Skip to main content

कथा

शुन्य टिंब एक

लेखक नीळा यांनी सोमवार, 15/02/2021 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे माफी मागणे. पहिल्यांदा ज्या आयडी चा अकाऊंट माम्ही हॅक केलाय म्हणजे नीळायांचा..सर माफ करा पण माम्हचा पण नाईलाज आहे…माम्हची कहाणी ऐकली की तुला कळेलच…समजुन पण घ्यालच. दुसरी गोष्ट म्हणजे ईतर सगळ्या वाचकांना…. माम्हची भाषा तोडकी मोडकी वाटते ना?…म्राठी हि काही माम्हची योनभाषा नाही…आणि माम्हच्या दुनिया मधल्या काही संकल्पना.. शब्द तुच्या भाषेत नाहीतच. तर थोड समजुन घ्या… हळूहळू सवय होईल, माम्हालाहि आणी तूलाही. ईथेच कहाणी षांगायच मुख्य कारण म्हणजे यक्क.

गावाच्या गोष्टी - ३

लेखक साहना यांनी रविवार, 14/02/2021 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या जगण्याची दुसरी एक मजा म्हणजे ब्रेक मध्ये लगबग सिगारेट ओढल्याप्रमाणे इथे कुणीही जगत नाही. इथे जगण्याची कला हि हुक्का बार मध्ये हळुवार गुडगुडी ओढत जगणे. मग वारंवार कोळसा हलवत धुराचे ढग निर्माण कारण आस्वाद घेत जगणे. इथे बांगडा फक्त ताटांत पाहून खाऊन ढेकर द्यायचा नसतो. तर त्याची प्रोसेस बाजारांत बांगडा आणि तो विकणारी मासेवाली ह्यावरून सुरुवात होते. मग पोट दाबून (माश्याचे, मासेवालीचे नव्हे) बांगडा फ्रेश आहे का नाही हे पाहणे. मोठा असेल तर बांगडा, छोटा असेल तर बांगडुली, जास्तच मोठा असेल तर बांगडाच पण इथे नाक थोडे मुरडयाचे असते.

अडगळीतला साप (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 13/02/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतला साप (कथा) तसा तो दोन दिवसांपूर्वीच माझ्या नजरेस पडला होता. पण तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या रात्रीच्या मंद प्रकशात, मला बहुतेक त्याची शेपटी दिसली असावी. पण मी अर्धवट झोपेच्या अवस्थेत असल्याने, त्याकडे निरखून पाहिले नाही. असेल एखादी दोरी, ती लोंबत असेल अशी बोळवण करून, मी झोपलो होतो. खरेतर सकाळी उठल्यावर, वर पत्र्याकडे पाहणे माझे काम होते. त्या पत्र्याच्या कोपऱ्यावर, रात्री आपण काहीतरी पाहिले होते. तेव्हा ती आपल्याला दोरी वाटली, पण सकाळी उठल्यावर तेथे दोरी असायला हवी होती. पण घाईगडबडीत मी ते सगळे विसरून गेलो. आणि तो तिथेच वरती, त्या पत्र्याच्या अडगळीत, तसाच बसून राहिला होता.

प्रवास (भाग 7)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 12/02/2021 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 7 "काय वाटतं पवार... काय रहस्य असणार या वाड्याचं?" वाड्याच्या दिशेने निघाल्या नंतर राठींनी पावरला विचारलं. पवार देखील तोच विचार करत होता. रस्त्यावरची नजर ढळू न देता तो बोलायला लागला;"साहेब, काही कळत नाही. तो आनंद एकटा आला नव्हता हे नक्की. त्याच्या गाडीतल्या सॅक्स वरूनच ते कळतं. त्यात गर्ल फ्रेंड असताना थर्टीफस्टला कोणी एकटं का येईल? पण पाच जण होते... म्हणजे एकटं जोडपं नाही. याचा अर्थ जोडप्यामध्ये होणारी भांडणं झालेली नाहीत. मग मित्र कोण होते? सिनेमावाले असतील की अजून कोणी? दिनू म्हणाला कोणीतरी मुलगी... याचा अर्थ आनंदची मैत्रीण सिनेमावाली नाही. नाहीतर दिनूने ओळखली असतीचं.

अशी ही भाऊबीज

लेखक सरिता बांदेकर यांनी सोमवार, 08/02/2021 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
अशी ही भाऊबीज सौ सरिता सुभाष बांदेकर सुभानराव घरात शिरले तेच हेमंतला हाक मारत.सीताबाईंनी बाहेर येत विचारलं,” अहो काय झालं? हेमंत गेलाय मॅच खेळायला, येईल थोड्या वेळात.” “अहो थोड्या वेळात नको,सुजाताला पाठवा आणि हेमंतला म्हणावं लगेच घरी ये. मॅच राहू देत.आणि तुम्ही देवाजवळ दिवा लावा आणि देवापुढे साखर ठेवा.” सुभानराव बाहेर गेले आणि सुजाताला हाक मारून म्हणाले, “सुजे, पळत पळत जा आणि तुझ्या दादाला सांग ताबडतोब बोलावलंय बाबांनी.” सुजाता तशीच धावत निघाली. ती जेव्हा मैदानात पोचली तेव्हा मॅच चालू होती.

प्रवास भाग 6

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 05/02/2021 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 5 https://www.misalpav.com/node/48240 प्रवास भाग 6 नविनने हाक मारल्या बरोबर अनघा आत जायला वळली पण तिचा हात धरत मनाली म्हणाली;"नको ग अनघा. आत अजून काहीतरी असेल. मला आता याहून जास्त धक्के सहन होणार नाहीत ग. त्यांना तू बाहेर बोलावं बघू. जे काही आहे ते असुदे आतच. आता आपण इथून लगेच निघुया." तिच्या हातावर थोपटत अनघा म्हणाली;"मनाली वेडेपणा नको करुस. त्याने आत बोलावलं आहे तर आपण जायलाच हवं. जे काही आहे त्याची जवाबदारी आपल्या चौघांवर आहे. तू इतकी का घाबरते आहेस? जे काही आहे ते आपण सांभाळून घेऊ. तशीच वेळ आली न तर पोलिसांकडे जाऊया आपण. हे बघ!

अलक चाहुल

लेखक नीळा यांनी मंगळवार, 02/02/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सारख जाणवत होत ती आसपास वावरतेय. रिकाम्या घरात बेडरूममध्ये मधुन कीचन तीथून हॉल. क्षणभर हार घातलेल्या तीच्या फोटो समोर स्थब्ध. सारा सारा वेळ मागे पाठीशी तीचीच चाहुल, तीचाच गंध,जीवघेणी हुरहूर.चुकुनच लावलेला तीचा शांपू!

प्रवास (भाग 5)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 01/02/2021 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 4 https://www.misalpav.com/node/48169 भाग 5 प्रवास भाग 5 आनंद (?) खोलीबाहेर पडला तो थेट मागच्या दाराने घराबाहेर गेला. त्याची पावलं भराभर पडत होती. तो भिकुच्या झोपडीजवळ आला. झोपडीमध्ये शिरण्याअगोदर त्याने एकदा मागे वळून वाड्याकडे बघितलं आणि मग तो त्या झोपडीत शिरला. *** मनाली खोलीत शिरली आणि तिने अगोदर मोबाईल हातात घेत किती वाजले आहेत ते बघितलं. दुपारचे बारा वाजून गेले होते. ते पाहून मनालीला धक्काच बसला. मनाली : बारा वाजून गेले? अरे बापरे!

लंगडा (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शुक्रवार, 29/01/2021 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
लंगडा (गूढकथा) त्याने पुन्हा एकदा आवाज दिल्यावर मात्र, माझा नाईलाज झाला. मी जागेवर थांबलो. तो दुडक्या चालीत माझ्याकडे येत होता. तो डाव्या पायाने लंगडा असावा. आपला डावा हात गुढग्याच्या थोडा वर टेकवून, तो माझ्या दिशेने येऊ लागला. मला नवल वाटले. कोण पाठीमागून आवाज देतोय, म्हणून मी वैतागलो होतो. पण आता ही त्याची लंगडी स्थिती पाहून, मला उगीच थोडासा खेद वाटून गेला. याच्याशी नारमाईने वागायला हवे, असे उगीचच वाटून गेले. आमच्यातले ते वीस पंचवीस मीटरचे अंतर कापायलही, त्याला बराच वेळ लागला. तो माझ्याजवळ आला. माझ्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान उमटून गेले.

प्रवास भाग 4

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 24/01/2021 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 3 https://www.misalpav.com/node/48138 प्रवास भाग 4 आनंद दिवाणखान्यात बसून गुणगुणत होता. सगळेच आपापल्या खोलीत गेले होते. त्यांच्या खोल्यांकडे आळीपाळीने बघत तो तिथेच बसून होता. अचानक परत एकदा कोल्हेकुई सुरू झाली आणि मंदार, नवीन, अनघा आणि मनाली धावत त्यांच्या खोल्यांमधून बाहेर आले. सगळेच काहीसे घाबरले होते. आनंद मात्र दिवाणावर स्वस्थ बसला होता.