मांडणी
भाग ११ अंधारछाया प्रकरण १० - ‘बगतो थोड दीस. मला चोरी मारी करावीशी वाटतिया! ही फुसकी! काय गज वाकवतीया का कुल्प तोडतीया?
अंधारछाया
दहा मंगला गुरूजींना आलो भेटून सांगलीहून. अजून सत्तेचाळीस माळा व्हायच्या होत्या. गुरूजी म्हणाले, ‘आता तीच करेल जप स्वतः. पाहू काय होतय ते. ही मंतरलेली विभूती देतोय ती फक्त सकाळी लावा. फरक दिसेल. नंतर हे आणि गुरूजी बसले होते बराच वेळ गप्पा मारत. मी बेबीला घेऊन, ब्रेड थोडी भाजीबीजी घेऊन स्टँडवर गेले. हे म्हणाले, ‘लॉर्ड्समधे कटींग वगैरे करून येतो. सावकाश’. बेबी हात पाय धुवून बसली देवासमोर. माळ हातात घेऊन. म्हणाली, ‘करू सुरू माळा? तू आणि मी दोघीही म्हणूया बरोबरच! ‘चला, आज हात धरून म्हणावे लागले नाही म्हणायचे’.भाग १० अंधारछाया प्रकरण ९ - आत्ता पर्यंत मेलेले जर मानगुटीवर बसायचे म्हणाले, तर प्रत्येकाला एक एक तरी घ्यावा लागेल उरावर!
अंधारछाया
नऊ दादा मंगला आत बेबीकडून जप करून घेत होती. पडल्या पडल्या मी विचार करत होतो. आता यापुढे काय होईल? या संबंधी. भूत-पिशाच निकट नहीं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।। हनुमान चालिसातील चरण आठवला! वाटले की ही भूत पिश्शाच योनी आपण मानतो! एखाद्याचा आत्मा अतृप्त राहिला की त्याची वासनापूर्ती होईतो आत्मा फिरत राहातो अंतरिक्षात. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. या जन्माची फळे पुढच्या जन्मात भोगायची असे आपले शास्त्र सांगते. पुर्वीचे बारा जन्म आपण कोण कोण होतो याची स्मृती बहिणाबाई सारखी अडाणी संतबाई ही सांगते! इंग्लंड-अमेरिकेतही लोक आहेत बरेच ते ही आठवतात आपला पुर्वजन्म!भाग ९ अंधारछाया प्रकरण ८. समजा मीच या फुल्या काढायचे ठरवले, घरात कोणी नसताना! तर मी काय करेन? ठीक आहे, काजळाची डबी घेतली. कशाने काढेन मी अशा फुल्या? काहीतरी काडी बिडी हवी! येस काड्यांची पेटी हवी!
अंधारछाया भाग ९ - प्रकरण ८
मिसळपाव