Skip to main content

कथा

एक संध्याकाळ.. कृष्ण-राधा समवेत!

लेखक राघव यांनी रविवार, 19/07/2020 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारची उन्हं जरा कलत नाहीत, तो सगळ्या गोपिका नटून थटून पुन्हा यशोदेकडे हजर. जणू यांची घरची सगळी कामं कृष्णाला बघण्याच्या ओढीनंच लवकर आटपायची. घरात कोणीही असो, त्या कोणतंही काम करत असोत, मनाचा एक भाग कृष्णाचं चिंतन करतच राही. घरच्यांचंही काही फार वेगळं होतं असं नाही. सगळ्या गोकुळाचंच त्याच्याकडे सतत लक्ष लागलेलं असायचं. एका अद्वितीय अशा प्रेमाच्या रेशीमधाग्यानं ते सर्व जणू बांधल्या गेलेले होतेत. त्यांच्या लेखी कृष्ण म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे कृष्ण! पण आज कृष्णाचं काहीतरी बिनसलं होतं खास. अगदी वेळ झाली तरी हा आपला तयार झालेलाच नव्हता.

वेडा (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 18/07/2020 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
वेडा (रहस्यकथा) शहराचा तो मध्यवर्ती भाग नेहमी गजबजलेला असे. महत्वाची कार्यालये, शाळा, बँका याच भागात असल्याने, हा सगळा परिसर गर्दीचा बनला होता. या गजबजलेल्या भागाच्या बरोबर मधून डांबरी रोड गेल्यामुळे, या भागाचे दोन विभाग पडले होते. एक दक्षिणेकडचा आणि दुसरा उत्तरेकडचा. उत्तरेकडच्या भागात एक मोठी खासगी शाळा होती. तिच्याच शेजारी एक राष्ट्रीयीकृत बँक होती. शाळा आणि बँक असल्याने तो भाग नेहमी वर्दळीने भरलेला असे. मोठी वाहने, जीप, रिक्षा, सायकली, हातरिक्षा, पादचारी यांच्या गजबजाटीने हा भाग नेहमी व्यस्त असे. शाळेच्या शेजारी एक मोठे वडाचे झाड होते.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/07/2020 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्‍यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्‍हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे. फौज ? पाटलाच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

खिडकीबाहेरचं जग!

लेखक मन्या ऽ यांनी शुक्रवार, 17/07/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीबाहेरचं जग! ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं.. ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती.

राजयोग-२१

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 17/07/2020 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २० *** बिल्वन परत येईपर्यंत राजाने कुकी जमातीच्या सैनिकांना परत जायला सांगितलं होतं. त्यांनी राज्यात मनमानी करायला सुरुवात केली होती. सैनिकांच्या टोळ्या विभागून टाकल्या होत्या. युद्धाची काहीही तयारी केली नव्हती.बिल्वनने परत येताच राजाला अथपासून इतिपर्यंत संपूर्ण प्रसंगाचे वर्णन केले. राजा म्हणाला, “ठीक आहे ठाकूर, मी आता निघतो.राज्य, धन हे सर्व नक्षत्रसाठी आहे.” बिल्वन म्हणाला, “असहाय्य लोकांना कुणा दुसऱ्याच्या हाती सोपवून तुम्ही पळून जात आहात.

फाटका ट्रेक ढाकचा...! भाग २... समाप्त

लेखक विखि यांनी मंगळवार, 14/07/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागा पासुन पुढं... गुहेत आल्याव फुल्ल एन्जॉय सुरु झाला..... थोडा वेळ गेल्यावर सगळे गुहेत सेट झालो ज्यानी-त्यानी आपली आपली कामं करायला घेतली. आज खास गावठी चिकनचा बेत होता. बारीक-पुंडल्यानी चूल लावायला घेतली, चावरे,कनकधर-मास्तर, सुम्या चिराचीरी करत बसली, इशा-अम्या गुहेची साफसफाई बघत होते. अ‍ॅजे मेन आचारी म्हणून चिकनला हळद मीठ चोळून मी गुहेच्या तोंडापाशी पाय पसरून बसलो. मस्त गार वाटत होतं. गुहेचा माहोल कायच्या-काय भारी होता. खाली खोल दरी,बाजूला वर ढगात घुसलेला कळकराय सुळका, तोंडाव येणारं गार वारं. लई लांबवर राजमाची जवळ एखादी लाईट दिसत होती. बाहेर अजिबात कसला आवाज नाय का काय नाय.

कंदील (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 14/07/2020 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंदील (रहस्यकथा) मार्चचा महिना लागून काहीच दिवस उलटले होते.तरी वातावरणात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या. वातावरण संमिश्र होऊन,कधी उन्हाचा चटका बसायचा,तर मध्येच थंडीची झुळूक अंगाला झोंबून जायची.कदाचित वीस तीस मैलावर असलेल्या पश्‍चिम घाटाचा तो परिणाम असावा. पण हे वातावरण कसेही असो,कनकपुरचा प्राचीन वस्तूंचा बाजार माणसांनी फुलून गेला होता.आठवड्यातील गुरुवारी भरणारा तो बाजार,सगळ्या दक्षिण भारतात प्रसिद्ध होता.कनकपुर म्हटले,की डोळ्यापुढे केवळ प्राचीन वस्तूंची रासच दिसायची.

राजयोग - २०

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 10/07/2020 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१९ *** नक्षत्रराय सैनिकांबरोबर कूच करीत होता, त्याच्या प्रवासात कुठेही अडथळा आला नाही. त्रिपुराच्या प्रत्येक गावात त्याचं राजा म्हणून स्वागत केलं गेलं. जसजसा राजा असण्यातला आनंद क्षणोक्षणी मिळू लागला, तसतशी त्याची तहान अजूनच वाढू लागली. चारी दिशांना पसरलेली शेतं, गावं, डोंगर, नदी सगळं काही माझंच आहे ही भावना वाढू लागली आणि त्याचबरोबर आपण स्वतःही असेच विशाल, शक्तिशाली आहोत असे वाटू लागले. मुघल सैनिकांचा जसा कल असेल, तशाच आज्ञा तो देऊ लागला.

फाटका ट्रेक ढाकचा...! भाग १

लेखक विखि यांनी शुक्रवार, 10/07/2020 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारचे चारेक वाजले असतील. आमच्या गाड्या जांबवली गावात शिरल्या. रोड आता बरा झाला होता. कामशेत सोडल्याव तर लय वेळ डांबरी होता, नंतर सगळा फुफाटा. पन तरी पहिल्या मानानी चांगलाच होता. "अय बारीक शाळेपशी गाड्या लावू" मी मागून आवाज दिला. तशा गाड्या तिकडं वळाल्या. चारी गाड्या शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शिस्तीत लागल्या. कन्टीन्यु तीन साडे तीन तास, गाडी चालवल्यामुळ मुंग्या आल्यागत झाल होतं. कामशेतला जरा किराना घ्यायला थांबलो तेवढच. "च्यायला, शिट दुखायला लागलं गाड़ी चालवून चालवून" पुंडल्या गाड़ी लावून बाहेर आला. "पुढच्या ट्रेकपासुन एखादी उशी आनत जा बरोबर मंग" बारीक उड़लं.

पाऊस आणि ती

लेखक सहज सिम्प्लि यांनी बुधवार, 08/07/2020 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन जुलै महिना. पावसाने अगदी मनावर घेतलं होतं की ह्या वेळी कोणालाही तक्रार करायची संधी द्यायची नाही. आणि म्हणून तो दररोज मनसोक्त बरसत होता. बिचारे मुंबईकर नेहमीच पावसाचे बळी ठरतात. पण असा एकही मुंबईकर शोधून सापडणार नाही ज्याच्याकडे पावसाची एखादी रंगवून सांगावी अशी गोष्ट नसेल. त्या दिवशीचा तो दिवस हा असाच एक नेहमीसारखा पावसाळी दिवस होता, पण कोणासाठी तरी तो त्यांची पावसाळ्याची गोष्ट ठरला. सलग छत्तीस तास पडणार्‍या पावसाने मुंबई ची ‘लाइफ़ लाइन’ रखडायला सुरुवात झाली होती. पाउस कमी होण्याची चिन्हं न दिसल्यामुळे सगळी ऑफिसेस लवकर सोडण्यात आली होती. जे नशीबवान होते ते घरी पोचले.