हळवं मन
"सम्या, अरे गधड्या ! आवरलं कि नाही अजून तुझं ?" नंदिनीचा आवाज आता आणखीनच वाढला.
एकतर सकाळची धावपळ सुरू होती तीची. आणि समीरचं अगदी हळुहळु रेंगाळत आवरणं चालू होतं. त्याची आज नेमकी शाळेची रिक्षा येणार नव्हती म्हणून त्याला शाळेत सोडून मग परत घरी येऊन बाकी कामं आवरून तीला ही साडेआठला ऑफिसला निघायचं होतं.
आलोक सकाळी सातलाच पोळीभाजीचा डबा घेऊन गेला होता आज त्यालाही लवकर जायचं होतं एका क्लायंटला भेटून मग पुढे ऑफीसला जायचं होतं. नंदिनीने अजून बाकी पोळ्या करून.. समीरच्या डब्यासाठी भाजी घालून एक रोल मग एक तुप साखरेचा रोल असं त्याला हवं तसं घालून तीने डबा भरला. त्याची वाॅटरबॅग भरून दप्तराजवळ ठेवली.
मिसळपाव