Skip to main content

कथा

दुरावा!

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 19/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दुरावा!!
विमानतळावरचा आगमन लाऊंज माणसांनी अगदी फुलून गेला होता. नुकतीच मुंबईहून आलेली एअर इंडियाची फ्लाईट लागली होती. प्रवासी इमिग्रेशन, कस्टम्स आटोपून बंद दरवाजातून हळूहळू बाहेर येत होते. असेच एकदा दरवाजा ढकलून आजी आणि आजोबा बाहेर आले. आजोबा बॅगा लादलेली जड गाडी हळूहळू ढकलत होते. आजी संधिवातामुळे हळूहळू चालत होत्या. दोघांचेही चेहरे प्रवासाने दमलेले, किंचित बावरलेले. त्यांची ही पहिलीच विदेशवारी होती. भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती.

इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 02/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल. (तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले मेहता प्रकाशन, पुणे ) त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्‍या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.

बाबूराव बागुल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 30/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.

शिकवा नही किसीसे...

लेखक फटू यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार होता तो... विक एण्ड तर दुपारीच चालू झाला होता. संध्याकाळी काम आटपून मी निवांत रमत गमत घरी आलो. पाठीला अडकवलेली सॅक जवळ जवळ फेकुनच दिली. सोफ्यावर कम्फर्टर तसंच पडलेलं दिसलं म्हणून ते उचललं. आणि मी आश्चर्यचकित झालो. अपूर्व, माझा रूम मेट एकदम अवघडल्या अवस्थेत सोफ्यावर कम्फर्टर अंगावर ओढून झोपला होता. तो असा कधीच झोपत नसे. काही तरी बिनसलं होतं. कदाचित कामाचा थकवा असेल म्हणून झोपला असेल असा विचार करून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो... रात्रीचे साडे नऊ वाजले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण तर सकाळचच होतं. फक्त गरम करायचं होतं. आता मात्र अपुर्वला जागं करायलाच हवं होतं.

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 24/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले. मित्र हो....

जन्म - १

लेखक फटू यांनी रविवार, 24/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दवाखान्याचा सारा परिसर औषधांच्या वासाने भरलेला. परिचारिकांची मधूनच लगबग चालू होती. एखादा इंटेरन्शिप करणारा शिकाऊ डॉक्टर स्थेटास्कोपशी खेळ्त वार्डमध्ये राउंडला जाताना दिसत होता. अविनाश नुकताच एक सिझेरियनची शस्त्रक्रिया आटपून लेबर रूममधून बाहेर पडला होता. तो आरामशीर खुर्चीत बसला.

उद्‌घाटन, नको रे बाबा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 16/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बाबूराव पाटील म्हणजे अवली माणूस. गोंधळे बुद्रुक गावाचे सरपंच; पण रुबाब पंतप्रधान असल्याचा. अडल्यानडल्याची कामं करतील, पण प्रत्येक ठिकाणी मिरवायला मिळालं तर! लग्न असो, मुंज असो, साठी-पंच्याहत्तरी असो की श्राद्ध; बाबूरावांना काही वर्ज्य नाही. श्रद्धांजली सभेतही असं भाषण ठोकणार, की निवडणुकीच्या प्रचाराची सभा आहे की काय, असंच वाटावं. या अतिउत्साहापायी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यातही बाबूराव पटाईत. कधी तोंडघशी पडतील, याचा नेम नाही. बरं त्याचं यांना सोयर ना सुतक. आजूबाजूची मंडळीच खजील व्हायची. बाबूराव मात्र जय की थय! एकदा काय झालं, गावातल्या कुणातरी मान्यवराचं दुःखद निधन झालं होतं.

एका लग्नाची गोष्ट...

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 03/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"डोकं फिरलंया...बयेचं डोकं फिरलंया...' लग्नसमारंभाला अगदी साजेसं आणि नवरा-नवरीच्या मनःस्थितीचं सुयोग्य वर्णन करणारं गाणं बॅंडवर वाजवलं जात होतं. (लग्नाचीही काय गंमत असते बघा...आधी वधूपक्षाकडली मंडळी नवऱ्या मुलासाठी बॅंड वाजवतात आणि मग त्याचा बॅंड वाजवतात !) पाहुणे झकास नाचत होते. गणपतीतल्या नाचापेक्षा या नाचाचा दर्जा किंचित वरचा आहे, अशी शंका घ्यायला वाव होता. फुगड्या रंगल्या होत्या. काही जण लग्नातल्या कामांचा शीण घालवण्यासाठी अंग हलवत होते तर काही जण आधीच "श्रमपरिहार' करून आले होते आणि आता अंगात भिनलेलं रसायनच त्यांना नाचवत होतं.

घाईत घाई

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 03/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मुडदा बशिवला तुझा...डोळेबिळे फुटलेत की काय? मेल्या पायाचं पार भजं केलंस की...तुझ्या...***!'' एक कचकचीत शिवी त्या कोंदटलेल्या, तुंबलेल्या बसमध्ये घुमली. आणि गजराबाईंच्या पायावर पाय देणाऱ्या सदाचा चेहरा (न) पाहण्यासारखा झाला. "कुठल्या मुहूर्तावर बसमध्ये चढलो कुणास ठाऊक,' असं त्याला वाटलं. एक तर सकाळी धावतपळत तो बसस्टॉपवर पोचला होता. त्यातून त्याच्या समोरच त्याची नेहमीची बस निघून गेली. त्यामुळं ही दुसऱ्याच मार्गाची बस त्याला धरावी लागली होती. वर फाट्यावर उतरून पुढे बरंच अंतर उन्हातान्हात चालत जावं लागणार होतं. दुसरं वाहन करावं, तर खिशाला चाट बसणार होती.

बोधकथा

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 26/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गौतम बुद्धांची एक कथा. बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला. प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या.