रुजवण
रुजवण
अक्का गाडीत बसून अगदी दिसेनाश्या होईपर्यंत ती तिथेच उभी होती.डोळ्यातलं पाणी निखळलं पूर्ण आणि मग ती आत वळली.उण्यापुऱ्या सात दिवसात काय जीव लावला ह्या बाईनं! म्हणायला गेलं तर आत्तेसासू पण सर्वार्थाने ह्या घरची एकमेव बाई.लग्न झाल्यानंतरच्या आठ दिवसात घरातलं पीठामिठासकट सगळं सगळं दाखवलं त्यांनी.आज त्या त्यांच्या घरी परत जाताना तिला लग्नाच्यादिवशी डोळ्यात आलेल्या पुराची आठवण करून गेल्या.आता तिला एकदम पोक्त वाटायला लागलं. घरात सासरे,नवरा,वीस वर्षाचा, तिच्यापेक्षा एखाद्या वर्षानी मागे एक दीर, आणि दहा वर्षांचे जुळे, आवळेजावळे दीर.
मिसळपाव