Skip to main content

मौजमजा

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी बुधवार, 25/12/2013 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

आणि रजनीकांत रडला - धूम ३

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 22/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

लेखकु

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 18/12/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कविता माझी वाच, कथा माझी वाच लेख नक्की वाच, लेखकु म्हणे आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि आव पिडीताचा, सात्विक संतापाचा वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट इतरांची लावू वाट, दिसता क्षणी ओलावले डोळे, भारावले मन शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद वर आणण्याचा नाद, लेखनाला इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान काढी फेसबुकी पान, स्वत:चे नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा || --------------------------

नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/12/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...) नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ | कुणी आपटे 'तो' फरशीवर कुणा वाटते फुटे भिंतीवर फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१| 'काळ' मम मुखी लाडू घरचा जबडा न कळा सहतो वरचा हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२| जितुके लाडू तितुकी नावे हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव..|३| .
काव्यरस

मेरे सामनेवाली खिडकी मे... ३

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 12/12/2013 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे सामनेवाली खिडकी मे मेरे सामनेवाली खिडकी मे... २ ********* या संपूर्ण कथेत माझ्या मनाची ब-याचदा द्विधा अवस्था झाल्याचं मला स्वतःलाच लेखन करताना लक्षात येतंय. आता, ओळख झाली, त्यात नंबरही मिळाला. मी समोरच राहतो म्हटल्यावर ती गोड हसली होती. त्यामुळे तिला पाहायची, तिच्याशी बोलायची इच्छा अजुनच बळावत चालली होती. पण त्याचवेळी आता किचनाच्या खिडकीतून तिला बघत बसण्यासाठी मन धजेना. मी आता कमालीचा धास्तावलो होतो. जर त्या रितेशऐवजी तिने मला तिला बघताना पकडलं असतं तर?? तसं तिनं एकदा पकडलंही होतं म्हणा.

'आणि मिळवा एक चित्र' चा निकाल

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 09/12/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः http://www.misalpav.com/node/26057 निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व. आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे: वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले. वल्ली यांनी तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राज्ये, भूगोल इ.

मेरे सामनेवाली खिडकी मे... २

लेखक वडापाव यांनी रविवार, 08/12/2013 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे सामनेवाली खिडकी मे ***** ती बसली होती. मी तिच्या समोर बसलो होतो. ती माझ्याकडे बघून हसत होती. मी तिच्याकडे बघून हसत होतो. तिने माझ्याकडे बघत बघत मला हनुवटी खाली करून जवळ बोलावलं. मी हळूच सरकत तिकडे गेलो. माझी छाती धडधड करत होती. मी जवळ गेलो. ती लाजली. हसली. माझ्या छातीतली धडधड वाढली. मग तिनं एक हात माझ्या खांद्यावर ठेवला, आणि दाबला. मी त्यामुळे जरा खाली झालो. तिने माझ्या कानाजवळ दुस-या हाताचा कंस केला आणि तिचे ओठ माझ्या कानाच्या अगदी जवळ आणले. काय सांगेल ही आता मला? खरंच काहीतरी सांगणार आहे की दुसरंच काहीतरी करणार आहे?

मेरे सामनेवाली खिडकी में...

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 05/12/2013 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईला बागकामाची आवड आहे. पण आम्ही तिस-या माळ्यावर राहात असल्याने, तळमजल्यावर जी मंडळी राहतात त्यांनीच बिल्डींगच्या आजुबाजुच्या परिसरात त्यांची(कसं आहे ना लोक झाडांवरही हक्क सांगतात) झाडं लावलेली आहेत. त्यामुळे आईला तिची हौस घरच्या घरीच खिडक्यांत कुंड्या लाऊन भागवावी लागते. किचनमधल्या ('स्वयंपाकघरात' असं म्हणणं आणि लिहीणं दोन्ही वेळखाऊ) खिडकीत एक लांबलचक मोठ्ठी चौकोनी कुंडी आहे. याला आम्ही खख म्हणतो (खताचा खड्डा). इथे भाज्या-फळांची सालं, बिया, उरलेला भात, शिळी पोळी, नासका पाव - थोडक्यात जे जे काही टाकाऊ आणि विघटनशील आहे ते इथल्या मातीत टाकतो.

एकला चालो ......भाग २

लेखक ज्ञानव यांनी बुधवार, 04/12/2013 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकला चालो....
एवढ्यात बस आली.
विनायक "आधी मुलींना चढू द्या मुलींना चढू द्या...बसमध्ये" हे स्वतः बसमधल्या ३ पायर्या चढून इतर मुलांना सांगत होता. मग काय मंजू मागोमाग सगळ्याजणी आणि सगळेजण असे लाईनशीर बसमध्ये चढणे चालू झाले.

एकला चालो

लेखक ज्ञानव यांनी मंगळवार, 03/12/2013 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८८,डिसेंबर तिला प्रथम भेटलो मी. सकाळी सात वाजता सगळे मित्र मैत्रिणी रायगड पिकनिक साठी पु.लं.च्या भ्रमण मंडलागत उभे होतो. ढापण्या विनायक टीम लीडर सर्वांना काहीबाही सूचना देत होता मैत्रिणी ते ऐकत उभ्या होत्या आणि मित्र "पकवतोय रे!! मंजुला इम्प्रेस करतोय" सारखे वाग्बाण त्याच्या दिशेने भिरकावत त्याला टेन्शन देत होते. मी बस स्टोपच्या रेलींगला पार्श्वभाग adjust करत हे सगळे पाहत होतो. कोवळी उन्हे सगळ्यांच्या अंगावरून झिरपत होती, किंचित थंड वातावरण त्यामुळे काही जणांचे चेहरे दिसत नव्हते पण एक गुलाबी कि चंदेरीशी छटा सर्वांची एक औट लाईन दाखवत होती.