एकला चालो

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 1:21 pm

सन १९८८,डिसेंबर तिला प्रथम भेटलो मी. सकाळी सात वाजता सगळे मित्र मैत्रिणी रायगड पिकनिक साठी पु.लं.च्या भ्रमण मंडलागत उभे होतो. ढापण्या विनायक टीम लीडर सर्वांना काहीबाही सूचना देत होता मैत्रिणी ते ऐकत उभ्या होत्या आणि मित्र "पकवतोय रे!! मंजुला इम्प्रेस करतोय" सारखे वाग्बाण त्याच्या दिशेने भिरकावत त्याला टेन्शन देत होते.
मी बस स्टोपच्या रेलींगला पार्श्वभाग adjust करत हे सगळे पाहत होतो. कोवळी उन्हे सगळ्यांच्या अंगावरून झिरपत होती, किंचित थंड वातावरण त्यामुळे काही जणांचे चेहरे दिसत नव्हते पण एक गुलाबी कि चंदेरीशी छटा सर्वांची एक औट लाईन दाखवत होती. त्यातून एकेकाला ओळखण्याचा माझा खेळ चालू होता. हा विनायक, हा महेश, हा संजय, हि... ती....आणि अरे हि कोण? पांढर्या शेंदरी कपड्यात(ते चुडीदार वगैरे कशाला म्हणतात माहित नव्हते...एवढे आम्ही माठ), मध्यम बांध्याची,वर्ण कळत नव्हता कारण उन्ह झिरपत होती, केस मोकळे सोडल्याने ते किंचित हवेत तरळत होते. त्याही पेक्षा औट लाईन....उफ्फ
लगेच एक प्रतिक्षिप्त क्रिया झाली "विनायक...." जोरात हाक मारली अंमळ जास्तच जोरात झाली असावी सगळ्यांनी ह्याला काय झाले म्हणून वळून पहिले तिनेहि पहिले आणि झिरपणारी उन्हे लाजून मागे सरकली एक क्षण तिचा चेहरा समोर आला आणि नजर नजरेत मिसळली. गव्हाळ रंग, काळेभोर डोळे, सरळ नाक, रेखीव ओठ, गोल चेहरा (परीक्षेसाठी घोकंपट्टी करून लक्षात राहत नाही ते आजही ठळकपणे सगळे आठवते आहे.....जीव शास्त्र तसा सोपा विषय)आणि मला हो मलाच साजेशी उंची..."अरे बस येताना दिसतेय रे " मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो. वास्तविक सरळ लांबलचक रस्त्यावर सकाळी काही डबेवाले (जेवणाचे डबेवाले सायकलवर) आणि काही वाटसरू, रिक्षा इ. सोडले तर काही नव्हते.
पण उगाच...
एकूण माहोल पाहता चिन्या माझ्या कानाशी पुटपुटला "राजे, हा गड सर व्हायचा नाही."
"का रे ?"
"एकतर इथली नाही बुटुकची मैत्रीण आहे. सांगलीला असते. रायगड झाला कि उद्या सांगलीचे बुक्किंग झाले आहे.
एक पैलवान बरोबर आहे, भाऊ तिचा, पण रेड्यागत आहे. उधळलेल्या बैलाचे कान धरून शांत करतो"
न कळत माझे हात माझ्या कानाकडे गेले!!! नजर तिच्याचवर! शेपटीतून हवा काढलेल्या फुग्यासारखे मन सैरभैर होत जमिनीवर आले.
मग मात्र चिडलो "चिन्या, साला बहिर्जी नाईक पण शिकवणी लावतील तुझ्याकडे इतकी माहिती कशी काढतोस? तेहि कुणी ना सांगता "
पण बेट हा गड नव्हे हीच राजधानी असे मनातल्या मनात ठरवले.
तेवढ्यात बस आली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

पुढे काय झाले असेल? लगाव बत्ती.....

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बुडबुडा's picture

3 Dec 2013 - 2:10 pm | बुडबुडा

आवडल आपल्याला...पकवतोय रे!! मंजुला इम्प्रेस करतोय

दिपक.कुवेत's picture

3 Dec 2013 - 3:50 pm | दिपक.कुवेत

विचारा....ते पुढची कथा सांगतील

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 4:07 pm | प्यारे१

>>>>पुढे काय झाले असेल?
काय की! माहिती नाय ब्वा.

>>> लगाव बत्ती.....
बरंच सुचतंय पण गप्प बसतोय. ;)

स्टार्ट चांगला आहे मालक. येऊ द्या पटापट.

जेपी's picture

3 Dec 2013 - 7:09 pm | जेपी

लवकर आटपल .
येऊ दे पुढचा भाग ,
आजकाल सगळच महाग :-)

वडापाव's picture

3 Dec 2013 - 7:11 pm | वडापाव

लवकर आटपलं

प्रभाकर पेठकर's picture

3 Dec 2013 - 8:47 pm | प्रभाकर पेठकर

'एकला चालो' ह्या शीर्षकावरून कथेचा भविष्य काळ कांही उज्वल वगैरे दिसत नाहिए.

अग्निकोल्हा's picture

3 Dec 2013 - 11:37 pm | अग्निकोल्हा

.

मिनेश's picture

4 Dec 2013 - 10:42 am | मिनेश

गडाच्या सावळ्या तांडेल कडून(पैलवान भावा कडुन) तुमच्या चिंधड्या उडवल्या गेल्या नसतील अशी आशा करतो....(ह घ्या) आणी पुढचा भाग लवकर येउ द्या.....