कोवळा हुंकार
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू
कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं
अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं
दोन ठोकर खात मला माझं संपवावं
रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं
नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं
प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं
वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत.
कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात.
मिसळपाव