Skip to main content

नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...) नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ | कुणी आपटे 'तो' फरशीवर कुणा वाटते फुटे भिंतीवर फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१| 'काळ' मम मुखी लाडू घरचा जबडा न कळा सहतो वरचा हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२| जितुके लाडू तितुकी नावे हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव..|३| .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3162
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त विडंबन! ज्यांना पत्नीची भीती अजून माहिती नाही अशा वल्ली, सूड आणि बुवा यांच्या प्रतिक्रिया वाचून जास्तच गंमत वाटली आहे! =))