Skip to main content

मौजमजा

मिपाचे जावई व सुना, एक ओळख....! :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 15/12/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, आपण सर्वच जण येथे नेहमी येत असता, लिहीत असता, वाचत असता. मिपावर येणे झाले नाही तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते, मिपा आता कुटुंबाप्रमाणेच आहे, इत्यादी.. असेही आपल्यापैकी बरेच जण अनेकदा म्हणताना आढळतात.. आता कुटुंबाचाच विषय निघाला तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जोडीदाराचा विषयही ओघानेच आला. आणि म्हणूनच हा पेश्शल धागा मिपाकर सदस्यांच्या जोडीदारांकरता आहे. त्यांची ओळख करून घेण्याकरताच आम्ही ह धागा सुरू करत आहोत.. मिपावरील पुरुष सभासदांच्या जोडीदारांना इथे मिपाच्या सुना मानले आहे आणि स्त्री सभासदांच्या जोडीदाराला येथे मिपाचे जावई मानले आहे.

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 09/12/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो.. ओळख ना पाळख.. लेखक : सुरेश जयराम दिग्दर्शक : मंगेश कदम निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...

टी-शर्ट

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज गणेश विसर्जनाचा दिवस. सर्वत्र ढोल ताशे वाजत होते. मी सुध्दा माझ्या मित्रांसोबत गणपती पहायला गेलो. गणपतीचा सण म्हणजे, ढोल-ताशे, विविध गणेश मंडळ. त्या-त्या गणेश मंडळाचे लेझीम पथक, टी-शर्ट. मी लहान असताना त्या गणपतीच्या सणाच्या काळात लेझीम खेळणा-यांना देण्यात येणा-या टी-शर्टचे मला फार आकर्षण होते. पण मला ते कधीच मिळालेच नाही. असो. अशा सार्वजनिक सणाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. आमच्या येथे तर चौका-चौकामध्ये पोलीस उभे असतात. सध्या बॉम्बस्फोटाच्या चर्चेमुळे सुरक्षा व्यवस्था अजूनच कडक करण्यात आली होती.

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 08/12/2008 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

हे भारतात होईल?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
http://fieldnotes.msnbc.msn.com/archive/2008/12/01/1685159.aspx अगदी हाच नसेल तरी असे इतर काही उपक्रम भारतात नक्कीच होत असावेत. अशा उपक्रमांची माहिती मिपा वर संकलित करता येईल का? तरुणाईचा (under-20) सहभाग मिपा वर कमी दिसतो तो वाढवता येइल.

फुलटू माज

लेखक टारझन यांनी गुरुवार, 27/11/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही गोष्ट कधीही कशीही आठवू शकते. .. आम्ही किती माजुरडे होतो, याची आठवण झाली. असं म्हणतात, नुकत्याच तरूण वयात जर व्यायाम/कसरत केली की अंगात 'माज' येतो. हा 'माज' नकारात्मक दृष्टीने नव्हे, अंगात अशी एक प्रकारची रग शिरते की ती ताकद कुठे तरी कशी तरी दाखवलीच्च पाहिजे अशी माणसिकता होते. आणि मी अशा माणसिकतेतूनच गेलोय, थोडंस मोकळं करतोच ...यावरून फक्त मला 'जज' करू नका हीच विनंती. कारण काळा नुसार माणूस बदलतोच. परिपक्व होतो (अपवाद सोडता). असो, तर लहाणपणापासून तोंडात लै जोर होता.

तो षटकार!!!

लेखक उम्मि यांनी मंगळवार, 25/11/2008 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा-कोलेजात असताना, आम्ही क्रिकेट जाम खेळायचो बुवा! मी आणि माझे बरेचसे मित्र कोलेज सुटले रे सुटले कि क्रिकेट्साठी जमायचो अन अगदी काळोख होइपर्यत खेळायचो. जेवणाची वेळ, चहा याची जराही आठवण नसायची तेव्हा...... आमच्या खेळण्याच्या २ जागा होत्या, एक हायवे जवळ असलेला 'सर्विसिंग रोड', आणि दुसरी म्हंजे 'अलकनंदा मैदान'. तसा मी क्रिकेट्च्या सर्वच क्षेत्रात (फंलदाजी, गोलदाजी व क्षेत्ररक्षण) पांरगत होतो. म्हंजे रेकार्डच तसा होता आपला...समोरच्या फंलदाजाने चेंडु उंचावर टोलावला असेल, आणि खाली का जर मी क्षेत्ररक्षणासाठी असेन तर आमच्या टीमचा गोंलदाज जराही जोशमध्ये न येता गपचुप बोलिंग मार्कवर जात असे.

खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

लेखक संताजी धनाजी यांनी शनिवार, 22/11/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही घ्या हॉटेलांची यादी. ज्या लेखावरुन यादी बनवली तो येथे आहे. तुम्ही प्रतिक्रिया देवुन यादिमध्ये वाढ करु शकता. पुणे १. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३० झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण. मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे. २.

संक्रांतीच्या शुभेच्छा

लेखक नंदन यांनी शनिवार, 22/11/2008 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. २. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल. अल्फा असो वा याहू!
Taxonomy upgrade extras