Skip to main content

कथा

कधी सांज ढळत असताना...

लेखक फटू यांनी शनिवार, 24/05/2008 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. करणिकांचं फिजीओलॉजीचं शेवटचं लेकचर संपलं. सेकंड एम बी बी एस च्या वर्गातून पांढरा शुभ्र एप्रन घातलेली भावी डॉक्टर मंडळी भराभर बाहेर पडली. अविनाशसुद्धा घाई करत वाचनालयाच्या दिशेने निघाला. आज काहीही करून ग्रे चं anatomy चं पुस्तक मिळायला हवं याच विचारात तो चालला होता. तो जिना चढून दुस~या मजल्यावर आला. त्याच्या मागोमाग मोठ्याने चपलांचा आवाज करत कुणीतरी येत असल्याचं त्याला जाणवलं. ''असेल कुणी सीनियर किंवा स्टाफ मेम्बर", तो स्वताशीच पुट पुटला. "ए स्कॉलर", मागून आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं.

गावित मास्तर

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 24/05/2008 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
"आपलं हस्तलिखित आता चांगलं तयार होत आलंय! तू बरेच श्रम घेतलेले दिसताहेत" आमचे मराठीचे देशमुख सर मला म्हणत होते... "होय सर! कथा, लेख, कविता सगळं जमलंय. आता मुखपृष्ठ ठरलं की झालं" "आणि तुझं संपादकीय?" "ते सुद्धा पुरं होत आलंय" "बरं, मुखपृष्ठाचं काय करणार?" "गावित मास्तरांनी काढलेलं एखादं चित्र टाकावं म्हणतोय" मी "तुला वाटतं तो चित्र काढून देईल?" "विचारायला तर काय हरकत आहे" "असं म्हणतोस? ठीक आहे, बघ विचारून! पण सांभाळून हो, दुर्वास आहे तो साक्षात!!" मला हसू आलं. देशमुख सरांनीही स्मित केलं आणि मला प्रेमळपणे म्हणाले, "तुला अगदीच मारायला उठला तर माझं नांव सांग!

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 21/05/2008 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला...

’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 19/05/2008 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे. महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील.

साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 18/05/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणा ना! त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा प्रश्न इगोचा असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्‍या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते.

कॉन्ट्रॅक्ट (बहुतांशी खरी झालेली एक पद्यकथा)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 16/05/2008 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
कॉन्ट्रॅक्ट चार दिवस सुट्टी होती म्हटले जरा मौज करावी बायकोला घेऊन सोबती थंड हवेची सहल करावी. थंड हवेची सहल करावी? बायको पण खूश झाली त्या खुशीत तिने दारूची पॅक करू दिली बाटली पॅक करू दिली बाटली मी पण लिमीट पाहिली जवळच्या दुकानातून तीन वाइनची क्रेट घेतली तीन वाइनची क्रेट घेऊन निघालो मी सहलीला स्वप्ने पाहत प्रवास झाला करू प्रिये सह लीला कसली प्रिये सह लीला! पाहा अगाध दैवाची लीला थांबवली बस अचानक डाकूंचा घाला पडलेला डाकूंचा घाला पडलेला मुसंड आत चढलेला घेतले सगळ्यांचे दागिने पैसा अडका गोळा केला. पैशाअडक्याचे एक सोडा तीन क्रेट पण घेतल्या नशा पळवून गेला न उघडता बाटल्या नशा पळवून ट