Skip to main content

कथा

ती जागा (भाग -१)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 02/01/2021 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नानंतरच्या गोडगुलाबी दिवसांची मजा घेऊन रमा आणि श्री आपल्या कामाच्या शहरात पोहचले.आटोपशीर संसार म्हणून लहानच जुनी जागा त्यांनी भाड्याने घेतली .जागा अंधारी आणि बंदिस्त होती रमाला फारशी रुचली नाही ..पण संसारात नवरा-बायको एकमेकांसोबत असले तर बंदिस्त जागाही नंदनवन होत असते. तिथे राहायला येऊन दोनच दिवस झाले होते.रमाला स्वयंपाक घरात ओट्यासमोर उभी असतांना पाठीमागे तिच्या केसांना कोणीतरी फुंकरीने उडवल्यासारख वाटलं “काय रे श्री ,बस कर की चेष्टा ..”लाडात रमा बोलली. पुन्हा तोच प्रकार घडला..रमा मागे वळून पाहायला लागली तर कोणीच नाही.”श्री ?” ..तो बाहेर मित्रांशी गप्पा मारत उभा होता.

आरंभशूर..

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 01/01/2021 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आरंभशूर.... चहासाठी आधण ठेवणार, इतक्यात फोन वाजला. कोणाचा असेल, म्हणून न बघताच घेतला. डॅनी, काय करतेस गं..? लवकर तयार हो आणि सीसीडी मध्ये काळे चौकात भेट.... अगं, हो हो.. मी हसत हसत हेमाला म्हणाले. पण आज तुझा गाण्याचा क्लास नाहीये का...? "ते सोड गं.. डॅनी, तू उगाच प्लॅनला फाटे फोडू नकोस. आपण साडेचारला भेटतोय. बाय".... घड्याळात ३.५५ झाले होते तरी, अर्धा कप चहा घ्यायचा ठरवून तयारीला लागले. तर.. ही हेमा देव, माझी मैत्रिण..! खरंतर लहान आहे माझ्यापेक्षा, बारा-तेरा वर्षांनी.. पण एक अजब रसायन आहे ते..!! पाच एक वर्षापूर्वी मी मुंबईहून डेक्कनक्वीनने परत येत होते.

प्रवास (गूढ कथा) : भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 01/01/2021 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग १ आनंद : यार आटपा आता. उशीर होतोय आपल्याला. थर्टीफस्टला जोडून शनिवार-रविवार आल्याने जमू शकलं इथे माझ्या या वाड्यावर येणं. साल्यांनो, तुम्हाला लॉक डाऊनमुळे work from home आहे; पण मला जावं लागणार आहे शूटला.... आणि अकरा नंतर कर्फ्यु आहे. Not more than four are allowed to travel together. उगाच कुठे थांबवलं तर लफडा होईल. गाडीच्या दिशेने येत मंदारने आपली सॅक गाडीत टाकली आणि तो आनंदजवळ जाऊन उभा राहिला. मंदार : अन्या तू कायमच रडया आहेस. लोणावळा ते मुंबई असं कितीसं अंतर आहे रे? जेम-तेम दोन तासात पोहोचू आपण. उगाच उशीर होतोय हे कारण नको देऊस. तुझा हा भूतिया वाडा तुला लवकर सोडायचा आहे...

हेवा

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 29/12/2020 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज अनेक दिवसांनंतर मिपावर लिहीत आहे. अधून मधून केवळ वाचक म्हणून हजेरी लावत होते. एकूणच कामांच्या जवाबदरीमध्ये काहीशी जास्तच व्यस्त होते. आज एक कथा घेऊन आले आहे. खरंतर 'हेवा' ही माझीच शशक आहे. यावर्षीच्या स्पर्धेमधली. फक्त ही शशक आता एक संपूर्ण कथा म्हणून तुमच्या समोर सादर करते आहे. आपले प्रतिसाद येतीलच याची खात्री आहे ******** हेवा स्वप्नाळू राधाच्या लग्न करताना आयुष्याकडून खूप काही अपेक्षा होत्या. आजवर तिने जितके सिनेमे पाहिले होते त्यात सकाळी नवरा बायकोला प्रेमाने उठवतो... स्वतः बनवलेला नाश्ता देतो... गरम-गरम चहा आणून देतो असंच दाखवलं होतं.

शाळा

लेखक सरिता बांदेकर यांनी शनिवार, 26/12/2020 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा सौ सरिता सुभाष बांदेकर “ एक साथ नमस्ते” ज्या मुलांचे आणि मुलींचे लक्ष होते त्यांनी मास्तरना नमस्ते केले.बाकीची मुलं , मुली आपल्यातच दंग होती.आज लता नवीन कानातले घालून आली होती. निम्म्या मुलींचे लक्ष तिच्या कानातल्याकडे होते.मुलांचे लक्ष खोड्या करण्यात होते. मास्तरांनी हजेरी घेतली. आज शंभर टक्के मुलं हजर होती. आज शाळेत शिरा मिळणार आहे रोजच्या सारखी खिचडी नाही.

वृक्षासिनी

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 29/11/2020 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

व्यक्ताव्यक्त

लेखक Shrinidhi यांनी गुरुवार, 19/11/2020 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्त करणे की अव्यक्त राहणे? व्यक्त होत असतानाच अभिव्यक्ती खरी की... अव्यक्ताची अभिव्यक्ती खरी....,जी डोळ्यांनी साधली जाते,की कधी कशाने च नाही! व्यक्त जर सत्य तर अव्यक्त हे हे असत्य? की अव्यक्त हे जास्त सकस,समृद्ध,सर्जनशील,शुभंकर? सगळेच अव्यक्त हे व्यक्त करण्याच्या पलीकडले की वपु म्हणातत,तसे ते सर्वकष? सगळे अव्यक्त हे वैश्विक असते की प्रत्येकाच्या मनो विश्र्वा नुसार सापेक्ष! कदाचित आईन्स्टाईन च्या ऊर्जेच्या अक्ष्याय सिद्धांतानुसार....प्रत्येकाच्या व्यक्त आणि अव्यक्त हे समसमान आहेत?..…neither created nor destroyed..... की व्यक्त अव्यक्त चे नाते हे न्यूटन च्या तिसऱ्या नियमानुसारआणि

एक प्रवास -असाही

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 12/11/2020 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
*एक प्रवास- असाही* आठवडाभराच्या रजेनंतर आज ऑफिसला निघाले. अजून ट्रीपचा शीण गेला नव्हता. जरा जड मनाने आणि जड पायानेच निघाले. पावणेआठ वाजले होते. शेअर ऑटो मिळाली नशिबाने पटकन. रिक्षा अलिकडच्याच चौकात थांबते..पटापट चालत कसली पळतच प्लॅटफाॅर्मला आले. आठ-चौदा उभीच होती. पटकन फर्स्टक्लासच्या डब्यात चढले. सिटस् तर फुल झाल्या होत्या. या ट्रेनने कधीकधीच जाते त्यामुळे या ट्रेनला ओळखीचं कोणी सहसा भेटत नाही. दाराजवळच्या पॅसेजमधे टेकुन उभी राहिले. सहजच पर्स मधे हात घालून पाकिट तपासलं. कार्ड कव्हर काढून पास वगैरे सगळं आहे ना व्यवस्थित बघायला लागले. अन् एकदम दचकले. अरे देवा !! दरदरून घामच फुटला.

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/11/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. ) खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता. खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता.

पिक्चर!!

लेखक वेलांटी यांनी रविवार, 08/11/2020 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहाणपणी पिक्चर पहायला खूप आवडायचं! टिव्ही समोरून मी हलत नसे. खेडेगावातलं बालपण माझं! मी आजूबाजूला पहायची ती दुनिया अन् टिव्हीतली दुनिया यांत जमिनअस्मानाचा फरक. माझा इवला जीव त्यांत फार रमायचा. घरीदारी या वेडाची फार चेष्टा केली जाई. मला वाटे, आपल्या आयुष्यातपण काहितरी पिक्चरसारखं व्हावं! उन्हात पाऊस पडावा, आपल्याकडे बोलणारा पोपट असावा, पळत असताना आपले केस हिरोईनसारखे उडावे, विस्कटू नयेत, शाळेत वर्गात बसले असताना, वारा आला तरी नेमकी एकच बट गालावर यावी, सगळे केस पिंजारू नयेत, नंतर मोठी झाल्यावर ओढणी वार्याने उडून गेली तर वाटे, आता एखाद्या मुलाच्या तोंडावर जाऊन अडकते की काय?