होत अस कधी कधी
लेखनप्रकार
होत अस कधीतरी
कधीतरी काहीतरी राहून जात. निवांत वेळी अचानक आठवत रहात. ऑफीस मध्ये कुठल्यातरी विषयावर प्रेझेंटेशन चालू आसत.तुम्ही त्यात असता आणि नसताही. कधी तरी अस होतेही किंवा होतही नाही. समोरच्या सफेद पडद्या वर अचानक तुमच्या आयुष्यातील क्षण चित्रे नव्हे स्थिर चित्रे दिसायला लागतात. तुम्ही दचकता इतराना तुमच्या मनातले पडद्यावर दिसतेय म्हणोन. फलकावर तुम्ही बघता तुमचे काही क्षण जगायचे राहून गेलेले असतात
तुमची आई तुमच्या साठी केलेला सुंदर पदार्थ तुम्हाला वाढूंन तुमच्या प्रतिसादा साठी तुमच्या चेहेरयाकडे बघत असते पण तुम्ही तो पदार्थ तुम्हाला आवडूनहीँ ढीम्म असता.आई तुम्हाला पुन्हा वाढते पण तुम्ही काहीच प्रतिक्रिया देत नाही.तुमचा एक क्षण जगायचा राहून गेलेला असतो
तुमची छोटी मुलगी कधीतरी तुमच्या माण्डीवर येऊन बसते.शाळेतली भांडण सांगत असते पण तुम्ही तुमच्या उद्याच्या प्रेजेन्टेशन ची स्लाइड करत असता. त्यावेळात तूमची एक स्लाइड बनते मात्र एक क्षण जगायचा राहून गेला असतो
तुमच्या बाबांचे पाय दुखत असतात तुम्ही तत्परतेने डब्यातली कसलीशी गोळी काढून देता तत्परतेने ताँब्यातले पाणी पुढे करता पुत्र कर्तव्याची जाणीव म्हणून पण त्याच वेळी बाबांचे पाय चूरून द्यायचे तुमच्या मनातही येत नाही. तुमचा हा ही एक क्षण जगायचा राहून गेलेला असतो.
तुमचा मित्र तुम्हाला कधी तरी एखादा फोन करतो पण तुम्ही तो कट करता वर "आय एम ईन मीटिंग वील कॉल यू इमीजीएटली वंस फ्री" असे टेम्पलेट पाठवता. गडबडीत विसरता मग खजील होऊन रात्री परतेचा फोन करता. मित्र म्हणतो काही नाही रे सहज. तुझ्या ऑफीस जवळ होतो. कोलेजची आठवण झाली तशीच चहा आणि भजी खाऊया का म्हणून फोन केला होता. असू दे पुन्हा कधी तरी. तुमचा हा एक क्षण तुटलेला असतो
हे आणि असेच खुप क्षण असतात पण तुम्ही ते जगायचे विसरलेले असता. होत अस कधीतरी किंवा कधीतरी होत ही नाही
वाचने
3327
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
खूप छान,... अगदी टचिंग !
सुंदर ! कधी कधी नाही, बर्याचदा ! :)
मस्त, लिहित राहा
छान लेख
मनाला चटका लावणारा लेख...
फुकट डोक्याला शॉट लावणारा लेख.
ती अशी होती
*होतं असं कधी कधी......*
खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण...
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते...
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे...
टाळतो आपण कॉल करायचा....
त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...
_'तुझ्या ऑफिस बाहेर होतो..._
_भेटलो असतो...'_
जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच...
*स्वतःला खोटं खोटं समजावत...!*
*
कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली...
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...
माया,कणव दाटून येते मनात आपल्या...
_'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??'_
पाकिटात हात जातो...
शंभराची नोट लागते हाती...
व्यवहार जागा घेतो ममतेची...
समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...
_"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."_
तो सुटका करतो आपली पेचातून...
*आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...*
*
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी...
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...
ती येते...
काम आटोपते...
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना ती एक डब्बा देते हातात आपल्या...
चिवडा लाडू असतो त्यात...
_"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."_
*'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...*
*
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...
आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर...
अंगात ताप असतो तिच्या...
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...
दिवस उलटतात...
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
_"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."_
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!
चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले birthday विश आठवतात.....
लाजत तिला फोन करतो...
_"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."_
ती बोलते...
*कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...*
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...
काहीतरी दुरावलंय आपल्यापासून इतकंच जाणवत राहतं...
*खरंच,*
*होतं असं कधी कधी....!!!*
*******
लेखही आवडला आणि म्हाद्याचा आगावपणाही. :)
Sandy
;-)
खूप छान,... अगदी टचिंग !