Skip to main content

मौजमजा

कट्टा: दादर पूर्व ऋषी हॅाटेल

लेखक सूड यांनी रविवार, 25/05/2014 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्हाट्सअ‍ॅपवर मिपाकरांचे असे चार ग्रूप आहेत. कोणते ते विचारु नका, अभ्यास वाढवा असं उत्तर मिळेल. त्यातल्या एका ग्रूपवर मेसेज आला शन्वारी सांच्याला कोण कोण भेटू शकतं. मेसेज अर्थातच विमेंचा होता. शन्वार संध्याकाळ असल्यामुळे तसाही उंडारायला वाव असतो, मग मी तर मेसेज आल्याआल्या हो म्हणून सांगितलं. त्यातही दादरसारख्या ठिकाणी कट्टा होणार होता. आता हल्लीच्या फ्याशनीनुसार मध्यवर्ती समजली जाणारी ठिकाणे न निवडता आल्याची खंत होतीच म्हणा, पण असो. कट्टा ठरला, पण बा़कीचे डिटेल्स विमे बैजवार देणार असल्याचं म्हणून तिथेच विषय संपला.

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/05/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/05/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे -

लेखक विदेश यांनी रविवार, 11/05/2014 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
. (चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-) आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ... घाव अंतरी बसतच होते घर खरोखर सुखात होते खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ... उसनवारीचे द्रव्य जमविले व्याजच होते भारी कसले द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ... उगाच माझी होती दैना खाली पाकिट मार्ग सुचेना वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ... सदनि या जरी होती शांती पाहुणे परंतु येता बोंब ती आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ... .
काव्यरस

लाटणे सोबती सोडीना ती पाठ -

लेखक विदेश यांनी शनिवार, 10/05/2014 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
. ( चाल: पाऊले चालती पंढरीची वाट -) लाटणे सोबती सोडीना ती पाठ मनी संसाराची सोडावी का वाट ... | धृ | भांडूनिया सारी चाळ ओरड्याने जमता रिकाम्या घरी शुकशुकाट ... लाटणे खाष्ट दुष्ट सारे नातेवाईक ते साधुनिया संधी, न बसती मुकाट ... लाटणे चुकविता प्रहार मी लाटण्याचा कसा त्या बयेचा वाढे थयथयाट ... लाटणे मनी खंत धरता नसे तडजोड झेला भांडीफेक एका पाठोपाठ ... लाटणे .
काव्यरस

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 09/05/2014 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
. "" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -"" (चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी) मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ... नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा " का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी .....
काव्यरस

काहितरी रोचक...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 05/05/2014 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर सापडलेल्या खजिन्यातील काही रोचक हिरे-माणके मिपामित्रांबरोबर वाटाविशी वाटली... १. बदलते जग (चाळीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते भविष्यात २५ कोटी वर्षे पर्यंत)... . २. जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत... . ३.

दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 27/04/2014 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रगुप्त उवाच: दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 25/04/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान.