बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे.. बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे..'
काव्यरस

तुम्ही किती व्यवस्थित आहात?

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 10/11/2012 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा. प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.

स्कायफॉल-

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 05/11/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली आहे यात शंकाच नाही. नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे.

वाधल्या दाढी-मिश्या

लेखक खान यांनी गुरुवार, 01/11/2012 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कर मन्दलि, मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे.
काव्यरस